Total Pageviews

देवाचं confusion.....

एक खूप छान वाक्य वाचनात आलं माणसाला देव जन्माला घालतो कि नाही माहित नाही पण देवाला'मात्र माणूसच जन्माला'घालतो'

पि. क़े  च्या अनुशंघाने पुन्हा एकदा विषय डोक्यात आला .

देव असतो का खरच आणि कितपत मानायचा , आपले खरच wrong number लागताहेत का?

मी स्वतः खूप confused आहे ,

 मला गाभारे आवडतात  , तिथली  निरव  शांतता  मला  मंदिरांकडे  खेचते , चर्च मधील वातावरण सुद्धा तितकच आवडत , मित्रांसोबत खूप वेळा मस्जिद मध्ये सुद्धा गेलोय नमाज पढतात ती जागा आवडते .
                 पण मला मूर्तीपूजा नाही पटत किंवा उगाच धर्माच्या नावाचा उदो उदो नाही भावत .

मूर्त्याच सौंदर्य आवडत , पण म्हणून
                 मुद्दाम १० वेळा डोकं टेकवायला नाही आवडत ,

स्वच्छता हवी ,
              प्रथा परंपरा ओवळ सोवळ नाही पटत , कोणाचा अधिकार मान्य करणं व नाकारणं नाही पटत

रोज सकाळी संध्याकाळी दिवा लावलेला आवडतो
               पण त्यासाठी घरी देव्हारा असावा कि नसावा ह्यावर अजून माझ्या मनाचं एकमत नाही

शिर्डी चे साईबाबा , स्वामी समर्थ ह्यांचे तत्वज्ञान , राहणीमान विचारसरणी पटते
               पण त्यांनी केलेले चमत्कार नाही पटत

 meditation आवडतं म्हणजे शांत बसून मन एकाग्र करणं
              पण देवाचा जप नाही आवडत

देवाला न मानणारे बाबा आमटे ,डॉ . प्रकाश आमटे समाजासाठी आयुष्य पणाला लावतात .
               so called धर्म रक्षक आसाराम बलात्कार करतो , देवाचा पुजारी भक्तांना खोटं नाट सांगून लुटतो , मस्जिद चा मुल्ला हुकुमशाही करतो , मंदिरांचे पुजारी जातीभेद पाळतात , माणसा माणसा मध्ये भेदभाव द्वेष पसरवतात 

नेमकं काय मानायचं आणि  काय मानायचं नाही . घरचे , बाहेरचे वयाने मोठे लोक अनुभवाच्या गोष्टी सांगतात पण बऱ्याच वेळा नाही पटत . शास्त्रीय शतकामध्ये चमत्काराला थारा द्यावासा नाही वाटत .

मुळात कर्म ,आचार विचार चांगले असले कि चांगलंच घडतं , म्हणतात ना पृथ्वी गोल आहे जे आपण फेकणार ते पुन्हा आपल्याकडेच येणार . मग तरीसुद्धा आपल्याला का गरज पडते देव नामक कुबड्यांची . कारण मला अस वाटत आपल्याकडे तितका संयम नाही . ह्या फास्ट जगामध्ये आपल्याला सर्व गोष्टी खूप लवकरात लवकर हव्या असतात मग त्यासाठी shortcuts शोधणे ओघाने आलच आणि जिद्दी स्वभाव पाहिजे म्हणजे पाहिजे त्यासाठी काहीही करायची तयारी जे आहे किंवा जे आयुष्यात चालून येईल त्यावर समाधान मानता आलं पाहिजे मग कदाचित ह्या कुबड्यांची गरज नाही पडणार .


 आता हे confusion कसं घालवणार , स्वतःपुरता एक प्रयोग करूया म्हणतोय अनायासे नवीन वर्ष चालू होतंय .

१ जानेवारी नेहमीप्रमाणे शिर्डी ला जावून प्रयोगाला सुरुवात करतो वर्षभर देव न मानण्याची व देवासाठी काही न करण्याची . पाहूया काय बदल घडतो आयुष्यामध्ये…

माणसाला माणसाप्रमाणे वागवून पाहूया कदाचित तिथेच so called देव सापडेल

तुमच्या ओळखीच्या देवांना नक्की निरोप सांगा , ३१ तारखेपर्यंत वेळ आहे , मला भेटायचं असल्यास भेटून घ्या पुन्हा वर्षभर appointment नाही … 

भावलेले नमुने - भाग 1 - सम्याचे आजोबा

आज शेवटी सम्याचाच फोन आला अरे अप्प्या पूर्ण कर काय ते एकदाचा किती दिवस वाट बघायची , आजोबा सुद्धा वाट पाहताहेत तुझ्या पुढच्या लिखाणाची मग शेवटी लिहायला घेतला पुढचा भाग.

३ दिवस सलग सुट्टी जोडून आली , मोठी सुट्टी आली कि मी निप्पाणॆला पळायचो पण आई गॆलेलि तिच्या माहेरी म्हणून मग दांडेली चा प्लान ठरला . जाताना एक दिवस व एक रात्र  सम्याकडे खानापूर आणि मग पुढे दांडेली .

आम्ही KSRTC ने निघालो खानापूर stand वर पोचलो तर गाडी न्यायला , सम्या चा एक मोठा भाऊ सफारी घेवून आलेला . घरी पोचायला जेमतेम ५ mins लागली . एवढ्या  जवळ घर असून गाडी न्यायला आम्ही already बिचकलेलो . भंबेरी उडाली ती आजोबाना बघून

तो आला त्याने पहिल आणि त्याने जिंकलं हे नेहमी ऐकलंय पण ते आले आणि त्यांनी अंकित केल असं म्हणाव लागेल . जबरदस्त fan झालो मी त्यांचा   . विरासत movie मधले अमरीश पुरी . shakehand करताना जाणवलेला भारदस्त हात . अस्सलिखित इंग्लिश मध्ये विचारपूस , आमच तस इंग्लिश पहिल्यापासून कच्चंच . फक्त जुजबी बोलत होतो आम्ही . सम्या ने बहुतेक आमची अडचण ओळखली आणि आम्हाला घेवून आत पळाला .


सम्याच्या घरी भरपूर मानसं , २ काका त्यांच्या २ बायका , २ चुलत भाऊ आणि २ चुलत बहिणी , सख्खी एक बहिण , आई ,वडील आणि आजी . २ आत्या त्यांच्या  सासरी .


सम्या एकदा बोलता बोलता म्हणालेला मला आठवत होत कि त्याच्या आजीच सोवळ खूप कडक असत , घरी जावं कि नको ह्या विचारांचा गुंता सम्या नेच सोडवला आणि त्याने सांगितलं ते सोवळ तिची पूजा होईपर्यंत बाकी कोणाला कुठे आणि कोणतेच निर्बंध नाहीत आणि सांगितली घरच्या जातींची भेळमिसळ .

साम्याचे आजोबा ९६ कुळी , आजी आणि एका चुलत भावाची बायको देशस्थ , आई चांभार , मोठ्या  काकाची बायको नवबौद्ध , लहान काकाची बायको christian

हि सगळी लग्न ठरवून केलेली , एकही love marriage नाही . आजोबा कलंदर ,  ठरवायचे कोणती जात व धर्म राहिलाय घरी यायचा , ज्याचं लग्न करायचं त्याला पूर्ण अधिकार आपला जोडीदार निवडायचा

सम्याचे आजोबा म्हणजे स्वातंत्र्यसैनिक , गांधी वादी पण भगतसिंग चा समाजवादाचे पुरस्कर्ते ,  विनोबा भवेंच्या चळवळी मध्ये स्वतःची ५० acre जमीन दान केलेली पण कालांतराने शेतीच्या जोरावर ५० acre ची पुन्हा १५० acre केलेली . एक प्रगतशील शेतकरी , विचाराने वागण्याने काळाच्या पुढे . घरची पूर्ण परिस्थिती पाहिल्यावर आणि management पाहिल्यावर superb fan झालो .

सम्याचे वडील डॉक्टर , गावीच मोठा दवाखाना , आजी आणि आई राजकारणी , मोठा काका वकील ,काकी वकील  आणि लहान काका professor ,काकी शेतीतज्ञ . चुलत भाऊ आणि त्याची बायको  डॉक्टर .

प्रत्येक family ची २५ acre ची जबाबदारी . आणि आजोबांकडे ७५ acre . त्यापैकी ५० acre त्यांनी shares करून वापरायला दिलेली समान अधिकाराने .

 स्वतःच्या घरची dairy . वेळ पडली तर प्रत्यॆक्जन शिक्षण विसरून dairy सांभाळतो . मालकी हक्क आजीकडे आणि सगळ्या भगिनी मंडळाकडे .

अक्ख्या जिल्ह्यामध्ये त्यांचा दरारा , मोठ मोठ्या चळवळी आंदोलन त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आखल्या जायच्या .

त्यांच्याशी बोलताना अख्खा विकिपीडिया समोर आला अस वाटलं . असा एकही विषय नव्हता ज्याच त्यांना ज्ञान नाही .

वारसाहक्काने जरी सुब्बत्ता असली तरी कुठेही उहापोह नाही घरी,बाहेर  स्त्रियांना समान वागणूक .

चालू काळानुसार चालण्याची उमेद , विचार

ज्या घराची मुळ इतकी घट्ट आणि त्यांच्या थिंकिंग बाबत पारदर्शी आहेत त्या घरच्या पिढ्या समाधानीच होणार .

असे सम्याचे आजोबा , आपल्या समाजामध्ये वावरत असलेले खरेखुरे भारतरत्न .







 

भावलेले नमुने - भाग १- समाधान म्हणजे सम्या

Engineering ला admission घेतलं आणि रवानगी बेळगाव च्या K . L E च्या होस्टेल मध्ये . G -१८ असा काहीसा माझा रूम नंबर . पहिल्या दिवशी संध्याकाळी serniors नि ragging साठी बाहेर बोलावलं . टोटल काहीतरी २० रूम्स पहिल्या वर्षाच्या मुलांसाठी होत्या . त्यापैकी फक्त ५
भरलेल्या . त्यामध्ये सुद्धा  मी आणि आणखी एकाच्या रूम मध्ये पार्टनर नव्हता .

