Total Pageviews

हौशी दिंडी

  


नमस्कार माऊली , दिंडी सोबतचे दोन दिवस अभूतपूर्व अनुभवाने भारावलेले अहेत.शब्दात मांडणे कठीण .  जितकं जमेल तितकं प्रयत्न करतो.

वारी ला जायचं ठरलं त्यादिवसापासून चातकासारखी शुक्रवार ची वाट पहात होतो .. गुरुवारी संध्याकाळी ठाण्याहून निघून पुण्याला पोचलो,शुक्रवारी सकाळी without alarm किशोर ने उठवले आणि अतुल ला घेवून  करून सासवड कडे निघालो..

सासवड ला पोचलो आणि पूर्णपणे त्या वातावरणाचा एक भाग होवून गेलो …  हळू हळू एक एक  दिंडी मार्गक्रमण करत होती ..संपूर्ण सासवड जणू वारकरी संप्रदायाच headquarter   बनलं होतं .. नजर जाईल तिथपर्यंत वारकरी …
 तुफान enthu होतो.. वारी ला जायचं , पालखी सोबत चालायचं ,दिंडी अनुभवायची , वारकरी पाहायचे ह्या सर्व curiosity ला आज एक स्वल्पविराम मिळणार हे जाणवत होतं..

आम्ही आमच्या दिंडी ला भेटून पालखी च्या दर्शनाला निघालो आणि समोर माऊली … मनसोक्त दर्शन माऊली सर्वांची . पोलिस असो व पालखीचे पुजारी कोणीही कोणाला धक्का देत नव्हतं . पुढे व्हा हे वाक्यच मुळी माझ्या कानावर दोन दिवसात कानावर पडलं नाही.
पालखीचे , रथाचे फोटो काढायला कोणी कोणाला मनाई करत नाही उलट फोटो व्यवस्थित यावा म्हणून जागा करून देणारे माऊली भेटले .. 

दिंडी सोबत चालताना अजिबात थकवा जाणवत नाही.  आम्ही मात्र आमच्या नेहमीच्या सवयीने थोडं दिंडी सोबत थोडं पालखीसोबत इकडे तिकडे फोटो काढत मस्त वारी हिंडत होतो . दिंडी सोबत चालताना थकवा न जाणवण्याच भक्तिमय तसेच शास्त्रीय कारण सुद्धा जाणवत एक म्हणजे कानावर पडणारे भक्तिमय अभंगांचे भजनाचे स्वर जे तुम्हाला तुमचा दुखणं विसरायला भाग पडतात दुसरं म्हणजे चालण्याची लय. एका प्रमाणबद्ध साच्यामध्ये चालण्याची लयीमुळे सुद्धा थकवा जाणवत नाही .


दिवस संपता संपता जेजुरी आलं . जेजुरीचा खंडोबा म्हणजे शिवाचा अवतार तर विठ्ठलाचे वारकरी म्हणजे वैष्णवांचा मेळा असा अभूतपूर्व संगम जेजुरी ला होतो आणि मग वारकऱ्यांच्या उत्साहाचं
उधान आश्चर्यकारक असत ,फुगड्या ,अभंग ,भजनाचा जोर जेजुरी दणाणून सोडतो . जवळपास 2 0 कि मी चालून जिथे आमचे पाय पांडुरंगाचा धावा  करत होते तिथे हा जोश पाहून आम्ही सुद्धा आमचं दुखणं विसरून त्या भक्तिभावात रंगून गेलो न सुटणारी वारीची काही गणित मनामध्ये साठवून . 





सामाजिक समता हे वारीच ठळक वैशिष्ठ , स्त्री पुरुष नाही कि कोणत्या जातीधर्माचा नाही , भेदभाव ह्या शब्दाला मुळी थाराच नाही असे म्हणा ना . सगळे माऊली ,सर्व समसमान . स्त्रियांसाठी basic गरजांसाठी 
कोणत्याही प्रकारची सुखसुविधा नसताना सुद्धा कोणताही गैरप्रकार निदर्शनास येत नाही ,जवळपास ४0 -5 0 % स्त्री वारकरी माउलींच्या ह्या दिंडीमध्ये पूर्णपणे सुरक्षित असतात ,एका निर्मल निखळ भावनेने दिंडी विठ्ठलाच्या दर्शनसाठी उत्सुक असते 


वरून राजाची  हजेरी हा आमच्या हौशी दिंडी च्या वारकऱ्यांचा चर्चेचा आवडता विषय ,जिथे माउली तिथे पाऊस ,अंदाजे 3-4 किमी नंतर माउलींचा विसावा असतो ,पालखी रथामधून बाहेर काढली जाते आणि विसावाच्या ठिकाणी दर्शनसाठी ठेवली जाते ,पालखी दर्शनसाठी बाहेर काढली कि पावसाचा शिडकावा ,विसाव्यानंतर पुन्हा ठेवली कि शिडकावा ,माउली मुक्कामाच्या ठिकाणी पोचल्या कि पुन्हा पाऊस 
साक्षात  वरून राजा ला  माउलींचा ठाव ठिकाण वारकऱ्यांना कळवणारा संदेश वाहक बनून वारी ची सेवा करावीशी वाटत असेल .


वारी ची अघोषित शिस्त  ,नियोजन अलिखित नियम अवर्णनीय आहेत  ,मुक्कामाची जागा ठरलेली कोणाचा तंबू कुठे ते ठरलेला दिंडी चा नंबर ठरलेला ,कुठे काही कोणत्या गोष्टीचं वाटप होत असेल तर automatically लागलेली रांग ,सुमारे 700 वर्षापूर्वीची हि परंपरा ,नियोजन आणि follow करणारे वारकरी बहुतेक करून अशिक्षित ,शेतकरी ,कष्टकरी तरीसुद्धा सर्व गोष्टी ठरल्याप्रमाणे ठरवलेल्या वेळी आपसूक घडून येतात .

ज्या गावी माउली मुक्काम असतो त्या गावाचं भाग्य थोर आणि ते गाव सुद्धा त्याप्रमाणे वागतं ,थोडाफार घनकचरा जमा होतोच पण म्हणून कोणाची तक्रार नाही याउलट वारी मध्ये असणाऱ्या तब्बल 300-350 tankers ना पाणी भरण्याची मोफत सोय केलेली असते 

ह्या सगळ्या अनुभवांची शिदोरी घेवून वेल्हे मधून परत येताना विठ्ठलाला न भेटल्याची रुख रुख तेवढी लागली 
पुढच्या वर्षी पुढच्या टप्प्या नंतर तसेच पुढे जाऊन पांडुरंगाला भेटून आल पहिजे. 

दिंडी ची क्षणचित्रे । 

https://picasaweb.google.com/113389852492662368643/Wari2013?authkey=Gv1sRgCKbW6pyO6texLA#


किशोर माउली ह्यांचा ब्लॉग आणि क्षणचित्रे

पुरुषप्रधान संस्कृती म्हणजे जतिभेदच.....



पुरुषप्रधान संस्कृती म्हणजे स्त्रियांच दुय्यम स्थान म्हणजे एक प्रकारे मनुस्मृती ने तयार केलेली दुवर्निय व्यवस्था ,पुरुषप्रधान संस्कृती खर पाहायला गेल तर मनुस्मृतीच product 
 
थोडक्यात आपण दोन्ही मधले सम समान धागे पाहूयात 
 
मुळात चातुर्वर्णीय व्यवस्था , जातीभेद,पुरुषप्रधान संस्कृती  निर्माण झाले ह्याची कारण म्हणजे 
 
१. संपूर्ण वर्चस्व - वर्चस्व निर्माण करण्याच्या दोन पद्धती असतात , स्वतःला  सामर्थ्यशाली बनवणे किंवा स्पर्धा संपविणे ,त्यामध्ये सुरुवातीला दुसऱ्या मार्गाचा अवलंब दिसतो  . ज्यामध्ये  ठराविक काम ठराविक वर्गासाठी राखीव ठेवली ,योग्यतेनुसार न ठेवता जन्मानुसार कोणी कोणती कामं करायची आणि त्यामध्ये इतर जातींचा व वर्णांचा हस्तक्षेप निषिद्ध मानला थोडक्यात ते सुद्धा त्या काळच सत्तेसाठी व आर्थिक आरक्षण. स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण केली गेली . म्हणजे चूल आणि मुल किंवा चार भिंती मध्ये त्यांचं स्थान ,जन्मानुसार स्त्री म्हणून योग्यता असताना सुद्धा पुरुषांच्या बरोबरीची काम करायला मज्जाव ,त्यामुळे पुरुषांच  अघोषित वर्चस्व निर्माण झालं . 
 
२. शोषण - जेव्हा वर्चस्व निर्माण होत तेव्हा बलशाली गटाकडून कमजोर गटाचा शोषण अपरिहार्य आहे ,त्यासाठी कोणत्या एका जातीला व वर्णाला दोष देता येत नाही कारण मूळ मानवी स्वभावामध्ये ते दडलेलं आहे ज्याप्रमाणे वर्चस्वित उच्चवर्नियांकडून खालच्या जातींचा शोषण केल जायचं त्याचप्रमाणे पुरुषांकडून स्त्रियांचा केला जायचा ,शोषण म्हणजे मुलभूत हक्कांची पायमल्ली करीत ,कामाचा योग्य मोबदला न देत काम करवून घेणे मुळात म्हणजे पुरुष हा पूर्णपणे स्त्री वर अवलंबून असतो कारण पुरुषाचं मानसिक स्वास्थ्य जपण्याच कार्य स्त्री करते पण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ती एक जबाबदारी व शोषणाच मध्यम बनविल 
 
३. पिळवणूक - असीमित शोषण म्हणजे पिळवणूक , शोषणाला जेव्हा विरोध होत नाहीये असा दिसत तेव्हा पिळवणूक सुरु होते . आणि त्यातून जेव्हा एखाद्या गोष्टीकडे भोगवादी गोष्ट म्हणून पाहण्यात येते तेव्हा पिळवणूक सुरु होते. ज्याप्रमाणे उच्च जातींकडून खालच्या जातींची पिळवणूक झाली त्याचप्रमाणे पुरुषांकडून स्त्रियांची झाली 
 
४. असुरक्षितता - ह्या सगळ्या च मूळ कारण हेच होत असुरक्षितता ,कारण जर सर्वाना 
सम समान मानलं गेल असतं तर एक healthy स्पर्धेच वातावरण असतं ,आणि योग्यतेनुसार वा कष्टानुसार गोष्ट वेगळी असती 
 
हे सर्व झालं त्या काळच, मुळात जातीभेद इतका रुजला आहे कि काही उच्च जातीच्या स्त्रियांना त्यांची तुलना खालच्या जातीच्या लोकांशी केलेली आवडणार सुद्धा नाही  ,
पण स्त्रियांनी समजून घेतलं पाहिजे कि ज्याप्रमाणे घरोघरी त्यांच्यावर ज्याप्रमाणे अन्याय झाले त्याचप्रमाणे समाजामध्ये वावरताना काही ठराविक वर्गांसोबत झाले किंवा तथाकथिक खालच्या जातींच्या लोकांनी सुद्धा स्वतः आपल्या घरातील स्त्रियांशी वागताना जो जातीभेद बाहेर समाजामध्ये अनुभवला त्यांनी घरी तो स्त्रियांसोबत टाळावा .
       
           

 
 
 मुळातच जन्मानुसार योग्यता ठरविणे चुकीचे ,आपण ह्या व्यवस्थेचे इतके सच्चे पायिक झालो आहोत कि सहज बोलताना वागताना तो जाणवतो ,घरातील कामे असोत व ऑफिस मधील,आपण त्यांच्या दैनंदिन सम्यसेचे निराकरण न करता त्याचे भांडवल करून दुय्यम स्थानी राहण्यास भाग पाडतो .  
ज्या ज्या ठिकाणी संधी मिळाली व त्यांनी हिसकावून घेतली त्या त्या ठिकाणी स्त्रियांनी बायकांना काय कळत हे वाक्य काळाच्या पडद्याआड नेवून ठेवलं आहे… म्हणून इथून पुढे समाज सुधारणीच्या विचारसरणीने जातीभेद उच्चाटन फक्त जाती-जाती मध्ये न पाहता पुरुष स्त्री च्या जातीभेदाच उच्चाटन  सुद्धा डोळस पणे पहिल पाहिजे ,तरच खऱ्या अर्थाने जातिभेदाच समूळ उच्चाटन शक्य होइल. 
 
 
 
 

आजचा दिवस माझा - सर्वसामान्य गोष्टीसाठी केलेली असामान्य धडपड

 
 
 
 
