Total Pageviews

मुखवट्यांचा मंच


मी तसा थोडासा सैलसर म्हणजे जेव्हा जे वाटेल ते बोलून रिकामा होणारा . मित्र असो सोबत कि मैत्रीण जे दिसलं त्यावर मत मांडणारा . त्यामुळे एक स्पष्टव्क्त्याची वेगळीओळख माझी मित्र मैत्रिणींमध्ये तयार झालीये . थोडक्यात सांगायचा झालं तर मैत्रिणीच्या नवर्यासमोर तिला आज चांगली दिसातीयेस किंवा सुंदर मैत्रिणीसमोर तिच्यापेक्षा सुंदर मैत्रीण दाखवणे , manager ला कॅन्टीन मध्ये सुंदर मुलगी दाखवणे , मित्रांना आजूबाजूचे comedy निरीक्षण दाखवणे'. सांगायचा मुद्दा काय मी असा मोकळा ढाकळा .

             हल्लीच माझं लग्न ठरलंय तर लग्नाळलेला मी , लग्नाळलेला दिसला रे दिसला कि आपल्याकडे प्रत्येकजण लगेच' उपदेश सल्ले द्यायला चालू करतो . माझी एक मैत्रीण जिचा संसार अंदाजे १३-१४ वर्षे झालाय तिने  एक सल्ला आला कि बाबा रे आता जरा विचार करून वाग , माझा प्रतिप्रश्न होताच म्हणजे मी नेमक काय करायचं , आता जरा जपून वाग मोकळं वागायचं बंद कर . म्हणजे जे मनात येईल ते बोलायचं नाही , तस वागायचं नाही का ? तर सरळ उत्तर आल नाही तस आता वागायचं नाही . म्हणजे थोडक्यात आता मुखवटा चढवायचा .

            राजेश खन्ना यांचं आनंद फिल्म मध्ये एक सुंदर वाक्य आहे. आपलं जीवन एक रंगमंच आहे आणि आपण सगळे फक्त कलाकार मुखवटे चढवलेले .
           ऑफिस ला गेलो वेगळा मुखवटा , घरी आलो वेगळा , मुलांसोबत वेगळा , आई वडिलांसोबत वेगळा , बायकोसोबत नवऱ्याचा आणि नवऱ्यासोबत बायकोचा वेगळा .
           अरे पण आपण पारदर्शक का नाही वागू शकत , जे आहे मनात ते का   नाही बोलू शकत . इतकं प्लास्टिक जग झालंय कि आपल्या मनामध्ये चालू असणाऱ्या घडामोडींना वाट करून द्यायचीच नाही का ? 

तिच्यासोबतच चर्चा वाढली  तसे तिने अनेक गोष्टी सांगितल्या . तिच म्हणणं अस होत कि बोलायचं आपण आपल्याला जे वाटत पण बायकोशी किंवा नवर्याशी नाही . पती धर्म , पत्नी धर्म वेगळा तो आपण व्यवस्थित  पाळायचा , म्हणजे काही लपव असं नाही पण जेवढ त्याला झेपेल , त्याला समजेल तेवढंच सांगायचं . मित्र मैत्रिणी होण , पारदर्शी नाती ह्या सगळ्या कालबाह्य संकल्पना आहेत . आजकाल कोण कधी कोणत्या गोष्टीचा फायदा घेईल सांगू शकत नाही सो जपून . उदाहरणार्थ माझ आणि माझ्या बहिणीचं भांडण किंवा माहेराबाबत खटकलेली गोष्ट नवऱ्याला सांगितली तर त्याचा कधी फायदा घेईल सांगू नाही शकत. एखाद्या मित्राचं व मैत्रिणीच काही सांगितल जेव्हा घरामध्ये वादविवाद होतात तेव्हा ही सगळी उदाहरण दिली जातात .

मला खूप वेगळेपण जाणवलेल माझ्या लग्नाविषयी बायकोविषयी काय संकल्पना आहेत आणि ही काय सांगतीये मग ह्या विषयावर खूप लोकांशी बोललो

           सगळ्यांच्या अनुभव सारखेच . १०० % विश्वास कोणीच कोणावर आजकाल टाकत नाहीये म्हणजे त्या सगळ्यांच्या आयुष्यात असा एकही माणूस नाही जो त्यांना पूर्णपणे ओळखतो किंवा ज्याच्यावर ते लोक १००% विश्वास टाकतात . कुठे ना कुठे एक बोच सल आहे , आलेले वाईट अनुभव आहेत कधी ना कधी घेतला गेलेला गैरफायदा आहे. लग्नाच्या वा कोणत्याही नात्याच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये जपलेल मोकळेपण कुठेतरी दुखावलं गेलय. आणि त्यामुळे आलेले कटू अनुभव आहेत , उडालेल मन आहे  पण म्हणून संसार मोडलेले नाहीयेत कारण लग्न वेगळ्या गोष्टींवर तितकं . आपल्याला आपल्या गोष्टी सांगायला एक दगड मिळाला कि झालं मग कधी कुणाचा मित्र , कुणाची आई , मैत्रीण ह्या सगळ्या भूमिका निभावत असतात .
                 
अरे पण हि प्रतारणा झाली ना , आपण लग्न करतो म्हणजे आपन एक प्रतिद्या करतो कि आपल्या आयुष्यातील पाहिलं पण तिच्यासमोर व त्याच्यासमोर उघडावं आणि तेच केल नाही तर मग कस . मुळात हे सगळ करण्यासाठी विश्वास आपण सुद्धा तेवढा टाकावा लागेल तर आपल्यावर सुद्धा तेवढाच कुणाचा तरी विश्वास बसेल एकतर्फी काहीच नसतं .तेव्हा मस्त explanation दिल .प्रतारणा वैगेरे काही नसते कारण लग्न वेगळं आणि मन समजून घेणारा साथीदार वेगळा . तो भेटलाय असं जेव्हा वाटेल तेव्हा तो एकटाच असेल पण तोपर्यंत   प्रत्येक गोष्टीसाठी एकाच व्यक्तीवर अवलंबून नाही राहायचं म्हणजे मग एक व्यक्ती आपला weakness नाही होत . वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या लोकांना . म्हणजे शेवटी मुखवटे .

     प्रत्येकासाठी वेगळा प्रत्येकाचा वेगळा … चला आजपासून आपण सुद्धा एक हिस्सा होवुया ह्या जगाचा ।












 

No comments: