Total Pageviews

त्याग .... समाधान ....पश्चाताप

मी तुझ्यासाठी हे केल, तुझ्यासाठी ते केलं आणि तू माझ्यासाठी काय केलं … हि वाक्य सर्रास कानावर पडताना दिसतात .

 कोण कोणासाठी का काही करतो ? काय असतात अश्या अपेक्षा कि आपण आपले निर्णय बदलतो आणि त्याग वैगेरे सारखी मोठ मोठाली लेबलं लावून आपले कोणासाठी काही कार्य  टाळतो पण इतक  करूनही पुढे काय होत …कालांतराने  खुश कोणीच  नाही म्हणजे ज्याच्यासाठी केला तो सुद्धा नाही आणि ज्याने केला तो सुद्धा नाही

मुळात प्रत्येकाच्या मनात त्यागाची भावना असते आपण कोणासाठी काहीतरी करावा अशी अपेक्षा असते . मूलतः मानवी गुणधर्माचा एक स्थायी स्वभाव आहे तो .

        पण तोच त्याग करताना नेहमी एक सुप्त अपेक्षा आपण बाळगून असतो ते म्हणजे आपण केलेल्या त्यागाची पोचपावती . नेहमी अस वाटत असत कि आपण एक अमुक त्याग केलाय तर मग आपल्या त्या त्यागाची नेहमी ज्याच्यासाठी केलाय त्याने त्या गोष्टीची सतत जाणीव ठेवावी , आपल्याशी तस वागावं  पण तसं होताना दिसत नाही आणि  त्याचा आपल्याला त्रास व्हायला लागतो, मनामध्ये' द्वंद चालू होत.

 आपण केल तर बरोबर आहे का खरच तसा तो त्याग करण्याची गरज होती का आणि ज्यांच्यासाठी केला खरच आपला त्याग समजून घेणारे आहेत का .

   आपण ज्याच्यासाठी त्याग करतो त्या व्यक्तीची मानसिकता समजून घेण गरजेच आहे . आपल्यासाठी त्याग असेल पण ज्याच्यासाठी करतो त्याच्यासाठी एकतर ती एक साधी अपेक्षा असू शकेल आणि त्या व्यक्तीला त्या गोष्टीची आपल्या आयुष्याशी नाळ समजू न शकल्याने किंवा स्वताच्या मस्तीत धुंद असणाऱ्या व्यक्तीला समोरच्याविषयी काहीच आपुलकी नसेल

आपण जेव्हा एखादी गोष्ट टाळतो व त्या गोष्टीचा त्याग करतो त्या गोष्टीशी किती लोक निगडीत आहेत ह्यावर सुद्धा बऱ्याच वेळा त्या त्यागातून मिळणार समाधान अवलंबून असत.
कारण आपण कोणासाठी काहीतरी करतो तेव्हा स्वतःच्या ,स्वतः भोवतीच्या वातावरना मुळे निर्णय घेतो पण त्याचा आपल्या परीघामध्ये असणाऱ्या व्यक्तींचा तितकासा विचार करत  नाही परिणाम असा होतो त्यामुळे एक जन सुखावतो आणि एक जन दुखावतो .

दुखावलेल्या मनाचा थोडाफार परिणाम आणि ज्याच्यासाठी केल त्याच्या अपेक्षा ह्यातून काहीच निष्पन्न होत नाही आणि वेळ निघून गेल्यावर कशासाठी आणि कोणासाठी काय केल , खरच गरज होती का असे प्रश्न पडू लागतात . पश्चाताप होवू लागतो

खूप भेळ मिसळ आहे विचारांची त्यागमूर्ती असाव पण मग अपेक्षा करू नयेत अनादिकाळापासून लिहून ठेवलंय कर्म कर फळाची अपेक्षा करू नको पण सामान्य माणूस म्हणून जमणार आहे आपल्याला ??

 मुळात त्याग ज्यांच्यासाठी करतोय तो सुद्धा एक सामान्य माणूस असतो त्याच्या जाणीवा जागृत असतील तर करावा त्याग .

कोणाच्या काही करण्याने काही कोणाला फरक पडत नसतो तुमचा चांगुलपणाच कौतुक एक दोन दिवस नंतर तुम्ही जसे पूर्वी होतात तसे मग कोणी सांगितलंय नको ते उपद्याप .

माणूस म्हणून जन्माला आलो माणूस म्हणून जगावं . देव बनण्याचा प्रयत्न करू नये

स्वार्थी बना अस मी म्हणत नाहीये पण म्हणून कोणतही शास्त्रीय कारण नसताना कोणाच्या दांभिक सुखासाठी कोणतेही निर्णय घेवू नयेत .

लेख थोडा भरकटला असेल. पण एकच सांगावास वाटत । पश्चाताप न करण्याची शाश्वती असेल तरच निर्णय बदलावेत , त्याग करावा … 

 

परळी ची दगडफेक - व्यथावेदनांचा विस्फोट

 
सकाळी  सवयीप्रमाणे TV लावला आणि पहिली headline सुरु होती , मुंडे साहेबांना अपघात झाल्याची बातमी , detail बघणार इतक्यात दुसरी बातमी साहेब गेल्याची . मला पटेना . ३-४ channels surf केले पण तीच एक बातमी . डोके सुन्न झाले . मनामध्ये एक अनामिक भीती दाटली . आता कुठे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सरंजामशाही चं पानिपत होण्याची चिन्ह होती आता त्याला एक तडा पडलेला दिसत होता … 
 
पश्चिम महाराष्ट्राचं साला नशीबच फुटक वाईट .बहुजन समाजाला तर त्याहून मोठा फटका.
 