त्यामुळे ragging साठी सगळ्यात पहिला नंबर आमचा लागला ती आमची पहिली भेट आणि एकत्र झालेलं पहिल ragging . actually आम्ही दोघेही बेळगाव जिल्ह्याचे म्हणजे थोडक्यात localite म्हणून seniors नि सुद्धा बिचकत ragging घेतलं . ragging चा सुद्धा एक किस्साच आहे . दोघांना intro द्यायला सांगितलं . आम्ही आमची नावं सांगितली मग seniors नि एकमेकांना टोपण नावं द्यायला सांगितली . मी त्याला दिलं सम्या आणि त्याने मला दिलं अप्पू . अप्पू का तर त्याने ३-४ दिवसांपूर्वी अप्पूराजा movie पाहिलेला आणि मी कमल हसन सारखा वाटलो त्याला . हे त्याने मला नंतर कधीतरी सांगितलं . मी अप्पू नाव सुरुवातीला इतक seriously घेतलं नव्हत पण बाकीच्यांनी जाम seriously घेतलं इतक कि आमचे HOD सुद्धा मला अप्पू नावानेच हाक मारायचे आजसुद्धा कोणी college च भेटलं कि अप्पू म्हणूनच हाक मारतात ।

त्या दिवसापासून सुरुवात झालेली मैत्री आजही अखंड .असा हा समाधान काही दिवसांनी झालेला सम्या.

आम्ही दोघेही मेरीट सीट असल्यामुळे रूम मेट सुद्धा मेरीट वाला असावा असा काहीसा नियम होता आणि अजून काही ब्रान्चेस चे admission व्हायचे होते म्हणून आम्ही एक एकटे रूम मध्ये . त्यामुळे पहिले ३-४ महिने दोघांपैकी कोणाच्या तरी एकाच्या रूम वर आम्ही पडीक .

नावाप्रमाणेच समाधानी मनुष्य . एकदम शांत पण बिलंदर . खोड्या करण्यात मी आणि तो सगळ्यात पुढे . होस्टेल मध्ये दादागिरी असो कि काहीही दोघे एकत्र पण त्याचा शांत चेहरा सगळ सामावून घ्यायचा आणि आडकायचो मी . वरून त्याला कन्नड यायचं . कन्नड येणारा प्रत्येक मुलगा आमच्या college मध्ये decent समजला जायचा . सीमाभागातील कन्नड सक्तीचा पहिला अनुभव मला असा आला .

 सम्याच राहणीमान सुद्धा खूप साध . पहिले ३ महिने freshers नि इन-shirt करायचा नसतो आणि shoes सुद्धा घालायचे नाहीत असा नियम त्यामुळे सुरुवातीला लक्षात आले नाही पण नंतर सुद्धा साहेब असेच . साधी बाह्यांची buttons कधी लावलि नाहीत .घरी जायचं असेल तर मात्र गडी एकदम कडक मध्ये जायचा म्हणायचा enginerring student आहे पटलं पाहिजे गावाला

family चा विषय निघाला कि इतकंच सांगायचा joint आहे आणि वडील शेतकरी . कधी कधी सफारी मधून कोणी ना कोणी गावाचं यायचं ह्याच्यासाठी खायला घेवून . आम्हाला म्हणायचा अरे दांडेली ला फिरायला जाऊया जाताना घरी एक मुक्काम करू तेव्हा कळेल family बद्दल .
पण मला एक माहित होत , सम्या ची आर्थिक स्थिती भक्कम आहे . कारण माझी बिन्दास्त प्रव्रुती म्हणून मला नेहमी पैशांची चनचन पण ह्याला कधीच नसायची .

पहिली युनिट टेस्ट झाली . ३ idiots मध्ये एक सुंदर वाक्य आहे . आपल्याला कमी मार्क्स मिळाले ह्याच दुःखा कमी असत पण आपला मित्र जर नंबर मध्ये आला तर ते दुःख जास्त होतं . माझ्यापेक्षा हुशार निघाला ना राव . आणि माझा वर्गात ५ वा आणि ह्याचा चक्क दुसरा आला . अभ्यास एकत्र मस्ती एकत्र पण मार्क्स जास्त . वर्गात सुद्धा शेवटच्या बेंचवर आम्ही दोघे . शेवटच्या बेंचवर बसणाऱ्या कोणा पोरांचा नंबर आला हे college मध्ये पहिल्यांदा घडलेलं त्यामुळे आमची जोडगोळी थोडी famous झाली .

कॉलेज मध्ये खुपदा असे हळ्हळण्याचे प्रसंग आले . महिन्याचे पैसे संपणे (घराची परिस्थिती चांगली होती पण मागायला किंचितशी लाज ती सुद्धा first year ला नंतर ती सुद्धा  गेली )  , lab assignments पूर्ण नसणे , exam मध्ये कमी मार्क मिळणे . थोडक्यात games हारणे
पण ह्या सगळ्यावर त्याच कायम एकच वाक्य असायचं everyone gets what he deserves . समाधानी रहा आणि प्रयत्न करा .

तेव्हा आम्ही खूप चिडवायचो कितीतरी उदाहरण द्यायचो कोण कसा deserving आहे आणि का नाही मिळालं म्हणून . ह्यावर सुद्धा उत्तर ठरलेलं . दोस्त जिंदगी अभी बहुत बाकी है .

हा इतका शांत आणि समाधानी कसा ह्याच मला खूप राग यायचा आणि कोड सुद्धा  असायचं, ह्याचे वडील शेतकरी पण इतके पैसे कसे ह्याच्या जवळ , घरी जाताना कडक मध्ये का जातो हि सगळी कोडी सुटली  त्याच्या घरी खानापूर ला गेल्यावर .

क्रमश 

आरक्षण - अनुत्तरीत प्रश्नसंच


मागच्या आठवड्यामध्ये मराठा आणि मुस्लिम समाजासाठी महाराष्ट्र मध्ये आरक्षण लागू झाले आणि पुन्हा एकदा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आला .

आरक्षणाच्या  दृष्टीने पडलेले काही प्रश्न ….

खरच आपल्या समाजाला आरक्षणाची गरज आहे का?
आरक्षण ह्या कुबड्या आहेत का?
आरक्षणामुळे जनमानसामध्ये एखाद्या विशिष्ठ समाजाचा काही फायदा होतो का?
आरक्षणामुळे समाजमन उंचावल तरी बाकीच्या समाजाकडून ते स्वीकारलं जात का?
जाता नाही जात हि म्हण आरक्षणामुळे कालबाह्य होईल कि चालना मिळेल
त्यामुळे फायदे जास्त आहेत कि तोटे जास्त ?
आरक्षण कोणासाठी ?

असे अनेक प्रश्न उफाळून आले बऱ्याच प्रश्नांची उत्तर वेगवेगळ्या मित्रांसोबत झालेल्या चर्चा , वादविवाद ह्यातून मिळत गेली पण बरेच प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत . कदाचित तुमच्या मार्फत मिळू शकतील हि अपेक्षा .

खरच आपल्या समाजाला आरक्षणाची गरज आहे का?
           हो आहे गरज … आपल्या समाजामध्ये अजूनही बरेच वर्ग आहेत जे दुर्लक्षित आहेत , त्यांचा समाजस्तर , आर्थिकस्तर उंचावण्याची गरज  आहे . पण कोणाला मागास समजायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न . हा प्रश्न थोडा लवचिक आहे कारण आरक्षण   सर्वाना पाहिजे असेल पण मागास म्हणवून घेण आवडणार नाही . आरक्षणाच्या काही अटी नियम लागू केले पाहिजेत तरच त्यांचा कुबड्या म्हणून वापर टळेल .
         आरक्षण फक्त एका पिढीसाठी पूर्ण देशामध्ये , नाहीतर एक पिढी एका राज्यात दुसरी पिढी दुसर्या राज्यात असे महाभाग सुद्धा कमी नाहीयेत . एका पिढीने एकदा कोणत्याही म्हणजे शैक्षणिक , नोकरीसाठी आरक्षणाचा लाभ घेतला तर दुसऱ्या पिढीने घेवू नये . दुरुपयोग असा होतो आरक्षणाचा फायदा घेवून समाजामधील काही लोक गब्बर होतात आणि मग पुन्हा त्यांचीच मुल आरक्षणाचा फायदा घेतात . उपेक्षित समाज लांब राहतो ज्यांच्यासाठी हि सोय केली त्यांना फायदा होताना दिसत नाही .
माझ्यासारख्या आर्थिक सामाजिक स्थेर्य लाभलेल्या लोकांनी तर आजीबात जवळपास सुद्धा फिरकू नये

आरक्षण ह्या कुबड्या आहेत का?
           ज्यांनी पूर्वी कधी फायदा घेतला त्यांच्यासाठी नक्कीच आहेत . आपल्याकडे कोणतीही गोष्ट गृहीत धरण्याची खूप जुनी परंपरा आहे . आरक्षणासारखी गोष्ट कशी गृहीत धरायची राहील ? हं पण ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी नाहीत कुबड्या

आरक्षणामुळे जनमानसामध्ये एखाद्या विशिष्ठ समाजाचा काही फायदा होतो का?
आरक्षणामुळे समाजमन उंचावल तरी बाकीच्या समाजाकडून ते स्वीकारलं जात का?
         दोन्ही प्रश्न एकदम घेतोय कारण दोन्हीची उत्तर परस्पर संबंधित आहेत . फायदा नक्की होतो कारण आर्थिक स्तर उंचावतो , त्या त्या समाजापुरता विचार केला तरीसुद्धा समाजमन थोडाफार उंचावत पण समाजाच्या मुख्य धारेमध्ये सामावून घेतलं जात का?
नाही … आजही एक विशिष्ठ प्रकारची विचारधारा समाजामध्ये 'जिवंत आहे ज्यामध्ये तुमच्या आर्थिक,सामाजिक  स्तराचा विचार न करता पुर्वंपार चालत आलेल्या जातीव्यवस्थेवर  अवलंबून आहे .

तुम्ही आरक्षण घ्या अगर न घ्या ठराविक वर्गामध्ये तुम्हाला ढकललं जात . उदाहरणार्थ माझे अनेक मित्र आहेत जे'कुणबी आहेत ,वाणी आहेत ज्यांना OBC चा reservation लागू आहे . पण ते आरक्षण घेत  नाहीत कारण त्यांना आरक्षण म्हणजे स्वतःला मागास जातीमध्ये गेल्यासारखं वाटत पण आपला समाज त्यांना open वाले समजत नाहीये . त्यांना त्यांच्या जातीप्रमाणे संबोधतो .   एका विशिष्ट समाजाला  मुख्य सामाजिक धारेमध्ये सामावून घेण्यासाठी आरक्षणाचा पर्याय आला पण तो सर्वांनी स्वीकारला नाहीये  आणि समजा माझ्यासारख्या आर्थिक सामाजिक स्थेर्य लाभलेल्या माणसाने आरक्षण नाकारल तर पुन्हा open ची जागा बळकावली म्हणून ओरड मग एखादा माणूस का नाकारेल आरक्षण ?

