Total Pageviews

एक नवा अध्याय लिखाणाचा...

नवीन वर्षाची सुरुवात झाली कि किरणदादा हमखास एक नवीन डायरी आणून देतो तसेच नवीन नवीन पेन घेण्याची खूप हौस, गेल्या  ३ वर्षाच्या नवीन नवीन डायऱ्या आणि खूप सारे पेन्स जमले होते हे सर्व सार्थकी लावायच होतच त्यातून एक मस्त किस्सा घडला कि लिहायची सुरुवात करावी लागली
       बस च्या पावसामध्ये गाणी ऐकणं आणि लोकल च्या प्रवासामध्ये पुस्तक वाचन हि दोन आवडिची  काम संध्याकाळची वेळ  आणि कांजूर to cst उलटा प्रवास  असल्यामुळे लोकल ला तशी फार गर्दी नव्हती  मस्त window सीट  मिळाली नवीन घेतलेलं शोध स्वामी विवेकनंदांचा हे दाभोळकरांच पुस्तक काढलं अनि डोकं खुपसलं इतका तल्लीन झालो होतो कि कधी एक एक स्टेशन मागे पडत होती काही कळत नव्हत ,इतक्यात आवाज आला " पुस्तक खूप छान आहे पण वाचल्यावर चिंतन जरूर कर "मी डोकं वर काढून पहिल एक परिटघडिचा  माणूस बोलत होता मी हो नक्कीच  म्हणालो आणि पुन्हा डोक खुपसनार इतक्यात दुसरा प्रश्न आदळला "तू नेहमी अशी पुस्तकं वाचतोस का तुला sociology ची आवड आहे का ?" अस पटकन मी इतका संवाद साधत नाही पण माणूस बरा वाटला  म्हणून बोलणं चालू ठेवूया अस ठरवलं आणि म्हणालो नाही जे आवडेल , कोणी सुचवेल ते वाचतो लगेच पुढचा प्रश्न "वाचून काय करतोस " मी बोललो काहीच नाही कधीतरी मित्रांसोबत बोलताना share 
 करतो,समजून घेतो ,मनाला पडलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर मिळतात  आणि पुढच्या प्रश्नाची वाट बघू लागलो , तो माणूस विचारात पडल्यासारखा झाला आणि म्हणाला "तुला जे वाटत ते बरोबर असत कशावरून ?  तुमचा काही कट्टा वैगेरे आहे आहे का ? तू ब्लॉग लिहितोस का ?" ह्या सर्व गोष्टींचा कधी विचार केल्याचं आठवेना सुद्धा झाल आणि सहज उत्तर निघालं नाही … त्यावर लगेच त्यांनी बोलायला सुरुवात केली "आपला मेंदू म्हणजे एक कपाट आहे आणि त्यामध्ये असंख्य कप्पे आहेत तू ते कप्पे भरतो आहेस पण ते फक्त भरलेले आहेत ,त्यांचा recycling होणं गरजेचं आहे. तू वाचलेल , त्यावर तुझे विचार ते नमूद करणं आवश्यक आहे , तुला तरी कस कळणार तू वाचलेलं बरोबर आहे कि चूक ,थोडक्यात सांगायचं तर तुला उमजलेलं सर्व काही जसच्या तस बरोबर आहे कि विचारांची दिशा बरोबर कि चूक ? वाचनावर कधीही बंधनं नसावीत पण एक दिशा नक्कीच असावी आणि ती दिशा वाचन संस्कृती जोपासल्यामुळे होते ,वाचन संस्कृती म्हणजे काय ,आपण वाचतो त्याची चर्चा त्यावर समीक्षा त्या अनुषंगाने तुमची कार्यपद्धती "
क्षणभर विचारात पडलो ,बोलत होते ते पटत होतं ,विचारातून बाहेर येवून पाहतो तर माणूस गायब ,इतक नक्की आठवतं कि मध्ये कोणतही स्टेशन आल नाही ,कदाचित माझाच मला झालेला  भास ,माझं मला उमगलेलं उत्तर ,गेल्या काही दिवसांत बरीच वेगवेगळ्या विषयांची पुस्तक वाचनात आली,पण विचारांचा वेगळा गोंधळ जाणवत होता  ,तो का व कशामुळे होता ते नव्हत कळत ,कदाचित त्याच उत्तर सापडत होत… 

खाजगी,कार्यालयीन ,सार्वजनिक आयुष्यात खूप साऱ्या घटना घडत आहेत , त्यावर विचारांची एक माळ गुंफली जातीये ,ती फक्त जपमाळ बनून राहिलीये . या जपमाळेचा काहीच कुठे होत नाहीये ,ह्या जपमाळेचा  योग्य ठिकाणी जप होणं  आवश्यक आहे . रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलंय "Mind all Reason is knife all edge, it bleeds the hands that hold it.सततच तर्ककर्कश असणारं मन बुद्धी म्हणजे मूठ नसलेलं सुर्‍याचं पातं,जे हात ते पातं पकडतील तेच रक्तबंबाळ होतील" हे मुठ नसलेलं पात होवू द्यायचं नाही । एक विचारांची दिशा कळली आपोआप तर्कवितर्क ह्यांना विराम मिळेल आणि त्याच रुपांतर एका ठराविक विचारसरणी मध्ये होईल 
ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून हा अध्याय लिखाणाचा तुम्हा सर्वांच्या सोबतीने  …. 

2 comments:

Alps Alive said...

Namaskar saheb....
Firstly thanks for starting to blog...
This first one is good....
but just one suggesstion. jast vichar karun thoughts post processing mandu nakos....
Manat yeil tasa lihit ja....
Wish you all the best :)

Piyas World said...

Nice thoughts, good starting...Keep it up