एकदा कबड्डी साठी काॅलेज कडुन बेंगलोर ला मॅचेस साठी गेलेलो , आम्हाला थोड्या जास्त अपेक्षा होत्या पण पहिलीच मॅच हरली म्हणुन गम हलका करायला पहिल्यांदा पब मधे गेलेलो . तिथे आम्ही नेमक काय आणि कसे नाचलो ( मला तर गणपती डान्स पण येत नाही ) त्यामुळे मी काय नाचलो असेन का डाउटच आहे .
मुंबईमध्ये इतक्या वेळा कोण ना कोण बोलवायच पण डान्स येत नाही म्हणुन जायचो नाही . कामानिमित्त हैद्रबाद ला गेलो आणि तिथल्या टीममेट ने एका पब ला नेलं . मी आपला एक काॅर्नर च्या टेबल वर माझा माझा कार्यक्रम करत बसलो . तिथे आलेल्या मुला मुलींमध्ये पहिल्यांदा पब कल्चर पाहायला मिळाले . कोणत्यातरी कंपनी ची पार्टी असावी पण बिनधास्त नाचत होते , बेफाम झालेले सर्व. त्यातला एक मॅनेजर ओळखीचा निघाला त्याची टीम आणि तो इतके मिक्स झालेले कि विचारायला नको . मी नको म्हणत असताना ओढुन नेले , आजुबाजुच्या टेबल वर पण माझ्यासारखे एक दोन चार फक्त बसलेले त्यांना पण नेले . एक वेगळ्या प्रकारचा स्ट्रेस बस्टर पाहायला मिळाला. कामाच्या , बाकीच्या सगळ्या ताणतणावातुन बेफाम नाचणारे पाहीले.
काही दिवसांपूर्वी शाळेचा मित्र आला सिंगापुरमध्ये , दोघेही काही काळापुरते बॅचलर आणि महत्वाचे म्हणजे आयुष्यात खुप कमी लोक असतात ज्यांच्यासोबत आपण मोकळे असतो त्यात आमच्या शाळेच्या मित्रांचा एक नंबर लागतो म्हणजे एकमेकांच्या मनात काय चाललंय ह्याचा अंदाज बांधायला आम्हाला जास्त वेळ लागत नाही किंवा विचार करायला लागत नाही . मग काय गेलो दोघे पब ला . वाटलेल आपण तिथे थोराड दिसु सगळे काॅलेजवाले वैगेरे असतील . पण तस काय नव्हतच सगळे वेगवेगळ्या वयाचे आणि बेधुंद होवुन नाचणारे. कपल्स होते फॅमिलीज होत्या . काही आगाऊ कार्टी होती पण सेक्युरिटी एवढी कडक होती की एका क्षणाला वाटलेल जमलेल्या लोकांपेक्षा ते युनिफाॅर्म वाले जास्त आहेत .
मी जिथे गेलो तिथे आक्षेपार्ह काही घडल नाही किंवा पाहायला मिळाल नाही . कोणी काड्या करताना दिसल की सेक्युरिटी बाहेर काढत होते . हा झाला पब चा स्कोर . खरी गोम तिथेच आहे . पब मधे नाचल्यानंतर एवढी एनर्जी लेवल वरच्या पट्टीत पोचलेली असते की त्यांनतर त्या क्राउड ला सांभाळण किंवा त्या लोकांनी त्यांचे मन कंट्रोल करणे अवघड होत असावे आणि मग आफ्टर इफेकट्स वेगळे असावेत किंवा काही लोक काहीतरी ठरवुन जात असावेत आणि त्याचा गैरफायदा घेत असावेत . पण हे झाल ठरवुन केलेले उद्योग .
पब नावाची गोष्ट किंवा वातावरण इतक बदनाम करुन ठेवलय की त्यामुळे तिथे गेलेल्या प्रत्येकाकडे एका वेगळ्या नजरेन पाहील जात स्पष्ट बोलायच झाल तर सगळे चरित्र हीन तिथे जातात व तिथे जाणार्या सगळ्यांची लफडी असतात असा गैरसमज आहे .
पब सोडा पण आॅफिस च्या पण पार्टी मधे , लग्नाच्या वरातीमधे पण बेधुंद नाचतातच की सगळेजण मग त्याबद्दल कोणी काही म्हणते का ? कि पब मधे दारु सुद्धा असते आणि ज्या ठिकाणी दारु तो भाग वाईट असे आहे ? कोणतेही व्यसन वाईटच असते त्याबद्दल दुमत नाही पण म्हणुन असे कोणत्या एका ठिकाणाला वाईट म्हणावे असे नसते किंवा त्या ठिकाणी जाणार्या लोकांना वाईट म्हणावे असे सुद्धा नसते . रोज पुजा प्रार्थना करुन आसाराम वाईट आहेच की मग मंदिरात जाणारे सगळे तसे ठरतात का तर नाही .
बदलत्या nuclear फॅमिलीज मुळे म्हणा किंवा कट्टा संस्कृती लोप पावत असल्यामुळे लोकांना आपला ताणतणाव दुर करण्याच्या खुप कमी जागा शिल्लक राहीलेल्या आहेत त्यामुळे मग पब वैगेरे सारख्या ठिकाणी जावुन थोडा ताण हलका करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे कोणत्या एका ठिकाणावर आक्षेप घेण्यापेक्षा व्यक्ती तितक्या प्रवृत्ती हेच एक खरं मानाव.
No comments:
Post a Comment