जाता नाही जात हि म्हण आरक्षणामुळे कालबाह्य होईल कि चालना मिळेल
त्यामुळे फायदे जास्त आहेत कि तोटे जास्त ?
          नाही नक्कीच नाही , जात हा प्रकार ह्यामुळे कधीच पुसला जाणार नाही . बदलत्या काळानुसार नक्कीच लोप पावतोय पण टक्केवारी मुळे  आणखी वाढेल कि काय हि एक भीती वाटते.

आरक्षण कोणासाठी ?
         सगळ्यात जटील प्रश्न , आर्थिक बाबीवर आरक्षण द्यावं का? पण आपल्याकडे खरीखुरी आर्थिक परिस्थिती'दाखवणे शक्य आहे का? आजही बरेचसे व्यवहार कॅश मध्ये चालतात ज्यांच कुठेही लेखाजोखा नसतो . मग आर्थिक बाबींवर कस देणार आरक्षण

मला असं वाटतं आरक्षण हि एक मानसिक गरज आहे . मुख्य धारेमध्ये सर्व जातींना जर सामावून घेण्याचा प्रयत्न झाला तर कोणत्याही समाजाला स्वतःच अस्तित्व सिद्ध  करण्यासाठी कोणत्याही अधिकाराची गरज भासणार नाही .रोटीबेटी चे व्यवहार कदाचित एक पर्याय असू शकेल .

 तुम्हाला काय  वाटत ??  नक्की कळवा …




 

कर्तव्य जबाबदारी कि अपेक्षांचे ओझे.....



मला नेहमी सतावणारा प्रश्न कर्तव्य कोणती मग त्या सोबत आलेली जबाबदारी आणि ते सगळ सांभाळताना कधी कधी वाटणारं अपेक्षांचे ओझे .

कोणतेही'नातेसंबंध घ्या बहिण-भाऊ , मुले-पालक , नवरा-बायको , संदीप खरे यांनी म्हटलं त्याप्रमाणे हाका चालू नाती चालू . पण हीच नाती सांभाळताना कसरत होते का , किंवा परस्पर दोन्ही बाजूनी तितकीच जबाबदारी पेलली जाते का

आजकालच्या पिढीमध्ये म्हणजे nuclear कुटुंब पद्धती आणि वेगाने पुढे जाणारे जग त्या जगाशी स्पर्धा करताना किंवा त्या जगाशी जुळवून घेताना घ्यावे लागणारे निर्णय , स्वयंपूर्ण ,स्वयंसिद्ध व्यक्तिमत्वाने घेतलेले स्वताच्या मनाचे निर्णय ह्या नाते संबंधामध्ये कुठेतरी अडसर होताना दिसताहेत . कर्तव्याच्या नावाखाली अपेक्षांचे ओझे वाढतेय कि केवळ एक जबाबदारी म्हणून कर्तव्य पार पडली जाताहेत ???

मारून मुसलमान करणं हा वाक्यप्रचार इथे तंतोतंत लागू पडतो , स्वताच मन एका निर्णयाच समर्थन करत असत पण त्याचबरोबर मग आपल्या नात्यांवर होणारा त्याचा परिणाम म्हणून ते बदलावे लागतात . पण ते बदलून आपण खरच तस जगू शकतो?


दोन दगडांवर पाय ठेवणार्या माणसाच्या पायाखाली नेहमी दरी असते , कोणता तरी एक दगड निवडावा लागतो पण तो दगड निवडताना आपण नेहमी आपल्यावर काही शेकणार नाही असा दगड निवडतो आणि तिथेच फसतो कारण तो दगड निवडताना आपण नेहमी मी हे कर्तव्यापोटी केला असा बजावत असतो आणि मग ते शेवटी कर्तव्य होत. जगण संपून जात पण हीच गोष्ट जे नतेसंबंध टिकवण्यासाठी केलेली असते त्यांना त्यामागची भूमिका जाणवत नाही कारण प्रत्येक नतेसंबंध सोबत आलेल्या अपेक्षा , कर्तव्य आणि अपेक्षा ह्याचा सुटलेला ताळमेळ


एक मेकांच्या निर्णयाचा सन्मान ठेवणे , एक मेकांच्या निर्णयाची जबाबदारी घेणे हि खरी आपल्या मनुष्याच्या नतेसंबंधाचि गोडी पण कुठेतरी अनुभव किंवा वय किंवा मग वडीलधारेपण ह्या अनुशंघाने तेच निर्णय मागे घ्यायला लावण किंवा आपलाच हेकेखोर पण पुढे चालवणं सर्रास दिसतात


मानवी जीवन खडतर आहे , प्रत्येक मनुष्याची वागण्याची तऱ्हा वेगळी विचार वेगळा . पण एका नात्यात जगताना एक सूत्रात हवी एक मेकांच्या निर्णयाची जबाबदारी हवी . मुळात कर्तव्य आणि अपेक्षा ह्यामध्ये गल्लत नसावी तरच नातेसंबंध सुधारतील अन्यथा फक्त उरतील  कर्तव्य पार पडण्याच्या जबाबदाऱ्या आणि त्यासोबत येणारे अपेक्षांचे ओझे


 

त्याग .... समाधान ....पश्चाताप

मी तुझ्यासाठी हे केल, तुझ्यासाठी ते केलं आणि तू माझ्यासाठी काय केलं … हि वाक्य सर्रास कानावर पडताना दिसतात .

 कोण कोणासाठी का काही करतो ? काय असतात अश्या अपेक्षा कि आपण आपले निर्णय बदलतो आणि त्याग वैगेरे सारखी मोठ मोठाली लेबलं लावून आपले कोणासाठी काही कार्य  टाळतो पण इतक  करूनही पुढे काय होत …कालांतराने  खुश कोणीच  नाही म्हणजे ज्याच्यासाठी केला तो सुद्धा नाही आणि ज्याने केला तो सुद्धा नाही

मुळात प्रत्येकाच्या मनात त्यागाची भावना असते आपण कोणासाठी काहीतरी करावा अशी अपेक्षा असते . मूलतः मानवी गुणधर्माचा एक स्थायी स्वभाव आहे तो .

        पण तोच त्याग करताना नेहमी एक सुप्त अपेक्षा आपण बाळगून असतो ते म्हणजे आपण केलेल्या त्यागाची पोचपावती . नेहमी अस वाटत असत कि आपण एक अमुक त्याग केलाय तर मग आपल्या त्या त्यागाची नेहमी ज्याच्यासाठी केलाय त्याने त्या गोष्टीची सतत जाणीव ठेवावी , आपल्याशी तस वागावं  पण तसं होताना दिसत नाही आणि  त्याचा आपल्याला त्रास व्हायला लागतो, मनामध्ये' द्वंद चालू होत.

 आपण केल तर बरोबर आहे का खरच तसा तो त्याग करण्याची गरज होती का आणि ज्यांच्यासाठी केला खरच आपला त्याग समजून घेणारे आहेत का .

   आपण ज्याच्यासाठी त्याग करतो त्या व्यक्तीची मानसिकता समजून घेण गरजेच आहे . आपल्यासाठी त्याग असेल पण ज्याच्यासाठी करतो त्याच्यासाठी एकतर ती एक साधी अपेक्षा असू शकेल आणि त्या व्यक्तीला त्या गोष्टीची आपल्या आयुष्याशी नाळ समजू न शकल्याने किंवा स्वताच्या मस्तीत धुंद असणाऱ्या व्यक्तीला समोरच्याविषयी काहीच आपुलकी नसेल

आपण जेव्हा एखादी गोष्ट टाळतो व त्या गोष्टीचा त्याग करतो त्या गोष्टीशी किती लोक निगडीत आहेत ह्यावर सुद्धा बऱ्याच वेळा त्या त्यागातून मिळणार समाधान अवलंबून असत.
कारण आपण कोणासाठी काहीतरी करतो तेव्हा स्वतःच्या ,स्वतः भोवतीच्या वातावरना मुळे निर्णय घेतो पण त्याचा आपल्या परीघामध्ये असणाऱ्या व्यक्तींचा तितकासा विचार करत  नाही परिणाम असा होतो त्यामुळे एक जन सुखावतो आणि एक जन दुखावतो .

दुखावलेल्या मनाचा थोडाफार परिणाम आणि ज्याच्यासाठी केल त्याच्या अपेक्षा ह्यातून काहीच निष्पन्न होत नाही आणि वेळ निघून गेल्यावर कशासाठी आणि कोणासाठी काय केल , खरच गरज होती का असे प्रश्न पडू लागतात . पश्चाताप होवू लागतो

खूप भेळ मिसळ आहे विचारांची त्यागमूर्ती असाव पण मग अपेक्षा करू नयेत अनादिकाळापासून लिहून ठेवलंय कर्म कर फळाची अपेक्षा करू नको पण सामान्य माणूस म्हणून जमणार आहे आपल्याला ??

 मुळात त्याग ज्यांच्यासाठी करतोय तो सुद्धा एक सामान्य माणूस असतो त्याच्या जाणीवा जागृत असतील तर करावा त्याग .

कोणाच्या काही करण्याने काही कोणाला फरक पडत नसतो तुमचा चांगुलपणाच कौतुक एक दोन दिवस नंतर तुम्ही जसे पूर्वी होतात तसे मग कोणी सांगितलंय नको ते उपद्याप .

माणूस म्हणून जन्माला आलो माणूस म्हणून जगावं . देव बनण्याचा प्रयत्न करू नये

स्वार्थी बना अस मी म्हणत नाहीये पण म्हणून कोणतही शास्त्रीय कारण नसताना कोणाच्या दांभिक सुखासाठी कोणतेही निर्णय घेवू नयेत .

