Total Pageviews

बेरीज , वजाबाकी आणि फेसबुक

बेरीज-वजाबाकी आणि फेसबुक...

ष एक भारी फोटोग्राफर  , 32 वयाचा पण दिसायला  कोवळा..आमच्या मित्र मंडळी मधे मस्तानी म्हणून फेमस..आम्ही मित्र सुद्धा कधी कधी चेष्टेने म्हणायचो..पुरुषांवर बलात्काराचे गुन्हे तुझ्यापसुन नोंद व्हायला चालू होणार..हसायचा फक्त आणि म्हणायचा दिसायला कोवळा असलो म्हणजे कोवळा असेन अस नाही..शाळेमधे बिनधास्त किंवा अगदी सहज 5000 ,10000 मीटर्स पळायचा खुप वेळा नंबर सुद्धा काढायचा , तितकाच् लालेलाल व्हायचा. स्वतःच रांगडेपन फक्त दाखवण्यासाठी पठ्या आर्मी सिलेक्शन पास होवून आला..नंतर कधी तरी त्याला फोटोग्राफी चा छंद जडला आणि त्याने त्याचा व्यवसाय सुरु केला..पोर्टफ़ोलीओ बनवणे , वाइल्ड फोटोग्रोफी असे बरेच काय काय करायचा..

समोरून एखादी सुंदर मुलगी गेली की आमची मित्रांची लगेच चुळबुळ चालू व्हायची..सर्वसामान्य नजर आमची , ठराविक अवयवांवर जाऊन स्थिर होत असे आणि मग ठराविक माप दडांंमधे बसनारी मुलगी सुंदर हा आमचा निकष पण ष चे सौंदर्य निरखायचे मापदंड सुद्धा खुप वेगळे..त्याला डोळे आवडायचे ..म्हणायचा शांत आणि गहिरे डोळे खऱ्या सौंदर्याचे प्रतिक आहेत..गहिरे डोळे समोरच्याला समजून घेतात..समोरच्याच् ऐकतात..
Christian मूलीशी लव marriage झाल संसार सुद्धा व्यवस्थित होता अस ऐकिवात होत..पण नेमक उलट घडत होत..ष ची बायको पूर्ण डॉमिनेटिंग फक्त बोलायची ऐकून घ्यायची अजिबात सवय नाही...गहिरया डोळ्यांचा 2 वर्षातच पूर्ण फसलेला अंदाज...

म एक 44-45 वयाची मध्यमवर्गीय सरकारी अधिकारी .. एक छोट चौकोनी कुटुंब ..जितका मान मरातब ऑफिस मधे तितकिच उलट घरी वागणूक..सोन्यासारखी दोन मूल आईसोबत सगळ काही शेयर करणारी पण नवरा मात्र उलट. फक्त हुकुम सोडणारा एवढी क्लास वन अधिकारी पण पैशाचे व्यवहार नवरयाकडे..तितकाच् संशयी..माकडाच्या हाती मोती लागला की कशी insecurity आणि over protection चालू होत तो नमूना..जिथे जाईल तिथे सोबत..खुप लांबुन  लोक म चा सल्ला विचारण्यासाठी यायचे एक उत्कृष्ट साइकोलॉजिकल anlyst, conflict मैनेजर पण कुठेतरी स्वतःच अस्तित्व , स्वतःची स्पेस हरवून बसलेली...

फेसबुक च पेव सुटल , मीच ष ला पेज ओपन करुन दिलेल..मस्त मस्त फोटो टाकायचा..लाइक कमेंट चा बेसुमार मारा चालू होता..जास्त करुन बायका आणि पोरींच्या उड्या त्याच्या पेज पर पडत होत्या...

ष आणि म ची ओळख तिथेच झाली..कुठेतरी धागे जुळले एकमेकांच्या आयुष्यातील बेरीज वजाबाकी चा हिशोब झाला ..फ़ोन वर बोलता बोलता प्रत्यक्षात भेटु लागले मग एकदा म च्या घरी कोणी नसताना भेटले आणि नविन अध्याय सुरु झाला..

6 महीने सगळ सुरळीत होत जसा चान्स मिळेल तस् कधी ष च्या घरी कधी म च्या घरी तर कधी कुठे  पण शेवटी एक लक्षात आल की हे नात सुद्धा कुठेतरी फक्त शरीर सुखा कड़े वळतय ज्या गरजांमुळे हे नात फूलल त्या गरजा मागे पडून फक्त शरीरसुखा साठी धावताहेत..जागा शोधताहेत...

म ला ह्याची जाणीव लवकर झाली कारण मुळात तिला शरीर सुखाकडे जास्त ओढ़ा कधीच नव्हता पण ष च्या इच्छेला मान म्हणून ती तयार असायची , तिने ष ला बजावल की आता आपण रेगुलर भेटुया नको..ह्या  नात्यात सुद्धा तोच तोच कंटाळा येतोय..सुरुवातीला ष ला काही जानवले नाही , पण नंतर लक्षात आले कुठेतरी तो मनाने सुद्धा गुंतला होता , म ची सुद्धा अवस्था काही वेगळी नव्हती..दोघांच्या आयुष्यात पुन्हा एक नवीन पोकळी निर्माण झाली होती..

मध्यंतरी दोघेही फेसबुक पासून थोड़े लांब पडलेले पुन्हा आता सक्रीय झाले ...एकदा एखादी गोष्ट घडून गेली की माणूस दुसऱ्यानदा पूर्णपणे सरसावलेला असतो .. आता दोघांनाही ष आणि म शोधायला जास्त दिवस नाही लागत ,पहिलपनाच् अवघडलेपन निघुन गेलय... बेरीज वजाबाकी ची नवी नवी समिकरणे चालू होतात...

म आणि ष अधे मधे कधीकधी भेटतात ..आयुष्यामधे येवून गेले्ल्या ष आणि म चा हिशोब मांडत...

फेसबुक लाइफ आणि रियल लाइफ

फेसबुक लाइफ आणि रियल लाइफ...

किस्सा क्र 1..
तिशीतला एक तरुण फेसबुक वर सड़ेतोड़ व्यक्त होणारा , खुप लोक जिथे चुकीच् दिसेल तिथे बोलवायचे मग हा तिथे वेडा वाकडा सुटायचा , वाचन अफाट म्हणून मुद्देसुद सुद्धा भांडायचा ,मोदी साहेबांवर खास प्रेम मग काय सध्याच्या स्थितीत त्याच्या इतका सेक्युलर दूसरा कुणी आहे की नाही हा प्रश्न पडायचा.. फेसबुक वर मोठा फैन क्लब तयार झालेला , लोक कौतुक करायचे , मधे काही कारणाने नविन नोकरी शोधायची वेळ आली , मुलाखती देवु लागला .अश्याच एका ठिकाणी interview चे 3 राउंड्स क्लियर झाला आणि शेवटचा मुख्य राउंड एका मोठ्या manager समोर fix झाला , यथावकाश मैनेजर आले , पाहतो तर त्याच्या फैन क्लब मधले मेंबर ( आपण त्यांना साहेब म्हणुया ) खुप कौतुक करायचे बरेच स्टेटस शेयर सुद्धा करायचे, एका क्षणी खुश झाला पण ओळखीवर जॉब मिळवायचा नाही म्हणून मन लावून सांभाळून interview दिला.. 3-4 दिवसांनी रिजल्ट आला नाही म्हणून कंपनी मधे फ़ोन केला तर कळाले , रिजेक्ट झालाय ..न राहवुन त्याने साहेबाना फ़ोन केला ,ते म्हणाले तू खुप स्पष्ट बोलतोस  आम्हाला इतके स्पष्ट बोलनारा नको वरुन तू फेसबुक addict आहेस आम्हाला नको आहे असा candidate..

किस्सा क्र 2
25 च्या दरम्यानची एक कवियत्री ( क म्हणुया), चळवळी तरुणी स्त्रियांवरच्या अत्याचारांवर भरभरुन , त्वेषाने ( खून ख़ौल उठा types) लिहायची , तूफ़ान फेमस , एक फेसबुक सेलिब्रिटी ..बायकांना तीच विशेष कौतुक ..माझी लेक ग , माझी मुलगी असतीस तर काय नशीबवान असते मी अश्या 10-12 कमेंट्स तिच्या प्रत्येक पोस्ट वर  , तिच्याच् लिस्ट मधे असणाऱ्या आणि क ला मुलगी मानणाऱ्या एका काकुना त्यांच्या मुलासाठी क च स्थळ सांगून आल , त्यानी क्षणाचाही विलंब न लावता नाही म्हणून सांगितल , मध्यस्थ सुद्धा गार... का नाही म्हणताय म्हणून मागे लागला मग सांगितले मी खुप चांगली ओळखते , मुलगी दिसायला चांगली आहे स्वभावाने गोड आहे पण स्वतंत्र विचारांची आहे माझ्या मुलाला वरचढ़ होईल..

आपण आपली भूमिका सड़ेतोड़ मांडतो आपल्याला भरपूर लाइक मिळताहेत कमेंट्स येताहेत म्हणून रियल लाइफ मधे सुद्धा आपल्याला तितकेच followers असतील ह्या गैरसमजात तर अजिबात पडायला नको..

फेसबुक पाहायला गेल तर एक मुखवटयाच् पुस्तक आहे , उदाहरण दयायच झाल तर सोशल मीडिया वर happytobleed ला पाठिंबा देणाऱ्या अनेक स्त्रिया मासिक पाळी वेळी स्वताःच्या घरचे देव पूजत नसतील...किंवा
दलित अन्यायाविरुद्ध फेसबुक वर पेटुन उठनाऱ्या कार्यकर्त्याला गावातल्या दलित वस्तीकड़चा रस्ता सुद्धा कधी माहीत नसेल..

एखादा असा सुद्धा भेटेल की तुम्हाला नेहमी विरोध करणारा पण प्रत्यक्षात मात्र एकदम जिगरी..

फेसबुक मला कधी कधी एका movie सारख वाटत ,दिवस संपला की शो ख़तम ..
दुसऱ्या दिवसापासून नविन घटना , मग नविन चर्चा

सांगायचा मुद्दा एवढाच की आजुबाजुला घडणाऱ्या प्रत्येक घटनेच्या फेसबुक ट्रायल ला मनावर् घेतल नाही पाहिजे आपण फक्त आपल्या भूमिकेशी प्रमाणिक राहायला पाहिजे..

26 नोव्हेंबर

आम्ही तेव्हा सांगलीत विश्राम बाग़ ला राहायचो , मला सुट्या होत्या म्हणून काहीतरी वाचत बसलेलो , दादा कुठून तरी बाहेरून आला आणि म्हणाला पुलिस ग्राउंड वर मैचेस चालु आहेत येणार काय ? म्हटले चला जावुया , एक बास्केट बॉल ची मैच चालु होती बहुतेक कोल्हापुर की सोलापूर विरुद्ध सांगली जिल्हा पोलिस दल अशी मैच होती , सांगली ची टीम सणकुन मार खात होती , मूळ भूमि जरी कोल्हापुर असली तरीसुद्धा अर्ध आजोळ म्हणजे मामा मावशी सगळे सांगली ला म्हणून सांगली विषयी एक वेगळी आत्मियता , दादा ला म्हणालो गेली की रे मैच आपल्या हातून , तो बोलला थोड़ थांब कामटे साहेब अजुन यायचे आहेत , 10 मिनिटांनी साहेब आले असतील  , ते आले , ते खेळले आणि त्यांनी एक हाती गेम जिंकला
एवढा मोठा अधिक्षक माणूस पण मैदानावर खुप सहज वावर , एक कोल्हापुर च पोरग लइच रफ खेळत होत , मी मनातल्या मनात म्हणतोय साहेब हयाचा बदला आज न उदया काढणार , खेळ झाल्यावर त्याला भेटलो आणि विचारल म्हटल भीती नाही वाटत , S.P विरुद्ध खेळत होता आणि तुम्ही रफ होता पूर्ण गेम मधे ... तो म्हणाला कामटे सरांसोबत खुप कमी वेळा खेळायला मिळतं , जे काही पैतरे आहेत ते सगळे ट्राय करायचे , खुप शिकायला मिळतं आणि सर एकदम जिंदादिल आहेत ग्राउंड वर...
हे मी कामटे साहेबांना तिथे पहिल्यांदा पाहिल...
नंतर ते रोज सकाळी पोलिस ग्राउंड वर जॉगिंग ला येतात म्हणून खास त्यांना बघायला जमल तर बोलायला म्हणून मी जॉगिंग ला जायचो , आमचं जॉगिंग म्हणजे  काय एक किंवा अर्धा राउंड पळायच जास्तीत जास्त आणि मग तिथे पोलिसांच्या प्रैक्टिस किंवा कवायती बघायच्या आणि घरी यायच
एक दिवशी शेवटी टाइमिंग जमल , कामटे साहेब आले सलग 5-6 राउंड मारले , एक मुलगा चुकीच्या पुश अप्स मारत होता त्याला 2 -3 पुश अप्स मारुन दाखवल्या आणि गेले ... किती सहज वावर .

आपण एखाद्या मोठ्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटलो की अजानतेपणे आपण त्यांना फॉलो करू लागतो नंतर त्यांच्या येणाऱ्या प्रत्येक बातमी कड़े आपले काटेकोर पणे जसे आपल्या मित्र परिवार किंवा कुटुंबाच्या बातम्यां कड़े जसे लक्ष असते तसे काहीसे

कामटे साहेबांची मग सोलापुरच्या रवी पाटलाला उचललेली , चेंबूर मधे दंगल नियंत्रणाची बातमी असो ..3 - 4 वेळा नक्की पारायण ठरलेले..

अरुण गवळी , साळसकर साहेबांमुळे मतदानाला न जावु शकलेल्या हतबदलतेच्या बातमीमुळे (पूर्ण पणे ऐकिव ) साळसकर साहेब असेच लक्षात राहिलेले

मालेगांव च्या बोम्ब स्फोटाचा शोध लावून अटक करविणारे करकरे साहेब अशी करकरे साहेबांची ओळख लक्षात

26 /11 चा हल्ला झाला , पूर्ण संध्याकाळ मी आणि दादा टीवी समोरून हललो नव्हतो 
बरोबर 11-50 ला स्क्रोल आला साळसकर ,करकरे आणि कामटे साहेब हल्ल्यात जखमी , वाटल एखादी गोळी लागून गेली असेल ,तसेच झोपायला गेलो सकाळी उठुन टीवी लावला तर निधनाची बातमी 

डोक सुन्न , समोर फक्त ते बास्केटबॉल खेळतानाचे कामटे साहेब , हेल्मेट घालून हल्ल्याच्या विरोधासाठी चे करकरे साहेब आणि हसरया चेहऱ्या चे साळसकर साहेब हेच 3 चेहरे शपथ सांगतो 3 दिवस डोळ्यांसमोरुन जात नव्हते , भयानक अस्वस्थता..

3 दिवसांनंतर सगळ सुरळीत झाल , मुंबई स्पिरिट च्या नावाखाली सगळ खपवून घेतल गेल , आईपीएस व्ह्ययच् म्हणून सकाळी उठून व्यायाम वैगेरे चालु केलेला ( ह्या स्वप्नाची गोष्ट पुन्हा कधीतरी )

पहिली 2-3 वर्ष 26/11 आल की खुप अस्वस्थ व्हायचो

पण हल्ली हल्ली सवय झालीये , 26/11 काय किंवा 11/7 काय किंवा 22 मार्च काय त्या त्या दिवशी 2 -4 सेकंद अस्वस्थ होणार मन !!!!!

इतकीच् काय ती संवेदनशीलता उरलीये..

माझीच मला फक्त इतकी भीती वाटतीये की ही सध्याची 2-4 सेकंद ची संवेदनशीलता तरी येणाऱ्या काळात टिकून राहील की नाही ह्याची...

टोळभैरव , आपण , आपली जबाबदारी

रस्त्यावर जर तुम्हाला कोणी टोळी एखाद्या मुलीकडे बघुन काही आगाऊपणा करत असलेले दिसले तर फक्त त्या पोरांकडे 1-2 मिनिट एकटक बघायच , कशी सॉलिड फाटते बघा त्यांची ...

काल संध्याकाळी कैडबरी सिग्नल ( ठाणे ) ला असच झाल , माझ्या गाडीच्या बाजूला एक Activa येवून थांबली , पोरगी दिसायला खरच सुंदर होती , पण थोड़ी घाबरलेली वाटली , तेवढ्यात मागून 2 बाइक वर आलेच 4 हीरो शांताबाई च्या गाण्याचा मोठया आवाजात ठेका धरलेला आणि नजर ह्या पोरी वर खिळलेली , आल माझ्या लक्षात ..
आता खाली उतरून जाब विचारायला जागा सुद्धा नव्हती , काचा खाली केल्या आणि एकटक त्या पोरांकडे बघायला लागलो ( हे कोल्हापूर , सांगली , सातारा च्या पोरांना बरोबर जमत , ज्याला शिकायच असेल तर फुकट शिकवु , तसही विधायक कामांना आम्ही जात , धर्म , पक्ष विसरून पाठिंबा आणि सहकार्य देतच असतो असो)
लगेच मागच्या सीट वर बसलेल्या आणि गान न म्हणाऱ्या पोरानी समोरच्या पोरांच्या कानात काहीतरी खुसपुस केली , एक वेळ माझ्या कड़ , माझ्या गाड़ीकड़ बघितल आणि गाड्यांच्या गर्दीतून वाट काढत काढत गेले धूम ....
आपल्याकडे ना सुरुवात करावी लागते , एकदा सुरुवात करा आणि जर अंगावर आलेच कुणी तर पोरींच्या भल्यासाठी तुम्ही झगड़ताय म्हटल्यावर तुम्हाला सपोर्ट ची चनचन नाही भासणार , खुप लोक येतील सोबत..
त्या पोरगीन जाता जाता thumps up सारखा दाखवलेल्या अंगठयाने मावळ ती कड़े झुकलेला सूर्य सुद्धा थोड़ा आश्वासक भासला...

स्कोर्पियो डायरीज़.....

नवोदय आणि अंधश्रद्धा

आम्ही बहुतेक 7  किंवा 8 वी ला होतो , कधी नव्हे ते असेंब्लि ( रोल कॉल , प्राथर्ना , प्रतिज्ञा, राष्ट्रगीत ह्या सगळ्यासाठी एक नाव)  च्या जवळपास 10 mins आधी तयार झालेलो ( नॉर्मली आम्ही असेंब्लि ची घंटा झाल्यावर मग शूज वैगेरे घालायला चालु करायचो ) 

तेवढ्यात एकाला तिथे कुकुड कोंबडा /कुंभार कावळा / पाण कोंबडा / भारद्वाज दिसला आणि मग तो पक्षी दिसला की दिवस शुभ जातो अशी आख्यायिका असल्यामुळे आम्ही सगळे लगेच त्या पक्षाच्या पाया वैगेरे पडायला लागलो.पक्षी पण डामरट होता आमचा एवढा दंगा चालु होता पण जागचा हालला नाही , आमचा तो दंगा ऐकून जगताप सर (Maths Teacher ) तिथे आले आणि म्हणाले काय रे काय चालू आहे ? कुणीतरी म्हणाल सर बघा तो कोंबडा , तो दिसला की दिवस चांगला जातो . सर म्हणाले हो काय ? मग आज तुम्हाला नुकत्याच झालेल्या यूनिट टेस्ट चे मार्क देतो आम्ही पण खुश ..
आज काय मार बसत नाही , आम्ही तसे मार भरपूर गोष्टींसाठी खायचो , पण मैथ्स च्या मार्क्स साठी मार खायचा सर्वसाधारण फॉर्मूला 25 पैकी 25 पडले तर मुलांना पाठीच्या खाली , मुलींना हातावर 1 ( पुढच्या वेळी सुद्धा पैकी च्या पैकी मिळावेत ) 24 ला 2 ( एक मार्क कुठे गेला त्यासाठी आणि पुढच्या वेळी सुद्धा साठी 1 ) 23 ला 3 छड्या  ,अश्या मार्कांच्या उतरत्या क्रमा प्रमाणे चढत्या क्रमा ने छड्यां मिळायच्या. बर कोंबडा दिसल्यामुळे आम्ही काय मार खान्याची पूर्व तयारी सुद्धा केली नाही ( ह्या पूर्व तयारी वर एक पान लिहून होईल पण थोडक्यात म्हणजे डबल कधी कधी ट्रीपल शर्ट किंवा शर्ट च्या आत स्वेटर  , डबल अंडरपैंट , डबल चड्डी घालणे).

क्लास चालु झाला , मार्क मिळाले , नेमका कोंबड्याने दगा दिलेला ,सगळ्यांना नेहमी पेक्षा 3-4 मार्क कमीच पडलेले मग काय खाल्ला दाबून मार , वरुन कोंबडा बघुन नको तो समज करुन घेतला म्हणून एक एक फटका एक्स्ट्रा मिळाला.

तेव्हा ते अंधश्रद्धा वैगेरे काय तेवढ कळायच नाही पण एक गोष्ट लक्षात आलेली , आपला दिवस चांगला की वाईट होईल हे कुठल्या पक्षी किंवा देवाच्या हातात नाही तर आपल्या पूर्वी केलेल्या उपद्व्यापांवर आणि मेन म्हणजे शिक्षकांच्या हातात आहे..

असा आमच्या जगताप सरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचा दिलेला पाहिला धड़ा....

आजसुद्धा कुणी मला राशिभविष्य वाचून दाखवल किंवा तो कुकुड कोंबडा दाखवला की मला जगताप सर आठवतात आणि मग नकळत सरांसाठी हात जोडले जातात..

#Navodaya_Kolhapur

मराठी भाषेचे संवर्धन

आम्ही मित्र मित्र पुणे बेंगलोर मार्गावर बेळगाव जवळ एका ढाब्यावर थांबलो होतो . मी आतमधे बिल पे करत होतो आणि मित्र बाहेर थांबलेले ....
 एक MH 04 ( ठाणे पासिंग ) गाडी आली ,गाड़ी मधे दोन मूली होत्या. साहजिक आहे आपण जिथे राहतो तिथली गाडी आली की कोण कुठले? कुठे चालले आहेत ?  ह्याची चौकशी होते ,  मित्र गेला आणि विचारले तुम्ही सुद्धा ठाण्याच्या का ?
वसकन अंगावर येत पोरी बोलल्या तुम्हाला काय करायचे आहे ?

थोड्या वेळाने मी बाहेर आलो आणि साहजिकच मी सुद्धा उत्सुकतेने विचारले (मला आधीचा scene माहीत नव्हता ) Are you also from Thane ? Where are you heading ?

नाव , आडनाव , ठाण्याच्या पत्त्या सोबत आता जात असलेल्या ठिकाणाच्या हॉटेल चे नाव सुद्धा सांगितले 

आता म्हणा मराठी भाषेचे संवर्धन करा......

भगत

शेखरया लेका मला भगत व्ह्ययचच नव्हतं , मला तुझ्यागत engineering करायच होत , आपला नंबर पुढ माग असायचा , 8 वी ला मी पाहिला तर 9  वी ला तू पाहिला आलेलास , पण त्या जगदाळे प्रोफेसर ने X x घातली , बापाला गंडवला , बापाला म्हणाला पोरग इंजीनियर झाल तर गावात राहणार नाही ,जाईल कुठेतरी पुणे , बैंगलोर ला , तुझी गुरवकी कोण करणार ?म्हसोबा कोपल कि रांXX . त्यापेक्षा BSc ,MSc करू दे . आपल्याच कॉलेजात लावतो ..
बापाची हातभर फाटली आणि म्हसोबा वर हात बडवून मला वाटेला लागला.
त्या संगी न पण वेड लावलेल रे !!! तीला सोडून पण कुठ दूसरी कड़ जाऊ वाटत नव्हतं , तू 10 वी ला बाहेर गेलास शिकायला म्हणून तुला काय माहीत नाही , मी एकदा तीला उसात आवळली सुद्धा होती .तुमच्यागत zoology परफेक्ट कधीच नव्हतं गड्यां आमच ,  बाप रोज म्हसोबा ची आरती पाढ़ करायला बसवायचा म्हणून पुढ काय करायच कळल नाही आणि हाड वाजूस्तोवर निस्त आवळत बसलो , एक किस पण घेतला नाही बोल . तुझ्या समोरच तर 9 वि ला फ्रेंडशिप मागितलेली आठवते का ? मला काय म्हटला होतास , लेका ही फ्रेंडशिप लग्नापर्यंत ने नाहीतर उसात संपवशील . 
लेका तुला म्हणायला काय जात होत लग्नाच , ती कुनब्याची आणि मी गुरवाचा , तिचा बाप पाटलाच्या घरी सालगड़ी आणि आमच घर गावच्या म्हसोबाच गुरव . 

मी कोल्हापूर ला गेलो MSc ला तोवर बंड्या पाटलान तिला 4 -5 वेळा आवळून त्याचा दुसरा सालगडी रंग्या बरोबर तिच वाजवून सुद्धा दिलेल . गप गुमान बसलो लेका अल्ताफ राजा वाजवत. 
पण गावली नंतर लई वेळा , तिचा पण जीव होता रे माझ्यावर , आमच्या देवळात साप लई गड्या , मला पण बारीक़ सारीक माहिती झालेल . एकदा संगीला साप चावला म्हणून तिचा नवरा आल्ता अंगारा घ्यायला मग जाऊन बघितलो तर एक किडक चावल्याल . डेटॉल न पुसून काढलो आणि अंगारयात हळद मिसळून लावलो , माझा हात लागल्या बरोबर सिग्नल दिली की लेका मग काय जागच्या जागी घुमुन म्हसोबा च्या मागच  लागीरलय म्हणून सारख सारख अस आक्रित व्हायला लागलय , नवरा हाता पाया पडून उपाय काढ़ा म्हणाय लागला मग संगीला एकटीला उल्ट्या पखाच कोंबड , दोन अंडी , 2 भाकरी आणि एक ओल्ड माँक नैवैद्य घेवून पाठवायला सांगितलो , देवळाच्या मागच्या खोलीतच भुत उतरवलो , महिना दोन महिन्याला कुणा कुणाला लागीरलय म्हणून घेवून येत्या ... माझी आठवण आली की ...
तस् काय वाईट नाही रे माझ , उसाच् 5 एकराच् 3 डाग आहेत , 7-8 लाखाच् मीटर आहे वर्षाच , आज्याचा एकच होता 5 एकराचा , उरलेल दोन ... भुत आहेत म्हणून मला 50 हजारात विकुन गेल्यात पुण्याला निकमांची .  कुठल भुत मर्दा , असाच माझ्यागत कोणतर रात्रीचा आवळायला गेला असल  आणि माणूस दिसल्यावर चड्डी वर वडत पळत असल ह्यासनी वाटल उल्ट्या पायाच् आहे , असली जत्रा इथली. 
कॉलेज मधे मान आहे , आमदार माझ्याकड़न कौल लावून घेवून मग फॉर्म भरतोय , पोरग आता 3 री ला आहे , पुढच्या वर्षी स्कॉलरशिप ला बसल जिल्ह्यात ,  हुशार आहे कार्ट पण आगाव आहे , माझी बायको म्हणती त्याला काय लागारलय का बघा  !!!!!

सकाळी  कॉलेज मधे बॉटनी ला  Datura Inoxia   शिकवायच आणि संध्याकाळी तेच धोत्र्याच् फूल म्हसोबा ला लावून घुमायच .

पोर्णिमेला आमच्याच् घरच्यानी म्हसोबा साठी दिलेल्या नैवैद्यातील ओल्ड माँक आणि उकडलेल्या अंड्यांचा आस्वाद घेत ....

विन्या भगताने उलगडलेले त्याचे आत्मचरित्र...

शिवाजी महाराज व देवत्व

पूर्वी ऐकायचो 33 कोटी देव आहेत स्वातंत्र्योत्तर काळात त्यामधे बरीच वाढ होत गेली , म्हसोबा ,भैरोबा , ताईबाई बद्दल नाही बोलत  , मी बोलतोय साईबाबा , गजानन महाराज , स्वामी समर्थ ह्यां मानवांच्या देवत्वाविषयी  . त्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातला असेल पण त्यांच्या देवत्वाचा शोध किंवा त्यामधे वाढ ही नक्कीच स्वातंत्र्योत्तर काळात झाली. 
शिवशक्ति संगम च्या रूपाने आता त्यामधे शिवाजी महाराजांची भर पडलीये , अजुन थोड्या दिवसांनी बाबासाहेबांना हया यादीत घुसवल नाही म्हणजे मिळवल.
मुळात ही देवत्व का लादली जाताहेत ? Insecurity म्हणावी तर तस् सुद्धा नाही .हे प्रकार अल्पसंख्याक समाजापेक्षा बहुसंख्यांक समाजाकडून जास्त होताहेत. बर त्यामधे सुद्धा फक्त अभिजनांकडून होतय का ? तर तस् सुद्धा नाही ह्यामधे बहुजन समाज सुद्धा तितकाच सामील आहे.
आरएसएस मधे फक्त ब्राह्मण आहेत का ? किंवा समीर गायकवाड़ हा कोण होता ? साधी सोपी उत्तरे असलेले हे प्रश्न आहेत.
हा सगळा भावनेचा बाजार आहे , जातीय ,धार्मिक कट्टरतेकडे झूकणारा झांगड़गुत्ता आहे ज्यातून ध्रुवीकरणाची विषारी पैदावार होईल.
बर हे फक्त RSS , सनातन करतय का ? नाही ह्यामधे समाजातील सर्व घटक म्हणजे संभाजी ब्रिगेड , मलिदा मधे निघालेले मोर्चा चे लोक , MIM चे लोक तितकेच सामील. 
RSS काहीतरी बोलणार मग बाकीच्याना संधी मिळणार आणि vice versa.

मला वाटतं ही कट्टरतेची एक एक्सप्रेस आहे आणि त्यामधे सामील होण्यासाठी अभिजन , बहुजन ,दलित सर्वजन धावताहेत , सगळ्यांना स्वताः साठी सीट पकडायची आहेच त्यासोबत मग आपल्या सहकरयांना बोलवून बोलवून (फेसबुक भाषेत टॅग्गुन ) घ्यायच. मग एकमेकांचा उद्धार ते सुद्धा इतिहासाचे सोईस्कर दाखले देवून.

हया अश्या वातावरणात भारत 2020 साली महासत्ता म्हणून उदयास येईल का ? लोकांनी लोकांसाठी निर्मिलेली लोकशाही तग धरेल का ?माणसाला माणूस म्हणून वागवल जाण्यापेक्षा आपण पशूंच्या कळप संस्कृतिकड़े का झेप घेतोय ?

हे प्रश्न सारासार बुद्धी असलेल्या सर्वसामान्य मध्यम वर्गीय मनाला रोज पड़त असतील पण ह्यांची उत्तर शोधताना डोक्याला शॉट लावून घेण्यापेक्षा गर्दीचा चेहरा होवून अलिप्त जगण सोप जात.

आता कुठेतरी हे सोईस्कर गर्दीचा चेहरा बनण थांबवल पाहिजे , हे फक्त राजकारणासाठी किंवा मतांसाठी नाहीये . प्रगती पथावर असलेल्या समाजाला मागे खेचन्याचा मोठा विषारी डाव आहे .

स्वातंत्र्योत्तर काळात सर्व समाज एक संध ठेवू शकणारी खूप कर्तुत्वे उदयास आली पण मग आपणच त्यांना राजकिय , जातीय , धार्मिक कट्टर भिंती मधे बंदिस्त केले.

तरिसुद्धा आता वेळ गेलेली नाही हे कट्टरतेच् ध्रुवीकरण थांबवल पाहिजे , समोरचा शेन खातोय म्हणून आपण इतिहासाचे दाखले देत नव्याने शेनात जायच नाहीये , समाजमन बदलत आहे , बदलत्या समाजमनाचा आदर केला पाहिजे

आपल आपणच ठरवायच आहे  आपल्याला अभिजन , बहुजन ,दलित म्हणून येणाऱ्या पिढ्या घडवायच्या आहेत ? 
की राज्यघटना पाळणाऱ्या , एकमेकांच्या विचारांचा , एकमेकांच्या जगण्याचा सन्मान करत चांगला माणूस म्हणून घडवायच्या आहेत......

रखमा आजी , दुसरेपण

आमच्या गल्लीत रखमा आजी राहायच्या . दिसायला एकदम देखण्या आणि घर एकटी असून सुद्धा स्वच्छ आणि टाप टिप असायच त्यांच ,  मी आईला विचारलेल की त्यांना कुणी नाहिये का ? आई म्हणाली त्यांना मूल बाळ नाहिये आणि विषय टाळला , मी 11 वी ला होतो .आईने विषय टाळलाय हे लक्षात आलेल पण जास्त विचारल नाही म्हटल मित्र सांगतील डिटेल मधे नंतर पण एक्ट्याच् राहतात म्हणून आदर आणि सहानुभूति वाढलेली नक्कीच . संध्याकाळी मित्रांकडे विचारल की रखमा आजी च काय आहे रे ?
मित्र ज़रा चपापले , एकान खूण केली की नंतर बोलू आणि बाळू कड़े डोळे दाखवले , थोड्या वेळाने बाळू घरी गेला मग संगितलेली हकीकत अशी की ...
बाळूचे आजोबा महादेव ,  रखमा आजीच्या शेतात सालगड़ी होते . महादेव आणि त्यांचीं बायको शेतातल्या घरात राहायचे . चांगल 5-6 एकर उसाच् रान होत . रखमा आजीचा नवरा अर्ध्यावर डाव सोडून पोर बाळ पदरात न टाकता वारलेला  . एकट्या पडलेल्या रखमा आजीला मग तिथे महादेव चा आधार सापडला , महादेव ला पण बाई सोबत पैसा मिळाला आणि मग रखमा आजीच आणि महादेव च प्रेम जुळल . सगळ निवांत चालु होत , रखमा आजीचा नवरा परगावहून तिथे स्थायिक झाल्यामुळे भाऊबंधांचा सुद्धा काही त्रास नव्हता नाहीतर बोंबाबोंब लगेच झाली असती , कदाचित महादेव ने हाच फायदा घेवून रखमा आजीला जाळ्यात ओढली असावी.
महादेव ची बायको सुद्धा घरी बक्कळ पैसा येत होता म्हणून शांत असायची म्हणजे तिची एक प्रकारे संमती होती हया सगळ्याला आणि वरुन जे काही चाललय ते डोळ्यासमोर म्हणून सुद्धा शांत असेल नाहीतर त्या काळी पुरुष अशी अनेक अंगवस्त्रे बाळगून असत ,खायला नसेना का घरी पण एक दोन बायका असणे म्हणजे खरा पुरुषार्थ असा एक समज  सुद्धा होता ,काही ठिकाणी अजुनहि आहे.
काही दिवसांनी ही बातमी महादेव च्या भाऊबंधात समजली , महादेव च्या सासरी छी थू होवू लागली म्हणून मग महादेव शेतातल घर सोडुन आमच्या गल्लीत त्यांच्या जुन्या घरीच राहायला आले. 
रखमा आजी आजारी पडल्याच् निमित्त झाल आणि महादेव ने रखमा आजीला शेतातून बाहेर काढायचा डाव साधला , तिला शेतातून आमच्या गल्लीत तिच्याच् पैशाने घर घेवून राहायला आणल.
आता रखमा आजीच शेत पूर्ण 5 एकर महादेव च्या आयत ताब्यात आलेल आणि रखमा आजी महादेव च्या मर्जी वर जगत होती.
महादेव ची पोर काही शिकली नाहीत ,उसाच् रान फुकटा फाकट मिळून सुद्धा टिकवता आल नाही जसा काळ पुढे गेला , एखाद दोन एकर उरल असेल... महादेव जेव्हा शरीराने थकला तेव्हा मग महादेव च्या बायकोने रखमा आजीवर सूड़ उगवायला चालू केला , बाळूचा बाप आणि चुलते शेत नावावर करून दे म्हणून छळ करू लागले , उपाशी ठेवू लागले.
शेवटच्या दिवसात तर बिचारी उपाशी राहायची , आमच्या ,काकांच्या घरून जेवून जायची . खुप स्वाभिमानी होती बिचारी म्हणून उपाशी झोपायची पण कुणी बोलावल्या शिवाय त्यांच्याकडे जेवायला जायची नाही. 
तिला खर तर शेवटच्या दिवसात रफ़ीक भैया नी खुप जपल , ट्रक ड्राईवर असून म्हणजे एवढा काही पैसा नव्हता पण तरीही घासातला घास दिला , घरी असले की रखमा आजी जेवल्याशिवाय जेवायचे नाहीत.
जात , धर्म कशाचा काही संबंध नसताना माणुसकी म्हणून एका पर धर्माच्या आजीला जपल..
त्या दिवशी संध्याकाळी दंगा एकु आला म्हणून गेलो तर कळले रखमा आजी गेली .. 
अंत्यसंस्कार कोण करणार हा मोठा प्रश्न पडला . रफीक भैया सुद्धा आजारी होते थोड़े दिवस म्हणून पगार सुद्धा झाला नव्हता ते मित्राकडून हात उसने  आणायला चालेल होते पण आम्ही मित्रांनी थांबवल आणि म्हणालो अख्खी गल्ली तिच्या शेतातला उस दिवाळीला फुकट घरसमोर लावत आलीये इतकी वर्ष आता नाही म्हणनार नाहीत.
उस आणताना दाखवलेला हक्क गल्लीने नेमका अंत्य संस्कारावेळी आखड़ला , 10 - 20 रुपये च्या वर कुणी दिले नाहीत. 
कारण काय तर तिने प्रेम केलेले आणि मस्तानी म्हणून जगलेली आयुष्यभर.

साला त्या दिवशी पहिल्यांदा स्वताः च्या कमाई ची जाणीव झाली तेव्हाच ठरवल आपण किमान एवढं कमवल पाहिजे की अश्या एखाद्या प्रसंगी आपला हात परिस्थितीमुळे  आखड़ला नाही पाहिजे.

खर तर मस्तानी म्हणजे बाजीरावांची दूसरी बायकोच पण आपल्याकडे अंगवस्त्र म्हणून उल्लेख होतो.

गल्लोगल्ली महादेव आणि रखमा आहेत पण त्यांचे त्यांच्या म्हातारपणातले हाल न बघवणारे असतात. महादेव सारख्यांचे वंशज फायदा होई पर्यंत बघतात नंतर कुणी नसत .

रफ़ीक भैया सारखे आहेत म्हणून माणुसकी वरचा विश्वास टिकून आहे....

काल अशोक सरांच्या पोस्ट वरुन आठवलेल....

स्मार्ट सिटी

फ्लोटर चा सोल निघाला म्हणून पहिल्यांदा त्याच्याकडे गेलो , आमच्या नाक्यावरच्या कॉर्नर ला एक खोका त्याचा .
मी सुरुवाती पासूनच बडबडया मग जिथे जाईल तिथे गप्पांचा फड़ टाकायची सवय  . गांव कुठल ? घरी कोण ? निपाणी मधे कुणाला ओळखतो का ? मी निपाणीच्या श्रीखंडेंचा ओ. अशी कुठे ना कुठे नाळ जुळवून मोकळा होतो.

पण तो निघाला मध्यप्रदेशातला , वडिलांना इनामात मिळालेली सगळी 6 एकर जमीन भावावर सोपवून बायको पोराना घेवून ठाण्यात आलेला . पोरग 8 वी ला आणि पोरगी 12 वी ला . नाक्याशेजारच्या पाइपलाइन च्या इथे राहायचा. कड़क मराठी येत होत म्हणून कुणी परप्रांतीय सुद्धा म्हणायच नाही ...

मुळात त्याला इतक्या दिवसात गाव कुठल ? नाव काय वैगेरे विचारलच नव्हतं.

एरियातल्या भाई ला रोख 50 हजार दिले आणि मग उरलेले 50 दोन वर्षात हप्त्याने दयायच्या कबूलीवर खोका चालू केलेला.

एकदा सामान घेवून कैडबरी सिग्नल ला रिक्षा ची की बायकोची वाट बघत उभा होता , मी पण गाडीत एकटाच होतो म्हणून त्याच सामान घेवून आलो आणि तिथे खास दोस्ती झाली 
चप्पल दुरुस्ती च्यामारी 10 रुपये आणि त्याने पाजलेल्या चहा ची किंमत 6 रुपये , लाज वाटायची साला त्याची दानत बघुन..
एकदा बायको एकटी सामान घेवून येत होती तेव्हा आनंदा च्या बायकोने तिला मदत केली आणि सांगितल भाऊ ओळखीचे आहेत आमच्या मी येते घरापर्यंत , अशी फिटंफिट सुद्धा केली
बायकोला बोलता बोलता बोलली की आनंदा दारु खुप पितो मग बायकोने दीदी कडून दारु सोडवण्याच्या गोळ्या मागवून दिल्या आणि दारु सुटली .

प्रामाणिक प्रयत्न केले माऊली ने म्हणून
संसार मार्गी लागलेला , पोरगी सॉलिड हुशार आहे. काही न काही चांगल शिकवुया , लागेल ती मदत घे पण घाई गड़बडीत उजवु नको अशी मी आणि बायकोने दोघाना अक्षरशः दमदाटी केलेली..

खोक्यातल सामान हलवायच्या ऐवजी एरियातल्या भाऊ च्या पायाशी काही होतय का बघा म्हणून काल पहाटे पासून बिन चहा पाण्याच् दुपारपर्यंत बसलेला...

"आरामात द्या हो तुम्ही कुठे जाताय की मी कुठे जाणार साहेब " हे आनंदाच पेटेंट वाक्य कानात घूमत असेल म्हणून कदाचित आमच्या इथल्या वॉर्ड ऑफिसर साहेबालाच शेवटी आनंदा ची दया आली आणि सगळ सामान व्यवस्थित काढून मग जेसीबी न खोका उचकटला.

ठाणे शहर स्मार्ट होणार , पोखरण रोड नंबर 1 रुंदीकरण होणार , रोज आमची गाडी 60 च्या स्पीड ने तिथन पळणार आणि त्याच स्पीड ने मला हे सगळ पुन्हा पुन्हा आठवणार....

पोहणे आणि मी

लहानपणा पासून पोहण्याची जाम आवड , मुरगुड ला बोरगावे काकांच्या विहीरी मधे पोहायला शिकलो मग नंतर नदी मधे धुमाकूळ , पप्पांच्या बदलीमुळे पारिते ला आलो तिथे तर आमच्या शेजारी भुइंगड़े फॅमिली स्विमिंग चैंपियन होती . महाराष्ट्राच्या स्विमिंग टीम मधे निम्म्यापेक्षा जास्त मंडळी ही तेव्हा भोगावती परिसरातील असायची . बरगे आणि भुइंगड़े ही दोन आडनावे फेमस होती , त्यांच्या सोबत मजबूत शिकलो. पोहण्याचे सगळे प्रकार मला आता सुद्धा व्यवस्थित येतात . काठावरुण उड्या मारण्याचे तर अनगिनत प्रकार येत होते , सूर , ऐदान , मांडी घालून उडी हे सगळे प्रकार तर चिल्लर...
नंतर मी नवोदय ला गेलो आणि पोहणे थोड़े मागे पडले . 
जेव्हा जेव्हा मग सुट्टी असायची तेव्हा पोहणे फिक्स , सुट्टीत शक्यतो मी आजोळी जायचो एकतर बदल्यांमुळे नविन मित्र गोळा करायला लागायचे आणि वरुन एका शाळेत नसल्यामुळे थोड़ जड़ जायच ,म्हणून आजोळी बेस्ट. तिथे मित्र मंडळी फिक्स होती पण तिथे जवळ विहीर किंवा नदी नव्हती ..
7 वि किंवा 8वीत असेन कदाचित, फक्त पोहायच म्हणून आजोळी गेलो नव्हतो आणि वाळव्या मधे राहिलेलो , शेजारी 3-4 जणांची आमची गैंग जमलेली .आम्ही विहिरीमधे volleyball खेळायचो म्हणजे बॉल एकमेकांकडे पास करायचा आणि ज्याच्यावर डाव त्याने तो काढून घ्यायचा प्रयत्न करायचा , नदीच् पात्र खुप विस्तीर्ण आहे पण विहिरीत खेळायला बर पड़त, दमलो की भिंत असते धरायला . सकाळी जो सर्वात पाहिला पोचेल त्याला डाव माफ़ मग सगळ्यात आधी येण्यासाठी झुंबड़ उडायची त्या दिवशी मी सगळ्यात आधी पोचलो , विहिरीत बघतो तर आमच्या गल्ली मधली वैजू काकू पाण्यात पाठीवर पडलेली मला सुरुवातीला वाटल बैकस्ट्रोक मारत असेल पण नंतर कळल की काहीच हालचाल करत नाही आणि चेहऱ्यावर माशा बसलेत , मी नुस्ता वैजू काकू , वैजू काकु म्हणून जोरजोरात रडायला लागलो , मला काहीच कळत नव्हतं काय करायच , माझ ते भोकाड ऐकून एक माणूस पळत आला आणि म्हणाला काय रे काय झाल? मी विहिरीकड़ बोट दाखवल . मला म्हणाला तू श्रीखंडे साहेबांचा ( पप्पा बैंक मधे असल्यामुळे शक्यतो सर्वांना माहीत असायचे ) पोरगा ना ? घरी जा मग आणि काय बोलू नको कुणाला . मी तसाच घरी आलो घरी येवुपर्यंत मला फक्त लाल साडी नेसलेली ,पांढरी पडलेली आणि कपाळावरच  कुंकु वाहून गेलेली वैजू काकुच दिसत होती.
आईने विचारल लवकर कसा काय आलास् रे ?  म्हणालो कुणीच् आले नाहीत म्हणून आलो निघून , आपण जत म्हणजे आजोळी जाउया . आई म्हणाली पप्पा ना दुपारी विचारुया आणि उदया निघुया , दुपारी कधीतरी तिला मी लवकर का आलो ते कळले म्हणजे वैजू काकु ने आत्महत्या केलेली आणि कुठे केली ते सुद्धा पण मी काही विषय काढत नाही म्हटल्यावर आईने सुद्धा मुद्दाम विषय काढला नाही ( तीला हे माहित नव्हते की मीच सगळ्यात आधी काकु ला पहिलेले , हल्ली हल्ली मी सांगितले)
नंतर जत ला गेलो आणि विसरलो पण पोहायला जायच धाडस होत नव्हतं , घरचे आलरेडी माझ्या पोहण्याच्या आवड़ीवर वैतागलेले ....बर झाल कमी झाल म्हणत असतील .
शाळेत सुद्धा मागच्या बाजूला एक मोठा हौद होता तिथे काहीजण पोहायचे पण मला पाण्यात फक्त वैजू काकु  दिसायची,विहिर ,नदी कुठेच् जाउ नये अस वाटायच....

4-5 वर्ष अशीच निघुन गेली आणि आम्ही निपाणी ला शिफ्ट झालो तिथे सगळी खणी मधे पोहायला जायची पण मी जात नव्हतो .एकदा माझा मोठा भाऊ गेला म्हणून त्याला आणायला गेलो तर तिथे एक छोटीशी मुलगी पोहायला शिकत होती , 6 -7 वर्षाची असेल , काठाला धरून पाय मारायचे प्रयत्न करत होती पण काही जमत नव्हते  , मी जवळ गेलो आणि पाय कसे मारायचे हे सांगू लागलो तर म्हणाली बाहेर उभ राहून सांगायला भारी वाटतं आत उतर मग कळेल , तुला पोहायला येत तरी का ? आयला मला चैलेंज, बरमूडा वरच होतो तसाच सूर मारला ,मुंडक डायरेक्ट दुसऱ्या टोकाला वर काढल , मला वाटल आश्चर्य करत असेल पण गोड हसत होती , सगळीच् मंडळी जोर जोरात हसायला लागली होती .
ती छोटी आमच्या नदाफ भैयांची पुतनी शबाना होती , कोल्हापूर ला राहते म्हणून मी ओळखत नव्हतो आणि सगळ्यानी मिळून माझा गेम केलेला मी पाण्यात उतरत नाही कारण मला पोहता येत नाही आणि मी पाण्याला घाबरतो असा गैरसमज झालेला पण भावाने पैज लावलेली की मला येते पोहायला...

काही का असेना पण मला वैजू काकुची असलेली भीती शबाना ने घालवली हे मात्र खर ,आता मला पाण्यात कायम शबानाचा इवलासा गोड चेहरा दिसतो....

बऱ्याच वेळा आपल्या बाबतीत , आजुबाजुला असे काही घडते की , उदाहरण द्यायचा असेल तर accident झाल्यावर पुन्हा गाडी चालवावीशी न वाटणे वैगेरे , मग आपल्यावर त्याचा एक पगडा बसतो ,भीती बसते आणि आपण पुढे जायला घाबरतो ,ट्राय करायच सोडा आपण सरळ रस्ता  नाकारतो पण तसे नसते. पुन्हा एखादी घटना किंवा व्यक्ति आपल्याला नविन दिशा देवून जावू शकतात म्हणून प्रयत्न करणे थांबवल नाही पाहिजे.

ता.क - शाळेमधे हौद्यात् पोहण्याचा काही जणांचा भन्नाट किस्सा आहे , पुन्हा कधीतरी तो.....

मांजराचे आत्मचिंतन

मी डोळे मिटुन दूध पीते म्हणून जगाला कळत नाही अस नसत .
अस काय काय ही माणस बोलत असतात ,उगाच आम्हा मांजरांवर बिन कामाच्या म्हणी तयार करुन ठेवलेत , डोळे बंद केल्याशिवाय जीभ व्यवस्थित बाहेर येत नाही हे कोण समजावणार ?

परवा भुरया बोका म्हणत होता तू किस करताना डोळे बंद करतेस म्हणजे तू पवित्र आहेस , त्याला विचारल कुणी सांगितल तर म्हणतो त्याचा मालक गण्या , बायको घरी नसताना एका पोरीला घरी हेच बोलत होता , ही माणसांची जातच वाईट नको ते काय तर आमच्या बोक्याना शिकवतात , आता मी भुरयाला म्हणू काय ? शेजारच्या गल्लीत भूरी पिल्ल कशी काय दिसतात ते ?
हे सगळ चालतय आमच्यात , कुणी कुणाच् नसतय . जो वेळेला पडला तो आमचा....

हया माणसांच्या पण एक एक तऱ्हा असतात , त्या दिवशी शेखरया कुणाला तरी प्राण्यांवर प्रेम करा म्हणून फ़ोन वर भाषण झाडत होता आणि खाली मला पायाने लाथाडत होता , त्याची बायको आणि आई मला पाहिजे नको ते बघतात म्हणून शांत आहे नाहीतर अंगठा तोड़नारच होते. 

ही माणस फक्त कुत्र्याला भितात , ते काय 14 इंजेक्शन लागतय म्हणून आम्ही चावल्यावर काय होतय ह्याच्यावर कुणी काय बोलत नाही , हया महिन्याच्या मीटिंग मधे मी हा विषय घेणार आहे .आपली सुद्धा दहशत बसली पाहिजे, सर्वानी वापर करुन घेण बंद केल पाहिजे आता....

त्यो भुरयाचा मालक घरात उंदर झाली की मला दूध , biscuit वैगेरे देतो नाहितर लांडयाची मांजर म्हणून दिसेल ते फेकून मारतो मला काय करायची तुमची भांडण ? तुमच्या जाती आणि धर्म ? रफ़ीक भैया हाड़क देतो तिथे माझा जिव रमतो , कंटाळा आला की शेखरया च्या घरी दूध फिक्स आहे , गण्या गेला तेल लावत...

मला आता कंटाळा आलाय ह्यां माणसांच्या दुनियेचा , ह्यांनी आता आमच्या बोका मंडळी ना सुद्धा नको नको ते शिकवायला चालू केलय. 

जंगलात जावं म्हणते तिथ माझा भाचा वाघ आहेच , दबदबा असतो म्हणे त्याचा. खर तर मी दिसते बिबळया सारखी पण मला वाघाची मावशी का म्हणतात ते पण शोधायला पाहिजे....

100 उंदीर खावून संन्यास घेवू इच्छीनाऱ्या मांजराचे आत्मचिंतन....

डाॅक्टर , लीगल आणि समाज

जोडून सुट्या आल्याने अ , ब आणि मी गावाला होतो , डॉक्टर ड चा फोन आला भेटायच काय ? तसही घरी काही काम नव्हतं म्हटल भेटुया 

पहिल्यांदा प्रत्येकाच personal लाईफ बोलून झाल्यावर यथावकाश शाळेचा विषय निघाला , नुकतच आम्हाला शाळेमधे घडलेल एक प्रकरण माहीत पडलेल . आपल्यावेळी वातावरण खुप strict होत म्हणून आपल्याला तेवढा स्कोप नव्हता रे अस मी म्हणताच , अ माझ्यावर तुटून पडला ,म्हणाला लेका शाळेवर संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित करण्यावर आपल लक्ष होत नाहीतर स्कोप नसतो अस कधीच नसत ,आपल्याला शोधावा लागतो . आपणच ज़रा त्याबाबतीत बुळगे् निघालो. ब म्हणाला पोरी पण काय साळसुद नसत्यात रे , ज़रा पोरानि खडा टाकला की गावत्यात. आता अ आणि मी एका बाजूला हया मतावर ठाम की पोर नालायक असतात ,पोरीना नादाला लावतात तर ब हया मतावर ठाम की पोरांची एक्ट्याची चूक नसते टाळी कधी एका हाताने वाजत नाही.. ड मात्र नेहमी प्रमाणे शांत होता , अ ने त्याला दोन शिव्या घातल्या आणि म्हणाला ****  ड , बॉम्ब टाकून उतरवु नको फक्त विचारतोय तेवढ सांग . ड गालातल्या गालात हसून म्हणाला मी एक किस्सा सांगतो आणि मग तुम्ही बोला रे....

आमच्या गावातली टॉपर राधा , 12 वि ला काहीतरी 85 % मार्क पडलेले ,गावाने सत्कार सुद्धा केलेला , साइंटिस्ट व्ह्ययच् म्हणून MBBS ला admission न घेता , कोल्हापूर ला university मधे बीएससी ला शिकणारी मुलगी. दिसायला एकदम काय एक नंबर नव्हती पण आई , बाप शिक्षक म्हणून राहणी मानाने टिप टॉप दिसायची . तसा मला सॉफ्ट कार्नर आलेला पण गावातच practise असल्यामुळे आता एक स्टेटस आलाय तर काय आगाऊपना करायच धाडस होत नाही.एक दोनदा नजरानजर झालेली पण एवढं लक्ष देण्यासारख काही कधी वाटल नाही

रविवार चा दिवस  म्हणजे तूफान गर्दी , दुपारचे 3 वाजलेले तरी पेशेंट आवरत नव्हते , कम्पाउण्डर तर जाम वैतागलेला , तेवढ्यात ही आत आली , चेहरा पडलेला आणि बहुतेक खुप रडली असावी , मी नेहमी प्रमाणे विचारले हम्म , काय झाले बोला ? काय होतय ? काही न बोलता फक्त कम्पाउण्डर च्या दिशेने डोळे फिरवले , लक्षात आल की काहीतरी लेडीज प्रोब्लेम असणार , त्याला बाहेर जायला सांगून विचारले की आता बोला निवांत , काय होतय ? तिने काही न बोलता एक चिठ्ठी हातात दिली , आयला हीच चिठ्ठी जर तिने बाहेर दिली असती तर क्लाउड 9 वर गेलो असतो राव पण क्लिनिक मधे होतो तर ज़रा ताळ्यावर होतो. चिठ्ठी मधे मधली वाक्य वाचून दोन मिनिट उडालोच.....
" डॉक्टर माझी पाळी चुकलिये ,मला ह्यातून मोकळ करा ,पैशांची व्यवस्था मी करेन "
मी लगेच काही विचारायच्या भानगडीत पडलो नाही . म्हणालो यूरिन सैंपल उदया सकाळी हया बाटलीतून आण आपण आधी टेस्ट करू आणि मग ठरवुया , सकाळी 9 ला ये बरोबर .
दुसऱ्या दिवशी सकाळी गर्दी कमी होती , कम्पाउण्डर पण गावी गेलेला मग आधी एक विश्वास येवू दिला की कुणाला काही बोलणार नाही पण पूर्ण माहिती सांग तिने सांगायला सुरुवात केली ....

आपल्या गावचा कोल्हापुर ला वडाप करणारा गोविंदा , त्यांनेच मला जाळ्यात ओढल . मी कधीतरीच वडाप ने यायचे पण राधा - गोविंदा जन्म जन्मांतर चे नाते म्हणत इमोशनल फूल केल , रोज माझ्यासाठी रिकामी गाडी आणायचा एक सुद्धा भाड़े न घेता मी पण भुलले , लग्न करायच म्हणाला एकदा फिरायला जावुया , राधानगरी ला फिरायला गेलो आणि मला फसवल ,मी पण वाहवत गेले मला वाटल लग्न करायच आहे तर काय हरकत आहे पण आता टाळतोय मला.  मी भेटून बोलले त्याला तर म्हणाला एवढी शिकलेली असून माझ्यासारख्या ड्राईवर ला एवढ्या सहज गावलीस तर तुझी लायकी बघ. डॉक्टर साहेब हया पोराना फक्त खेळायला पोरगी पाहिजे बघा . आधी हाच मला म्हणायचा तुझ्यासोबत लग्न झाल तर माझ्या पण घरात शिक्षण येईल , पोर हुशार होतील आणि आता माझी लायकी काढतोय..

एका दमात तिने सगळ सांगून रिकाम केल ,काय माहीत किती दिवस साचलेल ? मी विचारल आणखी कुणाला माहीत आहे काय ? तर नाही म्हणाली 

माझ्या डोक्यात आता चक्र फिरत होत , एवढ्या हुशार आणि चांगल्या मुलीला ह्यातून बाहेर तर काढलच पाहिजे , मेडिकल इथिक्स सांगत होते की बेकायदेशीर काही नको , राधा जरी 18 वर्षे पूर्ण असली तरी  कुणीतरी जवळच्या नातेवाईकाने जबाबदारी घेतली पाहिजे , आता विषय सुद्धा असा की नातेवाईकांमधे काहीच बोलता येत नाही , थोड़ी माहिती काढली आणि लक्षात आल , तिचा एक चुलत भाऊ चळवळीचा कार्यकर्ता आहे , चांगला ओळखीचा आणि थोड़ाफार समंजस आहे. चांगली मुलगी फसलिये सोडवली पाहिजे हाच एक विचार .
 आधी त्या भावाला एक बेनामी नाव घेवून स्टोरी संगितली आणि विचारसरणी चेक करायला मत विचारले , बऱ्याचदा असा सुद्धा अनुभव की चळवळी मधे एक मत आणि पर्सनल लाइफ मधे एक मत ही सुद्धा रिस्क होती . योगायोगाने चांगल्या विचारांचा निघाला मुलगा तो म्हणला आधी आपण त्या मुलाला समजावून सांगू ,लग्न करतोय का बघू नसेल तर मुलीला सोडवू , मी नातेवाईक म्हणून जबाबदारी घेईन.
मग शेवटी त्याला हळू हळू राधा चे नाव सांगितले , 2 मिनिट तो सीलिंग फैन कड़े एकटक बघत राहिला आणि डायरेक्ट पाय धरले आणि म्हणाला , डॉक्टर साहेब , राधीच् नाव आल नाही पाहिजे , तुम्हाला लागेल ती मदत करेन आणि तिला सुद्धा माझ नाव नका सांगू माझ्या समोर नजर द्यायला घाबरेल ती.
गोविंद ला एकदा बोलून बघतो , ऐकला तर ठीक नाहितर आधी राधा ला रिकामी करूया.
तो जाउन गोविंद ला भेटून आला आणि म्हणला उदया बोलवा राधाला , तेवढयावर मी काय ते समजलो.

राधा ला दुसऱ्या दिवशी बोलावल , सगळे लीगल फॉर्मलिटीज पूर्ण केल्या आणि एडमिट करुन घेतल , घरच्याना संगण्यासाठी लौ शुगर चा रिपोर्ट आणि चक्कर येवून पडली आणि दोन दिवस नॉर्मल सलाइन ची स्टोरी घोकुन घेतली..
Even तिला विश्वास दिला की धाडसी हो , गोविंद ब्लैकमेल करण्याची शक्यता आहे,  घाबरु नको .
 ही स्टोरी 5 वर्षांपूर्वीची , 

राधा आता ISRO की DRDO मधे आहे

आता सांगा रे , कोण नालायक आणि कशी वाजते टाळी ?
ब आणि मी एका सुरात म्हणालो ड तू ग्रेट आहेस रे ..

बाकी सगळे विषय राहिले बाजूला ,आम्ही राधा विषयी विचार करू लागलो  , अश्या कित्येक मूली फसवल्या जात असतील ,त्यांच पुढे काय होत असेल ? अश्या केसेस मधे डॉक्टर लोक सुद्धा बऱ्याचदा फायदा घेताना दिसतात पण ड ने एका एका मुलीला वाचवलेे , बाळ होण न होण एका बाजूला पण एका मुलीला अडचणीच्या वेळी धीर देवून बाहेर काढणे महत्वाचे....

ड काही फार मोठा नाही पण नक्कीच एक प्रतिक आहे आपल्या समाजातील चांगुलपणाच.....

टिप - सर्व नावे काल्पनिक आहेत , ड ने सुद्धा काल्पनिक नाव सांगून मेडिकल एथिक्स पाळले...

प्राजक्त आणि प्राक्तन

प्राजक्ता चा नेहमी सड़ा का पडत असेल ? मोगरा , चाफा , अबोली सारख नाजुक हळुवार फूल खुड़ता यायला पाहिजे होत .

प्राजक्ताच्या फुलांचा आणि मातीचा काही संबंध असेल का ? की त्या झाडाने संदीप खरेंच मातीत माती मिसळत जगु ऐकल असेल ?

आपण सगळे शेवटी मातीत जाणार पण तरिसुद्धा आपल्याला जगण्याचा इतका अट्टाहास असतो तसा प्राजक्तला का नसेल ?

एवढी भारी फूल , इतकी देखनी फूलं पण त्यांनी मातीत पड़ाव नाही पटत आणि खाली पडलेली फूल मग देवाला किंवा बायकोला द्याविशी वाटत नाहीत म्हणून मग एका रात्री प्राजक्ता च्या झाडाखाली बेडशीट आंथरून ठेवलो पण दुसऱ्या दिवशी सडा खुपच कमी पडला अस का झाल विचार करत अख्खा दिवस गेला , इंटरनेट वर खुप शोधलो पण काही मिळाल नाही.

झाड लावायच्या आधी असच सहज एका मैत्रीणीला बोललेलो की अंगणात् प्राजक्ताच् एक तरी झाड़ पाहिजे ती म्हणाली तुळशी वर सड़ा पडेल अस लाव , म्हणजे राधा कृष्ण च मिलन होईल आणि तुझ लव marriage होईल.

त्या दिवशीच् मामाने एका मुलीचा फोटो पाठवला, पसंद पडला आणि माझ arrange marriage झाल मग बायकोच्या हातान ते झाड लावलो.

एकदा बायकोला म्हणालो ती पडलेली फूल तुला द्याविशी वाटत नाहीत ती म्हणाली तुळशी वर पड़ताहेत ना मग मला पोचल्या सारखी झाली ..

बायको आणि मैत्रीण सारख्या विचारयांच्या कशा काय निघाल्या ? आता ती मैत्रीण कुठे आहे माहित नाही तशीही एका वर्षाची ग्रुप मधली मैत्री आमची पण सगळ्या पोरी कृष्ण च्या एवढ्या का फैन असतात ? आणि मग पोरानि तश्याच कृष्णलीला केल्या की का भडकतात ?

कृष्णलीला

कृष्णलीलांचा त्रास नसतोच मुळात, वयाच्या अनेक टप्प्यावर हवी हवीशी वाटणारी गोष्ट आहे पण त्रास होतो तो मीच तुझा कृष्ण आणि तूच माझी राधा हया अट्टाहासाचा , राधेने दिलेल्या नकाराला पुरुषी अहंकाराने उन्मत्त कृष्ण पचवु नाही शकत आणि मग त्यातून वापरणाऱ्या साम , दाम , दंड , भेद हया शस्त्रांचा . 

द्रौपदी ला 5 पति होते मग सहावा का नको ? आणि त्यातून मी का नको हया अट्टाहासाचा , मुळात द्रौपदी ला तो सहावा निवडायचा हक्क पचनी न पडण्याचा आणि मग त्याचा संबंध द्रौपदी च्या चारीत्र्याशी जोडून होत असलेल्या अवहेलनाचा...

A dialogue between 2 friends during coffee( दोन मित्र फक्त कॉफी सुद्धा कधी कधी पिवु शकतात ) explaining why girls get furious over consecutive flirting attempts..

सिंगापुर हाउसिंग

थोड़ सिंगापुर हाउसिंग विषयी...

इथे मुख्यतः दोन प्रकारची घर मिळतात , एक म्हणजे HDB ( Housing Development Board of Singapore ) आणि दूसर म्हणजे Condo बाकी villa वैगेरे सुद्धा आहेत पण आपण तिकडे लक्ष न दिलेल बर ;-)

 HDB म्हणजे थोडक्यात आपल्याइथल MHADA किंवा CIDCO , ही घर फक्त Singapore Citizens  आणि Permanent  Residents च विकत घेवू शकतात आणि खुप स्वस्त दरात त्यांना मिळतात. 

Condo म्हणजे प्राइवेट बिल्डर्स नी बांधलेली घर , ते कुणीही विकत घेवू शकत ( including Foreigners)   पण HDB च्या मानाने रूम लहान असतात , इथे एक फी असते आपल्याकडे stamp duty असते तशी , जी 20 % असते आणि घर विकताना तुम्हाला परत मिळत नाही म्हणजे सहजा सहजी कुणी घेवू नाही शकत , मागे सुप्रिया सुळे ह्यांच्या मालकीच्या सिंगापुर मधील घरांविषयी बातमी आलेली , त्यांचा condo मधे एखादा फ्लैट असू शकेल , शक्यता नाकारता येत नाही ( त्यांनाच आरामात परवडू शकेल )

इकडे घर भाड्याने पाहताना मला मित्रांनी HDB मधे बघ कारण फ़ूड कोर्ट , लहान सहान दूकान जवळ असतात आणि ते एकट राहताना बर पड़त म्हणून suggest केलेल पण HDB म्हणजे MHADA अस कळल्यावर मी थोड़ा साशंक होतो पण इथे पाहायला आल्यावर काळल की आपल्याकडच्या private अपार्टमेंट पेक्षा भारी आहे , हाँ आता जिम ,स्विमिंग पूल नाहिये पण त्याचा तसाहि मुंबई मधे माझ्या बिल्डिंग मधे गेल्या 5 वर्षात एकदा सुद्धा वापर केला नव्हता .

Condo मधे मात्र तुम्हाला हया सर्व facility मिळतात ,  जरी तुम्ही भाडेकरु असला तरी नाहीतर आमच्याइथे भाडेकरु म्हटले की आमच्या complex मधे आम्ही गाड़ी पार्किंग चे सुद्धा 10 पट चार्ज लावतो मग बाकीच्या फैसिलिटी सोडाच् असो..

HDB मधे तुम्ही भाडेकरु झालात की तुमच्या घर मालकाला तूमच्या डॉक्यूमेंट प्रूफ सहित रजिस्टर कराव लागत म्हणजे असच कुणी आला आणि राहिला अस चालत नाही..लहान मुलांसाठी भरपूर मोठी ग्राउंड , घसरगुंडी , झोपाळा अश्या सुविधांनी सुजज्ज असतात इथे HDB , सध्या माझा मुक्काम अश्याच एका HDB मधे आहे , त्याचे काही फोटोज...

अमिनाबी

12  ची exam देवून नुकताच घरी आलेलो . आमच्या घराच्या शेजारचा प्लॉट विकायला काढलेला , कुणीतरी अमिनाबी ने टोकन देवून बांधून घेतलेला , संध्याकाळी काका आले आणि म्हणाले चल , बाहेर येवून बघतोय तर निम्मी गल्ली तिथे हजर , झाडून सगळे बापे आणि माझ्याएवढी पोर आलेली मग त्या जागेच्या मालकाकड गेलो , बाप्यानी खुप धमकावला आणि विकायच नाही म्हणून सांगितल , त्याने टोकन चे पैसे खर्च सुद्धा केलेले मग काकानी ते पैसे दिले आणि सांगितले आम्ही घेतोय प्लॉट..

काकाना विचारायची सोय नव्हती , तेवढा तेव्हा दरारा असायचा , पोरानी जास्त लक्ष अभ्यासात घातल पाहिजे , म्हणून एका मित्राला विचारले का रे काय झाल ? तो म्हणाला अरे ती अमिनाबी धंदेवाली आहे . आपल्या गल्लीत कुठे आणतोस घाण ती ? तिच्याकड कोण कुठली लोक येणार. स्ट्रिक्ट हॉस्टल ला असलो तरी धंदेवाली म्हणजे वेश्या एवढं नक्कीच कळत होत. म्हटले बरोबर आहे.मधे कधीतरी अमिनाबी घरी येवून खुप विनवण्या करून गेलेली ,की तिने आता धंदा बंद केलाय , मुलगी कॉलेज ला आहे , आता चांगल्या ठिकाणी राहायचे आहे पण कुणी ऐकल नाही. तो प्लॉट मग आम्ही कसे बसे पैसे जमवाजमवी करुन घेतला.

इंजीनियरिंग ला होतो तेव्हा बेळगाव मधे रेल्वे स्टेशन च्या आसपास म्हणा किंवा कोल्हापुरात बसंत-बहार टॉकीज़ च्या आजुबाजूला दिसायच्या . सुरुवातीला त्यांच निरीक्षण करायला  , उगाचच टिंगल करायला भारी वाटायच , टाइमपास म्हणून मित्राला गाडी मुद्दाम तिकडून न्यायला लावायचो . एकदा असेच जात होतो आणि जास्त वेळ रेंगाळलो तर एकिन विचारलच काय रे बस्तोस काय ? चड्डी पिवळी व्हायची बाकी आमची , गाडी ला किक मारतोय तर किक पण बसेना एवढे घाबरलेलो , तेवढ्यात म्हणाली काय दम नाही काय ? पुन्हा दिसलास तर बघ इथ...

माझा रूममेट रवी चा भाऊ किरण , बेळगाव लाच mbbs ला होता , रवी म्हणजे पुस्तकी कीडा आणि जाम फट्टू . किरणची आणि माझी खास जमायची , कॉलेज मधे दादागिरी मधे नाव खराब म्हणून पोरी ढुंकून सुद्धा बघत नव्हत्या , त्याच्या मागे लागायचो एक दोन पोरींशी ओळख करुन दे रे . माझ , माझ्या बाइक च कल्याण होवू दे , तश्या ही इंजीनियरिंग पेक्षा मेडिकल च्या पोरी भारी असतात दिसायला.एक दिवस म्हणाला उदया आम्ही एका ठिकाणी कैंप लावणार आहे , अख्खा क्लास असेल तू ये माझ्यासोबत आम्हाला मदतीला , काम काय कराव लागेल म्हणून विचारले , ते गटार बिटार मी काय साफ़ करणार नाही बघ . तो म्हणाला नाही रे फक्त मी सांगेन त्या गोळ्या , सांगेन त्या प्रमाणात एका पुड़ित बांधून दयायच्या . पूड़ी कशी बांधायची ते सुद्धा शिकवले.

मस्त तयार होवून  दुसऱ्या दिवशी डॉट 8 ला मी कॉलेज वर हजर , खर तर कैंप साठी assembling 9 ची होती पण आम्ही अतिउत्साहाने लवकर हजर. ह्यांन मला मुद्दाम आधी सांगितल नव्हत, तिथे गेल्यावर कळल की कैंप होता बेळगाव च्या वेश्यावस्तीत , म्हटल ठीक आहे जाउया आपण .आपल्याला काय औषधाच्या आणि बाकीच्या सुद्धा पुड्याच् बांधायच्या आहेत.एका लेडीज डॉक्टर ( सुनैना)  सोबत मला बसवला , मी खुश . जसे जसे पेशंट येत गेले तसे तसे माझ डोक उठत गेल , त्यांच्या जगण्याची , त्यातून घर , मूल संभाळण्याची धड़पड़ जानवायला लागली . एकीला 104 ताप होता , सुनैना सांगत होती आज तू फक्त आराम कर , नाहितर खुप वीकनेस येईल एडमिट कराव लागेल,ती म्हणाली बाई पोरग शिकायला बाहेर ठेवलय खर्च खुप आहे, थंडी पडल्या , सीजन चालू आहे , आता महिनाभर आराम करून नाही चालणार.
एकीच्या डोक्याला खोक पडलेली , गिरहाइक् अचानक violent झाल आणि भिंतीवर हीच डोक आपटल , 2 तास बेशुद्ध होती ,तिची सासु एडमिट होती दवाखाण्यात , नवरा दारुडा होता , धंदा करण्यावाचून पर्याय नव्हता
एकीला तिच्या नवरयान स्वतःच्या नोकरी साठी मालकाच्या सोबत लावल आणि मग मालकान त्याच्या मित्रांसोबत अशी पूर्ण साखळी सुरु झाली आणि ती हया व्यवसायात आली. 
कुणी स्वेच्छेने , तर कुणी जबरदस्तीने ओढवलेल्या परिस्थितिने उतरलेले 

गेलो होतो टाइमपास करायला पण माझ्या डोक्याचा टाइमपास झालेला , परिस्थिति बघुन डोक भनभणायला लागल आणि निम्यातून रूम वर आलो.

