Total Pageviews

हौशी दिंडी

  


नमस्कार माऊली , दिंडी सोबतचे दोन दिवस अभूतपूर्व अनुभवाने भारावलेले अहेत.शब्दात मांडणे कठीण .  जितकं जमेल तितकं प्रयत्न करतो.

वारी ला जायचं ठरलं त्यादिवसापासून चातकासारखी शुक्रवार ची वाट पहात होतो .. गुरुवारी संध्याकाळी ठाण्याहून निघून पुण्याला पोचलो,शुक्रवारी सकाळी without alarm किशोर ने उठवले आणि अतुल ला घेवून  करून सासवड कडे निघालो..

सासवड ला पोचलो आणि पूर्णपणे त्या वातावरणाचा एक भाग होवून गेलो …  हळू हळू एक एक  दिंडी मार्गक्रमण करत होती ..संपूर्ण सासवड जणू वारकरी संप्रदायाच headquarter   बनलं होतं .. नजर जाईल तिथपर्यंत वारकरी …
 तुफान enthu होतो.. वारी ला जायचं , पालखी सोबत चालायचं ,दिंडी अनुभवायची , वारकरी पाहायचे ह्या सर्व curiosity ला आज एक स्वल्पविराम मिळणार हे जाणवत होतं..

आम्ही आमच्या दिंडी ला भेटून पालखी च्या दर्शनाला निघालो आणि समोर माऊली … मनसोक्त दर्शन माऊली सर्वांची . पोलिस असो व पालखीचे पुजारी कोणीही कोणाला धक्का देत नव्हतं . पुढे व्हा हे वाक्यच मुळी माझ्या कानावर दोन दिवसात कानावर पडलं नाही.
पालखीचे , रथाचे फोटो काढायला कोणी कोणाला मनाई करत नाही उलट फोटो व्यवस्थित यावा म्हणून जागा करून देणारे माऊली भेटले .. 

दिंडी सोबत चालताना अजिबात थकवा जाणवत नाही.  आम्ही मात्र आमच्या नेहमीच्या सवयीने थोडं दिंडी सोबत थोडं पालखीसोबत इकडे तिकडे फोटो काढत मस्त वारी हिंडत होतो . दिंडी सोबत चालताना थकवा न जाणवण्याच भक्तिमय तसेच शास्त्रीय कारण सुद्धा जाणवत एक म्हणजे कानावर पडणारे भक्तिमय अभंगांचे भजनाचे स्वर जे तुम्हाला तुमचा दुखणं विसरायला भाग पडतात दुसरं म्हणजे चालण्याची लय. एका प्रमाणबद्ध साच्यामध्ये चालण्याची लयीमुळे सुद्धा थकवा जाणवत नाही .


दिवस संपता संपता जेजुरी आलं . जेजुरीचा खंडोबा म्हणजे शिवाचा अवतार तर विठ्ठलाचे वारकरी म्हणजे वैष्णवांचा मेळा असा अभूतपूर्व संगम जेजुरी ला होतो आणि मग वारकऱ्यांच्या उत्साहाचं
उधान आश्चर्यकारक असत ,फुगड्या ,अभंग ,भजनाचा जोर जेजुरी दणाणून सोडतो . जवळपास 2 0 कि मी चालून जिथे आमचे पाय पांडुरंगाचा धावा  करत होते तिथे हा जोश पाहून आम्ही सुद्धा आमचं दुखणं विसरून त्या भक्तिभावात रंगून गेलो न सुटणारी वारीची काही गणित मनामध्ये साठवून . 





सामाजिक समता हे वारीच ठळक वैशिष्ठ , स्त्री पुरुष नाही कि कोणत्या जातीधर्माचा नाही , भेदभाव ह्या शब्दाला मुळी थाराच नाही असे म्हणा ना . सगळे माऊली ,सर्व समसमान . स्त्रियांसाठी basic गरजांसाठी 
कोणत्याही प्रकारची सुखसुविधा नसताना सुद्धा कोणताही गैरप्रकार निदर्शनास येत नाही ,जवळपास ४0 -5 0 % स्त्री वारकरी माउलींच्या ह्या दिंडीमध्ये पूर्णपणे सुरक्षित असतात ,एका निर्मल निखळ भावनेने दिंडी विठ्ठलाच्या दर्शनसाठी उत्सुक असते 


वरून राजाची  हजेरी हा आमच्या हौशी दिंडी च्या वारकऱ्यांचा चर्चेचा आवडता विषय ,जिथे माउली तिथे पाऊस ,अंदाजे 3-4 किमी नंतर माउलींचा विसावा असतो ,पालखी रथामधून बाहेर काढली जाते आणि विसावाच्या ठिकाणी दर्शनसाठी ठेवली जाते ,पालखी दर्शनसाठी बाहेर काढली कि पावसाचा शिडकावा ,विसाव्यानंतर पुन्हा ठेवली कि शिडकावा ,माउली मुक्कामाच्या ठिकाणी पोचल्या कि पुन्हा पाऊस 
साक्षात  वरून राजा ला  माउलींचा ठाव ठिकाण वारकऱ्यांना कळवणारा संदेश वाहक बनून वारी ची सेवा करावीशी वाटत असेल .


वारी ची अघोषित शिस्त  ,नियोजन अलिखित नियम अवर्णनीय आहेत  ,मुक्कामाची जागा ठरलेली कोणाचा तंबू कुठे ते ठरलेला दिंडी चा नंबर ठरलेला ,कुठे काही कोणत्या गोष्टीचं वाटप होत असेल तर automatically लागलेली रांग ,सुमारे 700 वर्षापूर्वीची हि परंपरा ,नियोजन आणि follow करणारे वारकरी बहुतेक करून अशिक्षित ,शेतकरी ,कष्टकरी तरीसुद्धा सर्व गोष्टी ठरल्याप्रमाणे ठरवलेल्या वेळी आपसूक घडून येतात .

ज्या गावी माउली मुक्काम असतो त्या गावाचं भाग्य थोर आणि ते गाव सुद्धा त्याप्रमाणे वागतं ,थोडाफार घनकचरा जमा होतोच पण म्हणून कोणाची तक्रार नाही याउलट वारी मध्ये असणाऱ्या तब्बल 300-350 tankers ना पाणी भरण्याची मोफत सोय केलेली असते 

ह्या सगळ्या अनुभवांची शिदोरी घेवून वेल्हे मधून परत येताना विठ्ठलाला न भेटल्याची रुख रुख तेवढी लागली 
पुढच्या वर्षी पुढच्या टप्प्या नंतर तसेच पुढे जाऊन पांडुरंगाला भेटून आल पहिजे. 

दिंडी ची क्षणचित्रे । 

https://picasaweb.google.com/113389852492662368643/Wari2013?authkey=Gv1sRgCKbW6pyO6texLA#


किशोर माउली ह्यांचा ब्लॉग आणि क्षणचित्रे

1 comment:

Chandan Yadav said...

Lai bhari Chandu..varicha anubhav ala

Kishor n tu mast blog lihile ahet..

next year mi tumhala join karnyacha nakki praytan karin..