Total Pageviews

पुरुषप्रधान संस्कृती म्हणजे जतिभेदच.....



पुरुषप्रधान संस्कृती म्हणजे स्त्रियांच दुय्यम स्थान म्हणजे एक प्रकारे मनुस्मृती ने तयार केलेली दुवर्निय व्यवस्था ,पुरुषप्रधान संस्कृती खर पाहायला गेल तर मनुस्मृतीच product 
 
थोडक्यात आपण दोन्ही मधले सम समान धागे पाहूयात 
 
मुळात चातुर्वर्णीय व्यवस्था , जातीभेद,पुरुषप्रधान संस्कृती  निर्माण झाले ह्याची कारण म्हणजे 
 
१. संपूर्ण वर्चस्व - वर्चस्व निर्माण करण्याच्या दोन पद्धती असतात , स्वतःला  सामर्थ्यशाली बनवणे किंवा स्पर्धा संपविणे ,त्यामध्ये सुरुवातीला दुसऱ्या मार्गाचा अवलंब दिसतो  . ज्यामध्ये  ठराविक काम ठराविक वर्गासाठी राखीव ठेवली ,योग्यतेनुसार न ठेवता जन्मानुसार कोणी कोणती कामं करायची आणि त्यामध्ये इतर जातींचा व वर्णांचा हस्तक्षेप निषिद्ध मानला थोडक्यात ते सुद्धा त्या काळच सत्तेसाठी व आर्थिक आरक्षण. स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण केली गेली . म्हणजे चूल आणि मुल किंवा चार भिंती मध्ये त्यांचं स्थान ,जन्मानुसार स्त्री म्हणून योग्यता असताना सुद्धा पुरुषांच्या बरोबरीची काम करायला मज्जाव ,त्यामुळे पुरुषांच  अघोषित वर्चस्व निर्माण झालं . 
 
२. शोषण - जेव्हा वर्चस्व निर्माण होत तेव्हा बलशाली गटाकडून कमजोर गटाचा शोषण अपरिहार्य आहे ,त्यासाठी कोणत्या एका जातीला व वर्णाला दोष देता येत नाही कारण मूळ मानवी स्वभावामध्ये ते दडलेलं आहे ज्याप्रमाणे वर्चस्वित उच्चवर्नियांकडून खालच्या जातींचा शोषण केल जायचं त्याचप्रमाणे पुरुषांकडून स्त्रियांचा केला जायचा ,शोषण म्हणजे मुलभूत हक्कांची पायमल्ली करीत ,कामाचा योग्य मोबदला न देत काम करवून घेणे मुळात म्हणजे पुरुष हा पूर्णपणे स्त्री वर अवलंबून असतो कारण पुरुषाचं मानसिक स्वास्थ्य जपण्याच कार्य स्त्री करते पण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ती एक जबाबदारी व शोषणाच मध्यम बनविल 
 
३. पिळवणूक - असीमित शोषण म्हणजे पिळवणूक , शोषणाला जेव्हा विरोध होत नाहीये असा दिसत तेव्हा पिळवणूक सुरु होते . आणि त्यातून जेव्हा एखाद्या गोष्टीकडे भोगवादी गोष्ट म्हणून पाहण्यात येते तेव्हा पिळवणूक सुरु होते. ज्याप्रमाणे उच्च जातींकडून खालच्या जातींची पिळवणूक झाली त्याचप्रमाणे पुरुषांकडून स्त्रियांची झाली 
 
४. असुरक्षितता - ह्या सगळ्या च मूळ कारण हेच होत असुरक्षितता ,कारण जर सर्वाना 
सम समान मानलं गेल असतं तर एक healthy स्पर्धेच वातावरण असतं ,आणि योग्यतेनुसार वा कष्टानुसार गोष्ट वेगळी असती 
 
हे सर्व झालं त्या काळच, मुळात जातीभेद इतका रुजला आहे कि काही उच्च जातीच्या स्त्रियांना त्यांची तुलना खालच्या जातीच्या लोकांशी केलेली आवडणार सुद्धा नाही  ,
पण स्त्रियांनी समजून घेतलं पाहिजे कि ज्याप्रमाणे घरोघरी त्यांच्यावर ज्याप्रमाणे अन्याय झाले त्याचप्रमाणे समाजामध्ये वावरताना काही ठराविक वर्गांसोबत झाले किंवा तथाकथिक खालच्या जातींच्या लोकांनी सुद्धा स्वतः आपल्या घरातील स्त्रियांशी वागताना जो जातीभेद बाहेर समाजामध्ये अनुभवला त्यांनी घरी तो स्त्रियांसोबत टाळावा .
       
           

 
 
 मुळातच जन्मानुसार योग्यता ठरविणे चुकीचे ,आपण ह्या व्यवस्थेचे इतके सच्चे पायिक झालो आहोत कि सहज बोलताना वागताना तो जाणवतो ,घरातील कामे असोत व ऑफिस मधील,आपण त्यांच्या दैनंदिन सम्यसेचे निराकरण न करता त्याचे भांडवल करून दुय्यम स्थानी राहण्यास भाग पाडतो .  
ज्या ज्या ठिकाणी संधी मिळाली व त्यांनी हिसकावून घेतली त्या त्या ठिकाणी स्त्रियांनी बायकांना काय कळत हे वाक्य काळाच्या पडद्याआड नेवून ठेवलं आहे… म्हणून इथून पुढे समाज सुधारणीच्या विचारसरणीने जातीभेद उच्चाटन फक्त जाती-जाती मध्ये न पाहता पुरुष स्त्री च्या जातीभेदाच उच्चाटन  सुद्धा डोळस पणे पहिल पाहिजे ,तरच खऱ्या अर्थाने जातिभेदाच समूळ उच्चाटन शक्य होइल. 
 
 
 
 

No comments: