आमच्या घरातील आमच्या आधीची पुर्ण पिढी बॅंकेमधे . आता माझे दोन भाऊ आणि मी बॅंकीग टेक्नाॅलाॅजी मधे . त्यामुळं बॅकींग चे एक से एक किस्से माहीत .
पप्पा तेव्हा बहुतेक अस्टिटंट मॅनेजर होते , त्यांच्याकडे आणि मॅनेजर कडे रोटेशन प्रमाणे संध्याकाळी बॅंक बंद करताना रोजची कॅश मोजून , दिवसभराचे transaction verify करुन , कॅश ची तिजोरी सील करण्याची जबाबदारी असायची .
बॅकांमधे सरप्राईज audit नावाचा प्रकार असतो त्यामधे वरच्या लेव्हल चे अधिकारी कधीही येवुन कॅश मोजतात.
पप्पा नेमके डेप्युटेशन ( दुसर्या एखाद्या ब्रॅंच मधे तात्पुरती बदली किंवा जबाबदारी ) वरती कुठेतरी होते त्यामुळे सलग महिनाभर कॅशची जबाबदारी मॅनेजर साहेबांकडे होती . त्या दिवशी सरप्राईज audit झाले आणि कॅश मोजली तर २० हजार कमी लागली . सगळ्यांची हवा टाईट झाली की कॅश कुठे गेली . सर्वात आधी कॅशियर जबाबदार , चौकशी केली तर कॅशियर पहिल्या झटक्यात कबुल झाले की त्यांनी कॅश काढली . मग मॅनेजर कडे आले की तुम्हाला तुट कशी लागली नाही त्यांनी कबुल केल की त्यांनी फक्त नोटांचे गठ्ठे मोजले . एक न एक नोट मोजली नाही ते काम फक्त श्रीखंडे साहेब करायचे . कॅशियर ने कबुल केले की त्यांना मॅनेजर ची सवय माहीत होती म्हणुन गेल्या महिण्याभरात कुठल्या ना कुठल्या बंडल मधुन एक दोन नोटा गायब केल्या . त्या कॅशियर ना कामावरून काढुन टाकल आणि मॅनेजर ह्यांच्या दोन increment कॅंसल केल्या , ही शिक्षा कदाचित जास्त असती पण ते मॅनेजर कोणीतरी रिजनल मॅनेजर चे लांबचे नातेवाईक होते.
पप्पा डेप्युटेशन ला होते ते फक्त शनिवारी यायचे , त्या दिवशी आले आणी कंटाळा आलाय म्हणुन झोपले . खरं तर पप्पा येणार म्हणुन आमच्या अंगावर काटा आलेला असायचा कारण अभ्यासाची चौकशी आणि आठवडाभर केलेले उद्योग कळणार आणि मार फिक्स . पण पप्पा झोपलेले बघुन आम्हालाच कसंतरी झाल . रात्री जेवण झाल्यावर पप्पांनी सांगितल की त्यांच्या बॅकेमधे असा घोटाळा झाला आणि कॅशियर ला काढलं . वेळ चांगली म्हणुन डेप्युटेशन होतो नाहीतर कधीतरी कंटाळा म्हणुन त्यांनी सुद्धा फक्त बंडल मोजले असते तर.....
आमची काय कोणाची ओळख नव्हती किंवा वशिला त्यामुळे निलंबन अपरिहार्य होत , त्यातुन कामाच्या बाबतीत काटेकोरपणामुळे तसेही खुप लोकांचा राग होताच , काय झाल असतं ह्या विचारान दोन दिवस झोपले नव्हते .
ही झाली मध्यमवर्गीय मानसिकता , शून्यातून विश्व निर्माण करताना आपल्या तत्वावर काम करणार्या माणसाला आपल्याकडून कोणतीही चुक होणार नाही किंवा आपल्यामुळे कोणाचे नुकसान होणार नाही ना ही घेतली जाणारी काळजी किंवा नोकरी गेली तर खायचे काय हा साधा सोपा पडलेला प्रश्न.
PNB घोटाळ्याबद्दल वाचताना नेहमी प्रश्न पडतात की कित्येक अधिकारी पकडले जातील , नजरचुकीने म्हणा किंवा वरीष्ठांची मर्जी जावु नये म्हणुन कदाचित नियमबाह्य वागले असतील पण हे जास्तीत जास्त एक दोन महिने चालु शकेल त्यापेक्षा जास्त नक्कीच नाही . संचालक मंडळ सामील असण्याची शंका येणे रास्त आहे . संचालक मंडळापैकी कोणालातरी आत घ्यायला पाहीजे सगळे पोपटासारखे बोलायला लागतील . कारण कामगार हा शेवटी कामगार असतो , कोणत्याही पदावर गेला तरी काही ना काही लिमिटेशन येतातच , जे अधिकारी चुकीचे वागले ते चुकीचेच होते पण म्हणुन त्यांच्यावर सगळ शेकु नये इतकच .खरे गुन्हेगार आतमधे जावेत .
No comments:
Post a Comment