मागच्या आठवड्यामध्ये मराठा आणि मुस्लिम समाजासाठी महाराष्ट्र मध्ये आरक्षण लागू झाले आणि पुन्हा एकदा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आला .
आरक्षणाच्या दृष्टीने पडलेले काही प्रश्न ….
खरच आपल्या समाजाला आरक्षणाची गरज आहे का?
आरक्षण ह्या कुबड्या आहेत का?
आरक्षणामुळे जनमानसामध्ये एखाद्या विशिष्ठ समाजाचा काही फायदा होतो का?
आरक्षणामुळे समाजमन उंचावल तरी बाकीच्या समाजाकडून ते स्वीकारलं जात का?
जाता नाही जात हि म्हण आरक्षणामुळे कालबाह्य होईल कि चालना मिळेल
त्यामुळे फायदे जास्त आहेत कि तोटे जास्त ?
आरक्षण कोणासाठी ?
असे अनेक प्रश्न उफाळून आले बऱ्याच प्रश्नांची उत्तर वेगवेगळ्या मित्रांसोबत झालेल्या चर्चा , वादविवाद ह्यातून मिळत गेली पण बरेच प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत . कदाचित तुमच्या मार्फत मिळू शकतील हि अपेक्षा .
खरच आपल्या समाजाला आरक्षणाची गरज आहे का?
हो आहे गरज … आपल्या समाजामध्ये अजूनही बरेच वर्ग आहेत जे दुर्लक्षित आहेत , त्यांचा समाजस्तर , आर्थिकस्तर उंचावण्याची गरज आहे . पण कोणाला मागास समजायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न . हा प्रश्न थोडा लवचिक आहे कारण आरक्षण सर्वाना पाहिजे असेल पण मागास म्हणवून घेण आवडणार नाही . आरक्षणाच्या काही अटी नियम लागू केले पाहिजेत तरच त्यांचा कुबड्या म्हणून वापर टळेल .
आरक्षण फक्त एका पिढीसाठी पूर्ण देशामध्ये , नाहीतर एक पिढी एका राज्यात दुसरी पिढी दुसर्या राज्यात असे महाभाग सुद्धा कमी नाहीयेत . एका पिढीने एकदा कोणत्याही म्हणजे शैक्षणिक , नोकरीसाठी आरक्षणाचा लाभ घेतला तर दुसऱ्या पिढीने घेवू नये . दुरुपयोग असा होतो आरक्षणाचा फायदा घेवून समाजामधील काही लोक गब्बर होतात आणि मग पुन्हा त्यांचीच मुल आरक्षणाचा फायदा घेतात . उपेक्षित समाज लांब राहतो ज्यांच्यासाठी हि सोय केली त्यांना फायदा होताना दिसत नाही .
माझ्यासारख्या आर्थिक सामाजिक स्थेर्य लाभलेल्या लोकांनी तर आजीबात जवळपास सुद्धा फिरकू नये
आरक्षण ह्या कुबड्या आहेत का?
ज्यांनी पूर्वी कधी फायदा घेतला त्यांच्यासाठी नक्कीच आहेत . आपल्याकडे कोणतीही गोष्ट गृहीत धरण्याची खूप जुनी परंपरा आहे . आरक्षणासारखी गोष्ट कशी गृहीत धरायची राहील ? हं पण ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी नाहीत कुबड्या
आरक्षणामुळे जनमानसामध्ये एखाद्या विशिष्ठ समाजाचा काही फायदा होतो का?
आरक्षणामुळे समाजमन उंचावल तरी बाकीच्या समाजाकडून ते स्वीकारलं जात का?
दोन्ही प्रश्न एकदम घेतोय कारण दोन्हीची उत्तर परस्पर संबंधित आहेत . फायदा नक्की होतो कारण आर्थिक स्तर उंचावतो , त्या त्या समाजापुरता विचार केला तरीसुद्धा समाजमन थोडाफार उंचावत पण समाजाच्या मुख्य धारेमध्ये सामावून घेतलं जात का?
नाही … आजही एक विशिष्ठ प्रकारची विचारधारा समाजामध्ये 'जिवंत आहे ज्यामध्ये तुमच्या आर्थिक,सामाजिक स्तराचा विचार न करता पुर्वंपार चालत आलेल्या जातीव्यवस्थेवर अवलंबून आहे .
तुम्ही आरक्षण घ्या अगर न घ्या ठराविक वर्गामध्ये तुम्हाला ढकललं जात . उदाहरणार्थ माझे अनेक मित्र आहेत जे'कुणबी आहेत ,वाणी आहेत ज्यांना OBC चा reservation लागू आहे . पण ते आरक्षण घेत नाहीत कारण त्यांना आरक्षण म्हणजे स्वतःला मागास जातीमध्ये गेल्यासारखं वाटत पण आपला समाज त्यांना open वाले समजत नाहीये . त्यांना त्यांच्या जातीप्रमाणे संबोधतो . एका विशिष्ट समाजाला मुख्य सामाजिक धारेमध्ये सामावून घेण्यासाठी आरक्षणाचा पर्याय आला पण तो सर्वांनी स्वीकारला नाहीये आणि समजा माझ्यासारख्या आर्थिक सामाजिक स्थेर्य लाभलेल्या माणसाने आरक्षण नाकारल तर पुन्हा open ची जागा बळकावली म्हणून ओरड मग एखादा माणूस का नाकारेल आरक्षण ?
जाता नाही जात हि म्हण आरक्षणामुळे कालबाह्य होईल कि चालना मिळेल
त्यामुळे फायदे जास्त आहेत कि तोटे जास्त ?
नाही नक्कीच नाही , जात हा प्रकार ह्यामुळे कधीच पुसला जाणार नाही . बदलत्या काळानुसार नक्कीच लोप पावतोय पण टक्केवारी मुळे आणखी वाढेल कि काय हि एक भीती वाटते.
आरक्षण कोणासाठी ?
सगळ्यात जटील प्रश्न , आर्थिक बाबीवर आरक्षण द्यावं का? पण आपल्याकडे खरीखुरी आर्थिक परिस्थिती'दाखवणे शक्य आहे का? आजही बरेचसे व्यवहार कॅश मध्ये चालतात ज्यांच कुठेही लेखाजोखा नसतो . मग आर्थिक बाबींवर कस देणार आरक्षण
मला असं वाटतं आरक्षण हि एक मानसिक गरज आहे . मुख्य धारेमध्ये सर्व जातींना जर सामावून घेण्याचा प्रयत्न झाला तर कोणत्याही समाजाला स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कोणत्याही अधिकाराची गरज भासणार नाही .रोटीबेटी चे व्यवहार कदाचित एक पर्याय असू शकेल .
तुम्हाला काय वाटत ?? नक्की कळवा …
No comments:
Post a Comment