Total Pageviews

देवाचं confusion.....

एक खूप छान वाक्य वाचनात आलं माणसाला देव जन्माला घालतो कि नाही माहित नाही पण देवाला'मात्र माणूसच जन्माला'घालतो'

पि. क़े  च्या अनुशंघाने पुन्हा एकदा विषय डोक्यात आला .

देव असतो का खरच आणि कितपत मानायचा , आपले खरच wrong number लागताहेत का?

मी स्वतः खूप confused आहे ,

 मला गाभारे आवडतात  , तिथली  निरव  शांतता  मला  मंदिरांकडे  खेचते , चर्च मधील वातावरण सुद्धा तितकच आवडत , मित्रांसोबत खूप वेळा मस्जिद मध्ये सुद्धा गेलोय नमाज पढतात ती जागा आवडते .
                 पण मला मूर्तीपूजा नाही पटत किंवा उगाच धर्माच्या नावाचा उदो उदो नाही भावत .

मूर्त्याच सौंदर्य आवडत , पण म्हणून
                 मुद्दाम १० वेळा डोकं टेकवायला नाही आवडत ,

स्वच्छता हवी ,
              प्रथा परंपरा ओवळ सोवळ नाही पटत , कोणाचा अधिकार मान्य करणं व नाकारणं नाही पटत

रोज सकाळी संध्याकाळी दिवा लावलेला आवडतो
               पण त्यासाठी घरी देव्हारा असावा कि नसावा ह्यावर अजून माझ्या मनाचं एकमत नाही

शिर्डी चे साईबाबा , स्वामी समर्थ ह्यांचे तत्वज्ञान , राहणीमान विचारसरणी पटते
               पण त्यांनी केलेले चमत्कार नाही पटत

 meditation आवडतं म्हणजे शांत बसून मन एकाग्र करणं
              पण देवाचा जप नाही आवडत

देवाला न मानणारे बाबा आमटे ,डॉ . प्रकाश आमटे समाजासाठी आयुष्य पणाला लावतात .
               so called धर्म रक्षक आसाराम बलात्कार करतो , देवाचा पुजारी भक्तांना खोटं नाट सांगून लुटतो , मस्जिद चा मुल्ला हुकुमशाही करतो , मंदिरांचे पुजारी जातीभेद पाळतात , माणसा माणसा मध्ये भेदभाव द्वेष पसरवतात 

नेमकं काय मानायचं आणि  काय मानायचं नाही . घरचे , बाहेरचे वयाने मोठे लोक अनुभवाच्या गोष्टी सांगतात पण बऱ्याच वेळा नाही पटत . शास्त्रीय शतकामध्ये चमत्काराला थारा द्यावासा नाही वाटत .

मुळात कर्म ,आचार विचार चांगले असले कि चांगलंच घडतं , म्हणतात ना पृथ्वी गोल आहे जे आपण फेकणार ते पुन्हा आपल्याकडेच येणार . मग तरीसुद्धा आपल्याला का गरज पडते देव नामक कुबड्यांची . कारण मला अस वाटत आपल्याकडे तितका संयम नाही . ह्या फास्ट जगामध्ये आपल्याला सर्व गोष्टी खूप लवकरात लवकर हव्या असतात मग त्यासाठी shortcuts शोधणे ओघाने आलच आणि जिद्दी स्वभाव पाहिजे म्हणजे पाहिजे त्यासाठी काहीही करायची तयारी जे आहे किंवा जे आयुष्यात चालून येईल त्यावर समाधान मानता आलं पाहिजे मग कदाचित ह्या कुबड्यांची गरज नाही पडणार .


 आता हे confusion कसं घालवणार , स्वतःपुरता एक प्रयोग करूया म्हणतोय अनायासे नवीन वर्ष चालू होतंय .

१ जानेवारी नेहमीप्रमाणे शिर्डी ला जावून प्रयोगाला सुरुवात करतो वर्षभर देव न मानण्याची व देवासाठी काही न करण्याची . पाहूया काय बदल घडतो आयुष्यामध्ये…

माणसाला माणसाप्रमाणे वागवून पाहूया कदाचित तिथेच so called देव सापडेल

तुमच्या ओळखीच्या देवांना नक्की निरोप सांगा , ३१ तारखेपर्यंत वेळ आहे , मला भेटायचं असल्यास भेटून घ्या पुन्हा वर्षभर appointment नाही … 

भावलेले नमुने - भाग 1 - सम्याचे आजोबा

आज शेवटी सम्याचाच फोन आला अरे अप्प्या पूर्ण कर काय ते एकदाचा किती दिवस वाट बघायची , आजोबा सुद्धा वाट पाहताहेत तुझ्या पुढच्या लिखाणाची मग शेवटी लिहायला घेतला पुढचा भाग.

