आज शेवटी सम्याचाच फोन आला अरे अप्प्या पूर्ण कर काय ते एकदाचा किती दिवस वाट बघायची , आजोबा सुद्धा वाट पाहताहेत तुझ्या पुढच्या लिखाणाची मग शेवटी लिहायला घेतला पुढचा भाग.
३ दिवस सलग सुट्टी जोडून आली , मोठी सुट्टी आली कि मी निप्पाणॆला पळायचो पण आई गॆलेलि तिच्या माहेरी म्हणून मग दांडेली चा प्लान ठरला . जाताना एक दिवस व एक रात्र सम्याकडे खानापूर आणि मग पुढे दांडेली .
आम्ही KSRTC ने निघालो खानापूर stand वर पोचलो तर गाडी न्यायला , सम्या चा एक मोठा भाऊ सफारी घेवून आलेला . घरी पोचायला जेमतेम ५ mins लागली . एवढ्या जवळ घर असून गाडी न्यायला आम्ही already बिचकलेलो . भंबेरी उडाली ती आजोबाना बघून
तो आला त्याने पहिल आणि त्याने जिंकलं हे नेहमी ऐकलंय पण ते आले आणि त्यांनी अंकित केल असं म्हणाव लागेल . जबरदस्त fan झालो मी त्यांचा . विरासत movie मधले अमरीश पुरी . shakehand करताना जाणवलेला भारदस्त हात . अस्सलिखित इंग्लिश मध्ये विचारपूस , आमच तस इंग्लिश पहिल्यापासून कच्चंच . फक्त जुजबी बोलत होतो आम्ही . सम्या ने बहुतेक आमची अडचण ओळखली आणि आम्हाला घेवून आत पळाला .
सम्याच्या घरी भरपूर मानसं , २ काका त्यांच्या २ बायका , २ चुलत भाऊ आणि २ चुलत बहिणी , सख्खी एक बहिण , आई ,वडील आणि आजी . २ आत्या त्यांच्या सासरी .
सम्या एकदा बोलता बोलता म्हणालेला मला आठवत होत कि त्याच्या आजीच सोवळ खूप कडक असत , घरी जावं कि नको ह्या विचारांचा गुंता सम्या नेच सोडवला आणि त्याने सांगितलं ते सोवळ तिची पूजा होईपर्यंत बाकी कोणाला कुठे आणि कोणतेच निर्बंध नाहीत आणि सांगितली घरच्या जातींची भेळमिसळ .
साम्याचे आजोबा ९६ कुळी , आजी आणि एका चुलत भावाची बायको देशस्थ , आई चांभार , मोठ्या काकाची बायको नवबौद्ध , लहान काकाची बायको christian
हि सगळी लग्न ठरवून केलेली , एकही love marriage नाही . आजोबा कलंदर , ठरवायचे कोणती जात व धर्म राहिलाय घरी यायचा , ज्याचं लग्न करायचं त्याला पूर्ण अधिकार आपला जोडीदार निवडायचा
सम्याचे आजोबा म्हणजे स्वातंत्र्यसैनिक , गांधी वादी पण भगतसिंग चा समाजवादाचे पुरस्कर्ते , विनोबा भवेंच्या चळवळी मध्ये स्वतःची ५० acre जमीन दान केलेली पण कालांतराने शेतीच्या जोरावर ५० acre ची पुन्हा १५० acre केलेली . एक प्रगतशील शेतकरी , विचाराने वागण्याने काळाच्या पुढे . घरची पूर्ण परिस्थिती पाहिल्यावर आणि management पाहिल्यावर superb fan झालो .
सम्याचे वडील डॉक्टर , गावीच मोठा दवाखाना , आजी आणि आई राजकारणी , मोठा काका वकील ,काकी वकील आणि लहान काका professor ,काकी शेतीतज्ञ . चुलत भाऊ आणि त्याची बायको डॉक्टर .
प्रत्येक family ची २५ acre ची जबाबदारी . आणि आजोबांकडे ७५ acre . त्यापैकी ५० acre त्यांनी shares करून वापरायला दिलेली समान अधिकाराने .
स्वतःच्या घरची dairy . वेळ पडली तर प्रत्यॆक्जन शिक्षण विसरून dairy सांभाळतो . मालकी हक्क आजीकडे आणि सगळ्या भगिनी मंडळाकडे .
अक्ख्या जिल्ह्यामध्ये त्यांचा दरारा , मोठ मोठ्या चळवळी आंदोलन त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आखल्या जायच्या .
त्यांच्याशी बोलताना अख्खा विकिपीडिया समोर आला अस वाटलं . असा एकही विषय नव्हता ज्याच त्यांना ज्ञान नाही .
वारसाहक्काने जरी सुब्बत्ता असली तरी कुठेही उहापोह नाही घरी,बाहेर स्त्रियांना समान वागणूक .
चालू काळानुसार चालण्याची उमेद , विचार
ज्या घराची मुळ इतकी घट्ट आणि त्यांच्या थिंकिंग बाबत पारदर्शी आहेत त्या घरच्या पिढ्या समाधानीच होणार .
असे सम्याचे आजोबा , आपल्या समाजामध्ये वावरत असलेले खरेखुरे भारतरत्न .

No comments:
Post a Comment