Total Pageviews

बॅकींग घोटाळा आणि सामान्य प्रश्न

PNB मधे झालेला घोटाळा गाजतो आहे ज्यामधे असे वाचले की डेप्युटी मॅनेजर आणि क्लार्क नी मिळुन हा घोटाळा केला ज्यामधे swift मेसेजेस finacle साॅफ्टवेअर वापरुन जनरेट केले गेले . थोडे त्याविषयी.

Finacle हे एक कोअर बॅकिंग साठी वापरले जाणारे साॅफ्टवेअर आहे , Infosys कंपनी ने हे साॅफ्टवेअर बनवले , भरपुर सुविधा देते त्यामुळे भारतातील तसेच परदेशातील खुप बॅंका हेच साॅफ्टवेअर वापरतात. 

आता समजा तुम्हाला लोन मिळाले आहे तर सोप्या भाषेत सांगायचे झाले तर काय होते , जर त्या बॅंकेत तुमचे कोणतेच पूर्वीचे संबंध नसतील तर तुमचा एक कस्टमर आयडी तयार होतो मग लोन अकाउंट उघडले जाते , त्यानंतर तो कस्टमर आय डी आणि लोन अकाउंट जोडले जाते . 

हेच सेम प्रकार बॅंकिंग मधील वेगवेगळ्या सुविधा देण्यासाठी वापरले जाते म्हणजे तुम्हाला एखादे फिक्सड डीपाॅझिट करायचे असेल तर तुमचे फिक्सड डिपाॅझिट अकाउंट तुमच्या कस्टमर आयडी ला जोडलेले असेल , जे आपण नाॅर्मली बॅकींग करतो त्याला रिटेल बॅंकिंग म्हणतात म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या किंवा दोन व्यक्तीच्या नावाने असणार्या अकाउंट मधुन पैसे डेबिट(परतावा) किंवा क्रेडीट(जमा) करणे . 
अश्याच प्रकारचे वेगवेगळे अकाउंट असतात जसे की ट्रेडींग साठी वेल्थ मॅनेजमेंट वैगेरे. 

आता ह्या फिनॅकल साॅफ्टवेअर मधे सर्व यंत्रणा मेकर ,चेकर प्रणाली ने बांधील आहे म्हणजे एक युझर काहीतरी काम करणार आणि ते प्रत्येक काम कोणीतरी त्याच्या पेक्षा मोठा अधिकारी किंवा सहकारी approve करणार . 

PNB घोटाळा झालाय ज्यामधे एक मराठी मुलगा फसला गेला जो होता युझर म्हणजे प्रत्येक LOU ( letter of undertaking , थोडक्यात तुमची पैसे देण्यासाठी ची बांधिलकी ) सिस्टीम मधे डाटा entry करणारा , swift मेसेज जनरेशन साठीचा डाटा सिस्टीम मधे भरणारा. 
जेव्हा कोणीतरी ह्यांचा सुपरवायजर हे सर्व approve करेल तेव्हा तो swift message जनरेट होतो व त्या ठरलेल्या बॅकेस जातो . 

Swift म्हणजे Society for Worldwide Interbank Financial Telecommunication code. ज्यामधे ही सोसायटी प्रत्येक बॅकेस दुसर्या बॅंकेसोबत व्यवहार करण्यासाठी काही ठराविक Standard’s बनवते किंवा ठरवते जेणेकरुन संपुर्ण जगामधे बॅकींग सोपे होईल . उदाहरण द्यायचे झाले तर समजा मला दोन वेगळ्या वेगळ्या लोकांना  दोन वेगवेगळ्या बॅकेमधे असलेल्या अकाउंट मधे पैसे पाठवायचे आहेत , मी Online पोर्टल वर जावुन फंड ट्रांसफर ची रिकवेस्ट केली तर माझ्या SBI मधुन दोन्ही बॅकेस सारख्या प्रकारचे swift मेसेज जनरेट होतील ज्यामधे देणारा म्हणजे मी डिटेल्स सेम असतील पण घेणार्याचे फक्त बदललेले असतील . ज्या बँका swift सोबत कनेक्टेड आहेत त्या सर्वांकडे तो मेसेज व्यवस्थित रिड केला जाईल व पैसे पोचते होतील.ह्यामधे प्रत्येक बॅकेस एक  SWIFT code दिलेला असतो जो संपुर्ण जगामधे त्या बॅकेचा तो युनिक आय डी असतो. हे swift generation automatic होते जेव्हा कोणी approver  एखादी रिकवेस्ट approve करतो . 

आता मला पडलेले काही प्रश्न .... 
1. साधारणपणे समजा हा घोटाळा २०१० पासुन सुरु आहे व LOU दिले गेले व त्यानुसार परदेशातील बॅकांना पैसे पोच झाले पण मोदीने ते बॅकेला भरले नाहीत त्यामुळे साहजिकच त्या वर्षीच्या बॅकींग स्टेटमेंट मधे ती तुट दिसली असणार , असे समजु की नविन LOU बनवली किंवा आपण कर्ज ज्याप्रणाने नव जुन करतो तस केल पण के कोणत्याही वर्षीच्या audit मधे कसे काय सापडले नाही . 

2. ही रक्कम सर्वसाधारण नसणार म्हणजे फक्त डेप्युटी मॅनेजर आणि क्लार्क एवढे मोठे स्टेटमेंट जनरेट करतात , RBI चे regulatory साठी वेगवेगळे सिस्टीम आहेत त्यांच्यासाठी ही नाॅर्मल गोष्ट असली तरी त्यांच्याकडे जाणार्या रिपोर्टस मधे हे साहजिक नमुद व्हायला पाहीजे , RBI कडे जाणारे प्रत्येक रिपोर्ट आधी बॅंकेत चेक केले जातात तेव्हा कसे काय कोणाचे लक्ष गेले नाही . 

3. पेपर मधे वाचले की जुने swift मेसेज सापडत नाहीत हे तर शक्यच नाही . सिस्टीम मधे entry केल्याशिवाय swift मेसेज जनरेट होत नाही आणि साहजिकच सिस्टीम च्या डाटाबेस मधे किमान ३-४ ठीकाणी त्याची entry असायलाच पाहीजे. 

4. आता कोणी फोन केला आणि लगेच ते LOU तयार झाले अस होत नाही काही ना काही लेखी रेकाॅर्ड असेलच . साध होम लोन समजा ठराविक रकमेच्या वर गेले तर झोनल मॅनेजर चे वैगेरे approval लागते तर मग फक्त डेप्युटी मॅनेजर च्या सांगण्यावरून कसे काय जनरेट झाले . बॅक लेखी रेकाॅर्ड किंवा असे approval नाकारते जे अजिबात पचण्यासारखे नाही. किमान कोणीतरी डायरेक्टर ह्यामधे सामील असण्याची शक्यता नाकारतां येत नाही .

No comments: