आजचा दिवस माझा - सर्वसामान्य गोष्टीसाठी केलेली असामान्य धडपड
सचिन खेडेकर (मुख्यमंत्री ) ,अश्विनी भावे (सौ .मुख्यमंत्री ) , रिषीकेश जोशी (personnel assistant) ,महेश मांजरेकर ( IAS ऑफिसर) ,आनंद इंगळे ,पुष्कर ,लीना भागवत ( अधिकारी वर्ग ) अशी तगडी स्टार कास्ट ह्या सगळ्यांच्या अभिनयाविषयी मी काय बोलावे
चंद्रकांत कुलकर्णी ह्याचा दिग्दर्शन लहान लहान प्रसंगातून सुद्धा छाप उमटवून जातं , सध्यस्थिती वास्तवाशी थोडाफार फारकत असलेला चित्रपट जरी असला तरीसुद्धा राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीने काहीही अशक्य नाही हा संदेश देण्यात चित्रपट कुठेच कमी पडत नाही किंबहुना दाखवून देतो कि राजकीय इच्छाशक्तीने काय शक्य आहे .
चित्रपटामधील घडामोडींचा काळ फक्त एका दिवसाचा ,त्यातून मुख्य कथानक दुपारी ३ ते पहाटे ६ इतक .
राजकीय इच्छाशक्तीने प्रेरित मुख्यमंत्री , त्यांची जमेल तितक स्वच्छ प्रशासन देण्याची धडपड त्याजोगे करावं or else केलेल राजकारण ,स्वामी निष्ट पत्नी , विश्वासू तसेच संवेदनशील स्वीय सहायक ,सोबत सरकारी कर्मचारी वर्ग काम म्हणजे उपकार ह्याभावनेतून काम करणारा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे UPSC मधून आलेला IAS अधिकारी सर्वात मोठी शिक्षा म्हणजे बदली आणि त्यातून आलेला माज, एक प्रामाणिक पत्रकार ह्या सगळ्यांना सोबत पूर्ण एक दिवसाची कथा .
मुख्यमंत्र्यांच संवेदनशील मन त्यांना खटकलेली एक गोष्ट आणि मग ती पूर्ण करण्यासाठी केलेला रात्रीचा दिवस हि कथेची बांधणी खूप अप्रतिम आहे ,चित्रपटाच्या मूळ गाभ्याच्या सोबत चित्रपट पुढे सरकत असताना सुद्धा दैनदिन राजकीय घडणाऱ्या गोष्टींकडे कानाडोळा केलेला नाहीये ,त्या लहान सहान घटना त्यांचे अस्तित्व दाखवतात
मुख्यमंत्री - IAS ऑफिसर ह्याचं संभाषण ,मुख्यमंत्र्यांच विविध प्रसंगावर केलेल भाष्य , मुख्यमंत्री आणि त्यांची पत्नी ह्याचं संभाषण , स्वींय सहायक आणि त्याच्या मुलाचं संभाषण ,सौ मुख्यमंत्री यांनी घेतेलेला निर्णय वर्तमान काळातील शासन प्रशासनावर अचूक भाष्य करून मनाचे ठाव घेतात ,विचार करायला भाग पाडतात
नेहमी सारखा गोड गोड शेवट न घेता , समर्पक शेवट आहे तो असा कि एक चांगल काम करून सुद्धा अजून भरपूर काम शिल्लक असल्याची दाखवलेली जाणीव
वर्तमान स्थिती पाहता हा चित्रपट वास्तववादी नाही वाटला तरीसुद्धा एक वेगळी सकारात्मक विचारसरणी रुजवून जातो . कधी कधी फायदे तोटे ,राजकारण न पाहता कुणीतरी कुणासाठी झटलेल पहिल कि समाजकारणासाठी प्रशासन अस्तित्वात येण्याची आस लागते
जनता ,शासन ,प्रशासन ह्यांनी सर्वांनी एकदा तरी पाहावा असा चित्रपट
( चित्रपटाच्या कथेबद्दल मुद्दाम detail मध्ये सांगत नाही कारण theatre मध्ये पाहावा अशी इच्छा )