आजचा दिवस माझा - सर्वसामान्य गोष्टीसाठी केलेली असामान्य धडपड

सचिन खेडेकर (मुख्यमंत्री ) ,अश्विनी भावे (सौ .मुख्यमंत्री ) ,  रिषीकेश जोशी (personnel assistant)   ,महेश मांजरेकर ( IAS ऑफिसर) ,आनंद  इंगळे ,पुष्कर ,लीना भागवत ( अधिकारी वर्ग )  अशी तगडी स्टार कास्ट ह्या सगळ्यांच्या अभिनयाविषयी मी काय बोलावे
चंद्रकांत कुलकर्णी ह्याचा दिग्दर्शन लहान लहान प्रसंगातून सुद्धा छाप उमटवून जातं , सध्यस्थिती वास्तवाशी थोडाफार फारकत असलेला चित्रपट जरी असला तरीसुद्धा राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीने काहीही अशक्य  नाही हा संदेश देण्यात चित्रपट कुठेच कमी पडत नाही किंबहुना दाखवून देतो कि राजकीय इच्छाशक्तीने काय शक्य आहे .
चित्रपटामधील घडामोडींचा काळ फक्त एका दिवसाचा ,त्यातून मुख्य कथानक दुपारी ३ ते पहाटे ६  इतक .
राजकीय इच्छाशक्तीने प्रेरित मुख्यमंत्री , त्यांची जमेल तितक स्वच्छ प्रशासन देण्याची धडपड त्याजोगे करावं or else केलेल राजकारण ,स्वामी निष्ट पत्नी , विश्वासू तसेच संवेदनशील स्वीय सहायक ,सोबत सरकारी कर्मचारी वर्ग काम म्हणजे उपकार ह्याभावनेतून काम करणारा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे UPSC मधून आलेला IAS अधिकारी सर्वात मोठी शिक्षा म्हणजे बदली आणि त्यातून आलेला  माज, एक प्रामाणिक पत्रकार ह्या सगळ्यांना सोबत पूर्ण एक दिवसाची  कथा .
मुख्यमंत्र्यांच संवेदनशील मन त्यांना  खटकलेली एक गोष्ट आणि मग ती पूर्ण करण्यासाठी केलेला रात्रीचा दिवस हि कथेची बांधणी खूप अप्रतिम आहे ,चित्रपटाच्या मूळ गाभ्याच्या सोबत चित्रपट पुढे सरकत असताना सुद्धा दैनदिन राजकीय घडणाऱ्या गोष्टींकडे कानाडोळा केलेला नाहीये ,त्या लहान सहान घटना त्यांचे अस्तित्व दाखवतात  
मुख्यमंत्री - IAS ऑफिसर ह्याचं संभाषण ,मुख्यमंत्र्यांच विविध प्रसंगावर केलेल भाष्य , मुख्यमंत्री आणि त्यांची पत्नी ह्याचं संभाषण , स्वींय सहायक आणि त्याच्या मुलाचं संभाषण ,सौ  मुख्यमंत्री यांनी घेतेलेला निर्णय वर्तमान काळातील शासन प्रशासनावर अचूक भाष्य  करून मनाचे ठाव घेतात ,विचार करायला भाग पाडतात 
नेहमी सारखा गोड गोड शेवट न घेता , समर्पक शेवट आहे तो असा कि एक चांगल काम करून सुद्धा अजून भरपूर काम शिल्लक असल्याची दाखवलेली जाणीव 
वर्तमान स्थिती पाहता  हा चित्रपट वास्तववादी नाही वाटला तरीसुद्धा एक वेगळी सकारात्मक विचारसरणी रुजवून जातो . कधी कधी फायदे तोटे ,राजकारण न पाहता कुणीतरी कुणासाठी झटलेल पहिल कि समाजकारणासाठी प्रशासन अस्तित्वात येण्याची आस लागते 
जनता ,शासन ,प्रशासन ह्यांनी सर्वांनी एकदा तरी पाहावा असा चित्रपट
 
( चित्रपटाच्या कथेबद्दल मुद्दाम detail मध्ये सांगत नाही कारण theatre मध्ये पाहावा अशी इच्छा )

एक नवा अध्याय लिखाणाचा...