स्वतः आठवले दलित समाजाचे नेते असून कधी कोणाला ते आपले का वाटत नाहीत या उलट मुंडे साहेब नेहमीच आपले वाटले , कारण सर्वसमावेशक वृत्ती , समजून घेण्याची प्रवृत्ती 
 
 वर्षानवर्षे पिचलेली मराठवाड्यासह राज्याच्या कानाकोप-यातील लोकं खासकरून गरीब, कष्टकरी ऊस तोड करणारा वर्ग, वंजारी, बहुजन समाज असा ख-या लाभांपासून, सुविधापासून स्वातंत्र भारताच्या 67 वर्षानंतरही वंचित आहे. आज मिळेल, उद्या मिळेल या आशेवर हा समाज आजही जगतो आहे.
 
याच वर्गातून, समाजातून वर आलेले व तावून-सुलाखून निघालेले गोपीनाथ मुंडेंसारखे नेतृत्त्व तयार झाले होते. या माणसाने कायम त्यांना जगण्याची नवी ऊर्मी, ऊर्जा दिली. सकारात्मक विचार करायला भाग पाडले.
 
राजकीय जीवनात आल्यापासून संघर्ष सुरू होता ते मरेपर्यंत संघर्ष केला या माणसाने. त्या माणसाला कधी एखाद्या गोष्टीचे क्रेडिटही दिले नाही या सो कॉल्ड राजकीय व्यवस्थेने, त्याचा सन्मान तर सोडाच. कोण हा मुंडे, वंजारी समाजातील माणूस आम्हाला आव्हान देतोय असे येथील संरजामशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना वाटत होते. खरं इथे जातीचा काहीच संबंध नाही आहे तो 'आहे रे' आणि 'नाही रे' या वर्गाचा. पिढ्यानपिढ्या गरीबी, कष्टकरी, शेतकरी, आपल्या संरजामशाही व्यवस्थेमुळे कायम भरडून निघालेली तळातील गोरगरीब जनतेला कोणी वालीच नव्हता. या वावटळात त्यांना गोपीनाथ मुंडे नावाच माणूस दिसला. जो या वर्गाची भाषा तो बोलायचा व तो आपला पोशिंदा होऊ शकतो असे या वर्गाला वाटायचे. या लोकांसाठी मुंडे नावाचा माणूस गेली 4 दशके संघर्ष करीत होता. या दरम्यान या माणसाने अनेकांना शिंगावर घेतले. पण सर्व प्रस्थापित राजकीय टोळक्याने त्याच्यावर सतत घाव घातले. पण हा माणूस तेवढ्यापुरता घायाळ व्हायचा व पुन्हा तावून-सुलाखून नव्याने त्यांच्यापुढे संघर्ष करायला उभा राहयचा. याच दरम्यान या वर्गाने गोपीनाथ मुंडेंचा संघर्ष आधी पेपरात वाचला, मागील दशकापासून टीव्हीत पाहिला, तर कधी आपसूकच समजून घेतला. आता मात्र आपल्या नेत्याच्या पक्षाची सत्ता आली आहे. आपल्या नेत्याला मंत्रिपद मिळेल व कित्येक वर्षांनी आपल्याला काहीतरी मिळेल, काही तरी आपल्या भागाचा विकास होईल असे वाटत होते किंवा आपले प्रतिनिधित्व करणारा तेथे कोणी तरी आहे याचे समाधान वाटणार होते. पण त्यांच्यासाठी देव असलेल्या नेत्याला नियतीनं अगदी कायमचे लांब नेले. कधीही न भेटण्यासाठी.
 
परळी मध्ये दगडफेक  झाली कारण समस्त राजकारणी नेते, संरजामशाही प्रवृत्तीचे राजकारण्यांनी आमच्या नेत्यांवर अन्याय केल्याची भावना लोकांच्या मनात आधीपासूनच खोल-खोल जखम करून बसली होती. मग त्यामध्ये सर्व समाजाचे , सर्व पक्षांचे नेते , सर्वाना एकसमान मानून दगडफेक झाली . 
 
आपल्या नेत्यासोबत दगाफटका झाल्याची भावना त्यांच्या मनात आता पुन्हा एकदा नव्याने कोरली आहे. आता मुंडेंचा अपघात की घातपात हे देवालाच ठाऊक पण ती कष्टकरी, ऊस तोडणारी जनता काय समजायचे ते समजून गेली आणि म्हणून त्यांनी दगडफेक केली.
 
संवेदनशील मानसाच्या अंतर्मनाच्या डोहात डुबलेल्या व्यथावेदनांचा तो विस्फोट होता. 
 
पूर्वीसारखी परिस्थिती नाही आता , प्रत्येक समाजामध्ये कोणी ना कोणी प्रतिनिधित्व करत आहे पण ह्या सर्वांची मोळी बांधणारा नेता उदयास आला पाहिजे .
 
 
 
सौजन्य : दिव्य मराठी , दिव्य मराठी मध्ये आलेल्या लेखाचा सारांश …