सकाळी सवयीप्रमाणे TV लावला आणि पहिली headline सुरु होती , मुंडे साहेबांना अपघात झाल्याची बातमी , detail बघणार इतक्यात दुसरी बातमी साहेब गेल्याची . मला पटेना . ३-४ channels surf केले पण तीच एक बातमी . डोके सुन्न झाले . मनामध्ये एक अनामिक भीती दाटली . आता कुठे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सरंजामशाही चं पानिपत होण्याची चिन्ह होती आता त्याला एक तडा पडलेला दिसत होता …
पश्चिम महाराष्ट्राचं साला नशीबच फुटक वाईट .बहुजन समाजाला तर त्याहून मोठा फटका.
स्वतः आठवले दलित समाजाचे नेते असून कधी कोणाला ते आपले का वाटत नाहीत या उलट मुंडे साहेब नेहमीच आपले वाटले , कारण सर्वसमावेशक वृत्ती , समजून घेण्याची प्रवृत्ती
वर्षानवर्षे पिचलेली मराठवाड्यासह राज्याच्या कानाकोप-यातील लोकं खासकरून गरीब, कष्टकरी ऊस तोड करणारा वर्ग, वंजारी, बहुजन समाज असा ख-या लाभांपासून, सुविधापासून स्वातंत्र भारताच्या 67 वर्षानंतरही वंचित आहे. आज मिळेल, उद्या मिळेल या आशेवर हा समाज आजही जगतो आहे.
याच वर्गातून, समाजातून वर आलेले व तावून-सुलाखून निघालेले गोपीनाथ मुंडेंसारखे नेतृत्त्व तयार झाले होते. या माणसाने कायम त्यांना जगण्याची नवी ऊर्मी, ऊर्जा दिली. सकारात्मक विचार करायला भाग पाडले.
राजकीय जीवनात आल्यापासून संघर्ष सुरू होता ते मरेपर्यंत संघर्ष केला या माणसाने. त्या माणसाला कधी एखाद्या गोष्टीचे क्रेडिटही दिले नाही या सो कॉल्ड राजकीय व्यवस्थेने, त्याचा सन्मान तर सोडाच. कोण हा मुंडे, वंजारी समाजातील माणूस आम्हाला आव्हान देतोय असे येथील संरजामशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना वाटत होते. खरं इथे जातीचा काहीच संबंध नाही आहे तो 'आहे रे' आणि 'नाही रे' या वर्गाचा. पिढ्यानपिढ्या गरीबी, कष्टकरी, शेतकरी, आपल्या संरजामशाही व्यवस्थेमुळे कायम भरडून निघालेली तळातील गोरगरीब जनतेला कोणी वालीच नव्हता. या वावटळात त्यांना गोपीनाथ मुंडे नावाच माणूस दिसला. जो या वर्गाची भाषा तो बोलायचा व तो आपला पोशिंदा होऊ शकतो असे या वर्गाला वाटायचे. या लोकांसाठी मुंडे नावाचा माणूस गेली 4 दशके संघर्ष करीत होता. या दरम्यान या माणसाने अनेकांना शिंगावर घेतले. पण सर्व प्रस्थापित राजकीय टोळक्याने त्याच्यावर सतत घाव घातले. पण हा माणूस तेवढ्यापुरता घायाळ व्हायचा व पुन्हा तावून-सुलाखून नव्याने त्यांच्यापुढे संघर्ष करायला उभा राहयचा. याच दरम्यान या वर्गाने गोपीनाथ मुंडेंचा संघर्ष आधी पेपरात वाचला, मागील दशकापासून टीव्हीत पाहिला, तर कधी आपसूकच समजून घेतला. आता मात्र आपल्या नेत्याच्या पक्षाची सत्ता आली आहे. आपल्या नेत्याला मंत्रिपद मिळेल व कित्येक वर्षांनी आपल्याला काहीतरी मिळेल, काही तरी आपल्या भागाचा विकास होईल असे वाटत होते किंवा आपले प्रतिनिधित्व करणारा तेथे कोणी तरी आहे याचे समाधान वाटणार होते. पण त्यांच्यासाठी देव असलेल्या नेत्याला नियतीनं अगदी कायमचे लांब नेले. कधीही न भेटण्यासाठी.
परळी मध्ये दगडफेक झाली कारण समस्त राजकारणी नेते, संरजामशाही प्रवृत्तीचे राजकारण्यांनी आमच्या नेत्यांवर अन्याय केल्याची भावना लोकांच्या मनात आधीपासूनच खोल-खोल जखम करून बसली होती. मग त्यामध्ये सर्व समाजाचे , सर्व पक्षांचे नेते , सर्वाना एकसमान मानून दगडफेक झाली .
आपल्या नेत्यासोबत दगाफटका झाल्याची भावना त्यांच्या मनात आता पुन्हा एकदा नव्याने कोरली आहे. आता मुंडेंचा अपघात की घातपात हे देवालाच ठाऊक पण ती कष्टकरी, ऊस तोडणारी जनता काय समजायचे ते समजून गेली आणि म्हणून त्यांनी दगडफेक केली.
संवेदनशील मानसाच्या अंतर्मनाच्या डोहात डुबलेल्या व्यथावेदनांचा तो विस्फोट होता.
पूर्वीसारखी परिस्थिती नाही आता , प्रत्येक समाजामध्ये कोणी ना कोणी प्रतिनिधित्व करत आहे पण ह्या सर्वांची मोळी बांधणारा नेता उदयास आला पाहिजे .
सौजन्य : दिव्य मराठी , दिव्य मराठी मध्ये आलेल्या लेखाचा सारांश …
No comments:
Post a Comment