३ दिवस सलग सुट्टी जोडून आली , मोठी सुट्टी आली कि मी निप्पाणॆला पळायचो पण आई गॆलेलि तिच्या माहेरी म्हणून मग दांडेली चा प्लान ठरला . जाताना एक दिवस व एक रात्र  सम्याकडे खानापूर आणि मग पुढे दांडेली .

आम्ही KSRTC ने निघालो खानापूर stand वर पोचलो तर गाडी न्यायला , सम्या चा एक मोठा भाऊ सफारी घेवून आलेला . घरी पोचायला जेमतेम ५ mins लागली . एवढ्या  जवळ घर असून गाडी न्यायला आम्ही already बिचकलेलो . भंबेरी उडाली ती आजोबाना बघून

तो आला त्याने पहिल आणि त्याने जिंकलं हे नेहमी ऐकलंय पण ते आले आणि त्यांनी अंकित केल असं म्हणाव लागेल . जबरदस्त fan झालो मी त्यांचा   . विरासत movie मधले अमरीश पुरी . shakehand करताना जाणवलेला भारदस्त हात . अस्सलिखित इंग्लिश मध्ये विचारपूस , आमच तस इंग्लिश पहिल्यापासून कच्चंच . फक्त जुजबी बोलत होतो आम्ही . सम्या ने बहुतेक आमची अडचण ओळखली आणि आम्हाला घेवून आत पळाला .


सम्याच्या घरी भरपूर मानसं , २ काका त्यांच्या २ बायका , २ चुलत भाऊ आणि २ चुलत बहिणी , सख्खी एक बहिण , आई ,वडील आणि आजी . २ आत्या त्यांच्या  सासरी .


सम्या एकदा बोलता बोलता म्हणालेला मला आठवत होत कि त्याच्या आजीच सोवळ खूप कडक असत , घरी जावं कि नको ह्या विचारांचा गुंता सम्या नेच सोडवला आणि त्याने सांगितलं ते सोवळ तिची पूजा होईपर्यंत बाकी कोणाला कुठे आणि कोणतेच निर्बंध नाहीत आणि सांगितली घरच्या जातींची भेळमिसळ .

साम्याचे आजोबा ९६ कुळी , आजी आणि एका चुलत भावाची बायको देशस्थ , आई चांभार , मोठ्या  काकाची बायको नवबौद्ध , लहान काकाची बायको christian

हि सगळी लग्न ठरवून केलेली , एकही love marriage नाही . आजोबा कलंदर ,  ठरवायचे कोणती जात व धर्म राहिलाय घरी यायचा , ज्याचं लग्न करायचं त्याला पूर्ण अधिकार आपला जोडीदार निवडायचा

सम्याचे आजोबा म्हणजे स्वातंत्र्यसैनिक , गांधी वादी पण भगतसिंग चा समाजवादाचे पुरस्कर्ते ,  विनोबा भवेंच्या चळवळी मध्ये स्वतःची ५० acre जमीन दान केलेली पण कालांतराने शेतीच्या जोरावर ५० acre ची पुन्हा १५० acre केलेली . एक प्रगतशील शेतकरी , विचाराने वागण्याने काळाच्या पुढे . घरची पूर्ण परिस्थिती पाहिल्यावर आणि management पाहिल्यावर superb fan झालो .

सम्याचे वडील डॉक्टर , गावीच मोठा दवाखाना , आजी आणि आई राजकारणी , मोठा काका वकील ,काकी वकील  आणि लहान काका professor ,काकी शेतीतज्ञ . चुलत भाऊ आणि त्याची बायको  डॉक्टर .

प्रत्येक family ची २५ acre ची जबाबदारी . आणि आजोबांकडे ७५ acre . त्यापैकी ५० acre त्यांनी shares करून वापरायला दिलेली समान अधिकाराने .

 स्वतःच्या घरची dairy . वेळ पडली तर प्रत्यॆक्जन शिक्षण विसरून dairy सांभाळतो . मालकी हक्क आजीकडे आणि सगळ्या भगिनी मंडळाकडे .

अक्ख्या जिल्ह्यामध्ये त्यांचा दरारा , मोठ मोठ्या चळवळी आंदोलन त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आखल्या जायच्या .

त्यांच्याशी बोलताना अख्खा विकिपीडिया समोर आला अस वाटलं . असा एकही विषय नव्हता ज्याच त्यांना ज्ञान नाही .

वारसाहक्काने जरी सुब्बत्ता असली तरी कुठेही उहापोह नाही घरी,बाहेर  स्त्रियांना समान वागणूक .

चालू काळानुसार चालण्याची उमेद , विचार

ज्या घराची मुळ इतकी घट्ट आणि त्यांच्या थिंकिंग बाबत पारदर्शी आहेत त्या घरच्या पिढ्या समाधानीच होणार .

असे सम्याचे आजोबा , आपल्या समाजामध्ये वावरत असलेले खरेखुरे भारतरत्न .