लेख थोडा भरकटला असेल. पण एकच सांगावास वाटत । पश्चाताप न करण्याची शाश्वती असेल तरच निर्णय बदलावेत , त्याग करावा … 

 

परळी ची दगडफेक - व्यथावेदनांचा विस्फोट

 
सकाळी  सवयीप्रमाणे TV लावला आणि पहिली headline सुरु होती , मुंडे साहेबांना अपघात झाल्याची बातमी , detail बघणार इतक्यात दुसरी बातमी साहेब गेल्याची . मला पटेना . ३-४ channels surf केले पण तीच एक बातमी . डोके सुन्न झाले . मनामध्ये एक अनामिक भीती दाटली . आता कुठे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सरंजामशाही चं पानिपत होण्याची चिन्ह होती आता त्याला एक तडा पडलेला दिसत होता … 
 
पश्चिम महाराष्ट्राचं साला नशीबच फुटक वाईट .बहुजन समाजाला तर त्याहून मोठा फटका.
 
स्वतः आठवले दलित समाजाचे नेते असून कधी कोणाला ते आपले का वाटत नाहीत या उलट मुंडे साहेब नेहमीच आपले वाटले , कारण सर्वसमावेशक वृत्ती , समजून घेण्याची प्रवृत्ती 
 
 वर्षानवर्षे पिचलेली मराठवाड्यासह राज्याच्या कानाकोप-यातील लोकं खासकरून गरीब, कष्टकरी ऊस तोड करणारा वर्ग, वंजारी, बहुजन समाज असा ख-या लाभांपासून, सुविधापासून स्वातंत्र भारताच्या 67 वर्षानंतरही वंचित आहे. आज मिळेल, उद्या मिळेल या आशेवर हा समाज आजही जगतो आहे.
 
याच वर्गातून, समाजातून वर आलेले व तावून-सुलाखून निघालेले गोपीनाथ मुंडेंसारखे नेतृत्त्व तयार झाले होते. या माणसाने कायम त्यांना जगण्याची नवी ऊर्मी, ऊर्जा दिली. सकारात्मक विचार करायला भाग पाडले.
 
राजकीय जीवनात आल्यापासून संघर्ष सुरू होता ते मरेपर्यंत संघर्ष केला या माणसाने. त्या माणसाला कधी एखाद्या गोष्टीचे क्रेडिटही दिले नाही या सो कॉल्ड राजकीय व्यवस्थेने, त्याचा सन्मान तर सोडाच. कोण हा मुंडे, वंजारी समाजातील माणूस आम्हाला आव्हान देतोय असे येथील संरजामशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना वाटत होते. खरं इथे जातीचा काहीच संबंध नाही आहे तो 'आहे रे' आणि 'नाही रे' या वर्गाचा. पिढ्यानपिढ्या गरीबी, कष्टकरी, शेतकरी, आपल्या संरजामशाही व्यवस्थेमुळे कायम भरडून निघालेली तळातील गोरगरीब जनतेला कोणी वालीच नव्हता. या वावटळात त्यांना गोपीनाथ मुंडे नावाच माणूस दिसला. जो या वर्गाची भाषा तो बोलायचा व तो आपला पोशिंदा होऊ शकतो असे या वर्गाला वाटायचे. या लोकांसाठी मुंडे नावाचा माणूस गेली 4 दशके संघर्ष करीत होता. या दरम्यान या माणसाने अनेकांना शिंगावर घेतले. पण सर्व प्रस्थापित राजकीय टोळक्याने त्याच्यावर सतत घाव घातले. पण हा माणूस तेवढ्यापुरता घायाळ व्हायचा व पुन्हा तावून-सुलाखून नव्याने त्यांच्यापुढे संघर्ष करायला उभा राहयचा. याच दरम्यान या वर्गाने गोपीनाथ मुंडेंचा संघर्ष आधी पेपरात वाचला, मागील दशकापासून टीव्हीत पाहिला, तर कधी आपसूकच समजून घेतला. आता मात्र आपल्या नेत्याच्या पक्षाची सत्ता आली आहे. आपल्या नेत्याला मंत्रिपद मिळेल व कित्येक वर्षांनी आपल्याला काहीतरी मिळेल, काही तरी आपल्या भागाचा विकास होईल असे वाटत होते किंवा आपले प्रतिनिधित्व करणारा तेथे कोणी तरी आहे याचे समाधान वाटणार होते. पण त्यांच्यासाठी देव असलेल्या नेत्याला नियतीनं अगदी कायमचे लांब नेले. कधीही न भेटण्यासाठी.
 
परळी मध्ये दगडफेक  झाली कारण समस्त राजकारणी नेते, संरजामशाही प्रवृत्तीचे राजकारण्यांनी आमच्या नेत्यांवर अन्याय केल्याची भावना लोकांच्या मनात आधीपासूनच खोल-खोल जखम करून बसली होती. मग त्यामध्ये सर्व समाजाचे , सर्व पक्षांचे नेते , सर्वाना एकसमान मानून दगडफेक झाली . 
 
आपल्या नेत्यासोबत दगाफटका झाल्याची भावना त्यांच्या मनात आता पुन्हा एकदा नव्याने कोरली आहे. आता मुंडेंचा अपघात की घातपात हे देवालाच ठाऊक पण ती कष्टकरी, ऊस तोडणारी जनता काय समजायचे ते समजून गेली आणि म्हणून त्यांनी दगडफेक केली.
 
संवेदनशील मानसाच्या अंतर्मनाच्या डोहात डुबलेल्या व्यथावेदनांचा तो विस्फोट होता. 
 