नवीन वर्षाची सुरुवात झाली कि किरणदादा हमखास एक नवीन डायरी आणून देतो तसेच नवीन नवीन पेन घेण्याची खूप हौस, गेल्या  ३ वर्षाच्या नवीन नवीन डायऱ्या आणि खूप सारे पेन्स जमले होते हे सर्व सार्थकी लावायच होतच त्यातून एक मस्त किस्सा घडला कि लिहायची सुरुवात करावी लागली
       बस च्या पावसामध्ये गाणी ऐकणं आणि लोकल च्या प्रवासामध्ये पुस्तक वाचन हि दोन आवडिची  काम संध्याकाळची वेळ  आणि कांजूर to cst उलटा प्रवास  असल्यामुळे लोकल ला तशी फार गर्दी नव्हती  मस्त window सीट  मिळाली नवीन घेतलेलं शोध स्वामी विवेकनंदांचा हे दाभोळकरांच पुस्तक काढलं अनि डोकं खुपसलं इतका तल्लीन झालो होतो कि कधी एक एक स्टेशन मागे पडत होती काही कळत नव्हत ,इतक्यात आवाज आला " पुस्तक खूप छान आहे पण वाचल्यावर चिंतन जरूर कर "मी डोकं वर काढून पहिल एक परिटघडिचा  माणूस बोलत होता मी हो नक्कीच  म्हणालो आणि पुन्हा डोक खुपसनार इतक्यात दुसरा प्रश्न आदळला "तू नेहमी अशी पुस्तकं वाचतोस का तुला sociology ची आवड आहे का ?" अस पटकन मी इतका संवाद साधत नाही पण माणूस बरा वाटला  म्हणून बोलणं चालू ठेवूया अस ठरवलं आणि म्हणालो नाही जे आवडेल , कोणी सुचवेल ते वाचतो लगेच पुढचा प्रश्न "वाचून काय करतोस " मी बोललो काहीच नाही कधीतरी मित्रांसोबत बोलताना share 
 करतो,समजून घेतो ,मनाला पडलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर मिळतात  आणि पुढच्या प्रश्नाची वाट बघू लागलो , तो माणूस विचारात पडल्यासारखा झाला आणि म्हणाला "तुला जे वाटत ते बरोबर असत कशावरून ?  तुमचा काही कट्टा वैगेरे आहे आहे का ? तू ब्लॉग लिहितोस का ?" ह्या सर्व गोष्टींचा कधी विचार केल्याचं आठवेना सुद्धा झाल आणि सहज उत्तर निघालं नाही … त्यावर लगेच त्यांनी बोलायला सुरुवात केली "आपला मेंदू म्हणजे एक कपाट आहे आणि त्यामध्ये असंख्य कप्पे आहेत तू ते कप्पे भरतो आहेस पण ते फक्त भरलेले आहेत ,त्यांचा recycling होणं गरजेचं आहे. तू वाचलेल , त्यावर तुझे विचार ते नमूद करणं आवश्यक आहे , तुला तरी कस कळणार तू वाचलेलं बरोबर आहे कि चूक ,थोडक्यात सांगायचं तर तुला उमजलेलं सर्व काही जसच्या तस बरोबर आहे कि विचारांची दिशा बरोबर कि चूक ? वाचनावर कधीही बंधनं नसावीत पण एक दिशा नक्कीच असावी आणि ती दिशा वाचन संस्कृती जोपासल्यामुळे होते ,वाचन संस्कृती म्हणजे काय ,आपण वाचतो त्याची चर्चा त्यावर समीक्षा त्या अनुषंगाने तुमची कार्यपद्धती "
क्षणभर विचारात पडलो ,बोलत होते ते पटत होतं ,विचारातून बाहेर येवून पाहतो तर माणूस गायब ,इतक नक्की आठवतं कि मध्ये कोणतही स्टेशन आल नाही ,कदाचित माझाच मला झालेला  भास ,माझं मला उमगलेलं उत्तर ,गेल्या काही दिवसांत बरीच वेगवेगळ्या विषयांची पुस्तक वाचनात आली,पण विचारांचा वेगळा गोंधळ जाणवत होता  ,तो का व कशामुळे होता ते नव्हत कळत ,कदाचित त्याच उत्तर सापडत होत… 

खाजगी,कार्यालयीन ,सार्वजनिक आयुष्यात खूप साऱ्या घटना घडत आहेत , त्यावर विचारांची एक माळ गुंफली जातीये ,ती फक्त जपमाळ बनून राहिलीये . या जपमाळेचा काहीच कुठे होत नाहीये ,ह्या जपमाळेचा  योग्य ठिकाणी जप होणं  आवश्यक आहे . रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलंय "Mind all Reason is knife all edge, it bleeds the hands that hold it.सततच तर्ककर्कश असणारं मन बुद्धी म्हणजे मूठ नसलेलं सुर्‍याचं पातं,जे हात ते पातं पकडतील तेच रक्तबंबाळ होतील" हे मुठ नसलेलं पात होवू द्यायचं नाही । एक विचारांची दिशा कळली आपोआप तर्कवितर्क ह्यांना विराम मिळेल आणि त्याच रुपांतर एका ठराविक विचारसरणी मध्ये होईल 
ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून हा अध्याय लिखाणाचा तुम्हा सर्वांच्या सोबतीने  ….