मला नेहमी सतावणारा प्रश्न कर्तव्य कोणती मग त्या सोबत आलेली जबाबदारी आणि ते सगळ सांभाळताना कधी कधी वाटणारं अपेक्षांचे ओझे .
कोणतेही'नातेसंबंध घ्या बहिण-भाऊ , मुले-पालक , नवरा-बायको , संदीप खरे यांनी म्हटलं त्याप्रमाणे हाका चालू नाती चालू . पण हीच नाती सांभाळताना कसरत होते का , किंवा परस्पर दोन्ही बाजूनी तितकीच जबाबदारी पेलली जाते का
आजकालच्या पिढीमध्ये म्हणजे nuclear कुटुंब पद्धती आणि वेगाने पुढे जाणारे जग त्या जगाशी स्पर्धा करताना किंवा त्या जगाशी जुळवून घेताना घ्यावे लागणारे निर्णय , स्वयंपूर्ण ,स्वयंसिद्ध व्यक्तिमत्वाने घेतलेले स्वताच्या मनाचे निर्णय ह्या नाते संबंधामध्ये कुठेतरी अडसर होताना दिसताहेत . कर्तव्याच्या नावाखाली अपेक्षांचे ओझे वाढतेय कि केवळ एक जबाबदारी म्हणून कर्तव्य पार पडली जाताहेत ???
मारून मुसलमान करणं हा वाक्यप्रचार इथे तंतोतंत लागू पडतो , स्वताच मन एका निर्णयाच समर्थन करत असत पण त्याचबरोबर मग आपल्या नात्यांवर होणारा त्याचा परिणाम म्हणून ते बदलावे लागतात . पण ते बदलून आपण खरच तस जगू शकतो?
दोन दगडांवर पाय ठेवणार्या माणसाच्या पायाखाली नेहमी दरी असते , कोणता तरी एक दगड निवडावा लागतो पण तो दगड निवडताना आपण नेहमी आपल्यावर काही शेकणार नाही असा दगड निवडतो आणि तिथेच फसतो कारण तो दगड निवडताना आपण नेहमी मी हे कर्तव्यापोटी केला असा बजावत असतो आणि मग ते शेवटी कर्तव्य होत. जगण संपून जात पण हीच गोष्ट जे नतेसंबंध टिकवण्यासाठी केलेली असते त्यांना त्यामागची भूमिका जाणवत नाही कारण प्रत्येक नतेसंबंध सोबत आलेल्या अपेक्षा , कर्तव्य आणि अपेक्षा ह्याचा सुटलेला ताळमेळ
एक मेकांच्या निर्णयाचा सन्मान ठेवणे , एक मेकांच्या निर्णयाची जबाबदारी घेणे हि खरी आपल्या मनुष्याच्या नतेसंबंधाचि गोडी पण कुठेतरी अनुभव किंवा वय किंवा मग वडीलधारेपण ह्या अनुशंघाने तेच निर्णय मागे घ्यायला लावण किंवा आपलाच हेकेखोर पण पुढे चालवणं सर्रास दिसतात
मानवी जीवन खडतर आहे , प्रत्येक मनुष्याची वागण्याची तऱ्हा वेगळी विचार वेगळा . पण एका नात्यात जगताना एक सूत्रात हवी एक मेकांच्या निर्णयाची जबाबदारी हवी . मुळात कर्तव्य आणि अपेक्षा ह्यामध्ये गल्लत नसावी तरच नातेसंबंध सुधारतील अन्यथा फक्त उरतील कर्तव्य पार पडण्याच्या जबाबदाऱ्या आणि त्यासोबत येणारे अपेक्षांचे ओझे
No comments:
Post a Comment