पूर्वीसारखी परिस्थिती नाही आता , प्रत्येक समाजामध्ये कोणी ना कोणी प्रतिनिधित्व करत आहे पण ह्या सर्वांची मोळी बांधणारा नेता उदयास आला पाहिजे .
 
 
 
सौजन्य : दिव्य मराठी , दिव्य मराठी मध्ये आलेल्या लेखाचा सारांश … 

काळ बदलला , मालिका सुधारल्या. समंजस पुरुषांच्या परंपरेला सुरुवात

 मातृसत्ताक व्यवस्थेपासून सुरुवात होवून  नंतर  कष्टाची काम करण्याच्या नावाखाली  सत्ता पुरुषांच्या हातामध्ये आली . पुरुषप्रधान संस्कृती सुरु झाली .  सत्ता कोणाचीही असो , समसमान न्याय ,वागणूक अपेक्षित आहे . एकाने  राज्य करायचं आणि दुसऱ्याने फक्त सोसायचं हे चूक 



              म्हणजे मला माझी आई , आजी , हल्लीच्या काळामध्ये मोठ्या बहिणी ह्या सगळ्यांना एकच गोष्ट बोलताना पाहिलंय ऐकलंय . संसाराचा गाडा स्त्रीने हाकायचा ,तिनेच सगळं सोसल पाहिजे . म्हणजे माझ्या घरातील पुरुष मंडळी अन्याय करणारी होती अस नाही पण एक overall so called समाजाची मानसिकता स्त्री ही आदर्श स्त्री'च असली पाहिजे  . ह्यामध्ये मग tv वरच्या मालिकांनी ,चित्रपटांनी कस मागे राहावं . चार दिवस सासूचे मधील अनुराधा असो किंवा आभाळमाया वादळवाट मधील स्त्री व्यक्तिरेखा खूप समंजस आणि सर्व काही सांभाळून नेणाऱ्या म्हणजे थोडक्यात आदर्श वादी .


         काळ बदलला ,विचार बदलला हल्लीच्या मालिकांच स्वरूप सुद्धा बदलतंय . खूप चांगल वाटलं . so called समाजाची मानसिकते पासून फारकत घेत पुरुष सोशिक आणि समंजस दाखवले जाताहेत.


        होणार सून मी ह्या घराची मधील श्रीरंग गोखले , घरामध्ये १ आजी , ६ आया आणि १ बायको . ह्या सगळ्यांना व्यवस्थित समजून घेत . आदर्श नातू ,आदर्श मुलगा तसेच आदर्श नवरा . स्त्रियांच्या त्यांच्या हक्काची जाणीव करून देत त्यांना त्यांचे हक्क मिळवून देताना दिसतो .


        जुळून येती रेशीमगाठी मधील आदित्य , बायकोने म्हणजे मेघनाने  सांगितलं पूर्वीच प्रेम . तिला तिच प्रेम, सन्मान मिळवून देण्याची धडपड , त्यासोबतच तिला घरातील सर्वासोबत जुळवून घेण्यासाठी मदत . वेळोवेळी तिची योग्य ठिकाणी योग्य पाठीराखन .


        etv वरील माझे मन तुझे झाले मधील शेखर , अल्लड महाविद्यालयीन तरुणी शुभ्रा , तिला जबाबदारीची जाणीव करून देताना समजून उमजून घेताना होणारी तारेवरची कसरत तरीसुद्धा निखळ प्रेम करणारा .




       ह्या सर्व व्यक्तिरेखांचा एक समान धागा वाटला । बायकोला बायको न समजता एक चांगला मित्र सहचारिणी समजन्याचा   सुज्ञ पणा . बायको म्हणजे हक्क , अस न दाखवता नवरा म्हणजे हक्काची परिपूर्ती असा दाखवला .
 


      ह्या सर्व व्यक्तिरेखा पुरुषांच्या दृष्टीने  कधी कधी खूप आदर्शवादी वाटतात पण विचार करा पूर्वी जेव्हा स्त्रियांच्या व्यक्तिरेखा अश्या आदर्शवादी होत्या तेव्हा आपल्याला अस कधी वाटलं का ?आपण नेहमी अपेक्षा करत आलो पण त्यांच्या अपेक्षांच्या पूर्ततेची कधी व्याख्या तरी जमली का ?



काळ बदलतोय विचार बदलले पाहिजेत मुळात चांगले विचार केले पाहिजेत . बायकांना काय कळत , बायको म्हणजे हक्काची, स्त्री एक भोगवस्तू  हि मानसिकता बदलणं गरजेच झालंय .


समोरून वेडी वाकडी जाणारी गाडी दिसली कि ती गाडी बाईच चालवत असेल हे गृहीत धरन कमी केला पाहिजे . मुळात कोणालाच कधीच गृहीत धरू नये .



मालिकांच बदलेल स्वरूप समजून घेताना आप आपल्या व्यक्तिगत जीवनात आपल्याला काही अंगिकारता आला तर एक चांगला समाजाच स्वप्न साकार होण्याला नक्कीच मदत होईल . socialist म्हणून विचार करताना समाजातील सर्व घटकांना सर्व समान संधी चा आपण विचार करतो मग घरापासून सुरुवात नको का?
मालिकांच्या लेखकांच  मनापासून कौतुक व शुभेच्छा .