रवि न विचारले काय झाल ? जेवणार काय ? पूर्ण भूक मेलेली , जोरात रडावस वाटत होत.
बापाच्या जिवावर पेट्रोल , सिगरेट च्या धुराचा माज काढणारे आम्ही ,त्यांनी परिस्थिति पुढे पत्करलेली शरणागती आणि त्यातून स्विकारलेली लाचारी स्वस्थ झोप सुद्धा लागू देईना . जोरजोरात रडायला लागलो .रवि ने घाबरुन किरण ला फ़ोन करून सांगितले आणि किरण मग त्याच्या मैत्रिणींसोबत आला , त्यांना अमिनाबी बद्दल आणि आम्ही केलेल्या दादागिरी बद्दल बोललो. ते तिघे चौघे जन समजावून सांगत होते अरे त्यांच्यावर आपण आणलीये का अशी वेळ ? आपण  त्यांच्या परिस्थिति वर काही करू शकत नाही म्हणून आम्ही मेडिकल कैंप घेतो जेने करुन वेळेवर उपचार मिळतील.समाजामधे अधे अनेक घटक मिळतील , त्यांच्यासाठी कधी काय करता आल तर नक्की बघ , आता उठ ,चल जेवायला...

नंतर कित्येक वेळा मुंबईतून रात्री अपरात्री घरी जात असताना ,  कोल्हापूर CBS ला दिसायच्या पण आता टिंगल पेक्षा एक वेगळा आदरार्थी भाव आलेला . एकदा रात्री12च्या आसपास तिथून जात असताना   दोन 15,16 वयाच्या पोरी उभ्या होत्या , त्यांना 200 रुपये देत म्हणालो बायानो जेवून घ्या ,त्या सरळ अंगावर आल्या , आम्ही काय भिकारी वाटलो काय रे xxxxx तुला ?

बारबाला पुस्तक वाचत होतो , ते निम्म्यात् सोडल कारण पुढे वाचू वाटेना .समाजच , समाजाने घेतल्या फायद्याच् एवढं भयानक चित्र खर असल तरी ते झेपेना , अंगावर धावून  येवू लागल..

वेश्या व्यव्साय असावा की नसावा ह्यामधे नाही पडायच मला , पण परिस्थिति मुळे कुणाला ह्यामधे पडायला लागू नये अस मात्र वाटतं। ते हाल , ती लाचारी नाही पाहवत  , पुढच्या पिढ्या पुन्हा ह्यामधे येवू नयेत म्हणून चालणाऱी धड़पड़ प्रशंसनीय वाटते खरी पण कुठेतरी आपल्या समाजाने त्यांना हे करायला भाग पाडलय हे जाम टोचत....

आजही किरण , सुनैना अधे मधे फ़ोन करतात तेव्हा मी जास्त शहाणपणा करायला लागलो की कैंप ला नेण्याची भीती घालतात...

अमिनाबीला नंतर कुणी घर , जागा आमच्या एरिया मधे कुणीच् नाही विकली , शेवट पर्यंत भाड्याच्या घरातच राहिली  बिचारी, तिला एकदा सॉरी म्हणून माफ़ी मागायची होती की मी तुला समजायला चूक केली, तुला एक हक्काचा निवारा  ,तुझ्याच पैशाने तुला घेवू दिला नाही , चुकलो मी पण ते राहिलच.....

आजही रात्री , अपरात्री  कुठे कुठल्या बस स्टॉप वर कुणी दिसल की समोर अमिनाबी आणि तिच्यासोबत मनामधे तो गिल्ट उभा राहतो..

पार्थचा जन्म

रात्री दीड ला बायकोचा फ़ोन आला , अहो मला admit केलय , ठोकाच् चुकला . due डेट तर 1 मे दिलेली एवढ्या लवकर admit केल ? 
ठाण्यातून निघता निघता 2 वाजले . पाहिला फ़ोन दिदी ला केला , जिजाजी डॉक्टर आहेत. ते असले की टेंशन नसत.तिला सांगितले , आमच्या आधी पोच . राहुल्या ला कॉल केला , राहुल्या म्हणजे हक्काचा 24 तास available डॉक्टर , तो म्हणाला 7 वा पूर्ण  झालाय ना रे , झाली तर होवू दे डिलीवरी. टेंशन नको घेवू  , फ़ोन कर लगेच काही लागल तर . आईने माहीत नाही पण किमान एक 100 देवांचा जप चालू केला असेल .पप्पांची नजर रस्त्यावर कारण मी स्टेबल नव्हतो . निघताना आई म्हणाली होती ड्राईवर घेतोस का बघ , म्हणालो नको मी चालवतो . मी चालवत असेन तर माझ्या गाड्या दगा देत नाहीत. दादास्कोर्पिओ ला सुद्धा कदाचित जाणीव झालेली आज आपण नखरे करून चालणार नाही , न काही प्रयत्न करता ऑटोमॅटिक धावत होता , 100 च्या आत स्पीड आला च नव्हता , 4:30 ला खेडशिवापुर चा टोल नाका ओलांडला सुद्धा आणि तेवढ्यात फोन वाजला पप्पा ( सासरे) होते फ़ोन वर , अभिनंदन वैगेरे काही नाही म्हणाले मुलगा झाला पण सिरियस आहे वजन फक्त 1400 ग्राम , डॉक्टर जबाबदारी घेईना झालेत ,डॉक्टरांकडे फ़ोन दिला . डॉक्टर ना म्हणालो ट्रीटमेंट चालू करा मी 2 तासात पोचतो.पप्पाना विचारले दिपीका कशी आहे , पप्पा म्हणाले ती व्यवस्थित आहे तिची काय काळजी नाही.
पुन्हा दिदीला फ़ोन , जिजाजी म्हणाले मी पोचतो तिथे आणि परिस्थिति बघतो पाहिजे तर सांगली ला हलवुया मी डॉक्टरांची चौकशी करुन ठेवतो . पुन्हा राहुल्या ला फ़ोन , राहुल्या म्हणाला सध्या कुठे ठेवलय त्या डॉक्टर च नाव सांग मी माहिती काढतो. तू आरामात ये . एकदा डॉक्टर ट्रीटमेंट चालू झाली की होईल नॉर्मल ( एक तरी डॉक्टर मित्र पाहिजेच् , पाहिजे त्या शंका विचारता येतात , धीर येतो ) 
त्या पूर्ण 2 तासात तिघांपैकी कुणी कुणाशी बोलत नव्हतं , स्वतःच स्वताः शी संवाद चालू होता . आई 100% सगळ्या देवांना नवस बोलत असणार , पप्पा जास्तीत जास्त पॉजिटिव विचार आणि एक वेगळ्या चिंतेत असणार , मला मात्र मी आठवत होतो , मी माझ्या पप्पाना किती प्रसंग दिले असतील हसण्याचे आणि किती चिंतेचे ( हे सगळ आठवलेल पुन्हा कधीतरी सांगेन )....
6 वाजत आलेले म्हणून आईने छोटी ताई ला कॉल करुन सांगितले . राहुल्या चा फ़ोन आला डॉक्टर कुरडे चांगले आहेत , सर्व फैसिलिटी आहेत टेंशन नको घेवू.पाहिला फ़ोन दिपीका आणि पप्पाना ( सासरे) ह्यांना केला आणि टेंशन फ्री केल की डॉक्टर चांगले आहेत काळजी करू नका मी अर्ध्या तासात येतोय..
खरा धीर आला छोटिताई चा फ़ोन आल्यावर , दीदी तिथे पोचुन तिने छोटिताई ला फोटो सुद्धा पाठवलेला( हया बहिणींच् नेटवर्क जाम सॉलिड असत ) आणि आनंदात तिने लगेच कॉल केलेला. एक एक लीला सांगत होती बाळाच्या , काय बोलू आणि काय नको झालेल...

एक स्टॉप घेवून डायरेक्ट गाडी जयसिंगपुर ला , ठाण्याहून dot 5 तासात जयसिंगपुर . आधी दिपीका ला भेटलों  मस्त हसत होती निम्म्या क्षीण तिथेच गायब , मग बाळाकड़े .  उरलेला क्षीण तिथे गायब.. एवढंस पिल्लू ते  नाका , तोंडात पायपा घालून पडून होत . जिवात जिव आला जेव्हा श्वासोश्वास चालु आहे पहिल्यावर .डॉक्टर म्हणाले टेंशन  नका घेवू pre mature असला तरी developed आहे , होईल थोड्या दिवसात recover...

दुसऱ्या दिवशी सगळ्या नळया काढून दोन मिनिट साठी हातात दिल्यावर समोर आपला जीव बघुन क्षणभर दोन थेंब डोळ्यातून ओघळले खरे पण
आपले अश्रु त्याच्यावर पडून काही इंफेक्शन होवू नये म्हणून झटकन मान आपोआप वळली....

जवळपास 15 दिवस सूर्य कधी उगवला आणि मावळला , कळले सुद्धा नाही , एवढं लक्ष एकाच गोष्टीकडे लागल होत....

हीच काळजीची जाणीव एक बाप जन्माला घालते, आणि ती खुप भारी सुद्धा असते.....

सांगायचा मुद्दा एवढाच

आम्हाला मुलगा झाला .....

बाळ , बाळाची आई दोघेही व्यवस्थित आहेत..

We blessed with Baby boy ..Mom and Baby both doing fine....

देवेंद्र फडणवीस आणि सत्ताकारण

इतकी वर्षे सत्तेपासुन लांब राहील्यामुळे असेल पण मला फडणवीसांचे राजकारण सुरुवातीला अपरिपक्व वाटायचे त्याला कारण युतीची ९५ ची सत्ता पण होते कारण तेव्हा आलेला चांगला चान्स त्यांनी सोडला आणि सत्ता पुन्हा १० वर्षे आघाडी कडे गेली  पण आजकाल वेगळ चित्र दिसतय

सत्ताकारणामधे अनेक प्रकारे सत्ता टिकवुन ठेवतां येते त्यापैकी एक म्हणजे हक्काचा विरोधक , हा हक्काचा विरोधक तुमचा जवळचा मित्र देखील असतो म्हणजे कधी गरज लागेल तेव्हा चावी दिली की पाहीजे त्या बाजुने दंगा करायला मोकळा . सध्याच्या स्थितीमधे हे काम सेना खुप चांगल्या प्रकारे करतीये . सत्तेत राहुन सर्वात जास्त टिका सेना करते वरुन जेव्हा गरज पडते तेव्हा सपोर्ट पण करते . २०१९ ला सुद्धा युती न होता वेगवेगळे लढतील पण सत्ता स्थापन करताना पुन्हा एकत्र येतील . 

दुसरा प्रकार असतो एका कोणाला विरोधक न करता खुप सारे विरोधक तयार करणे किंवा विरोधकांमधल्या अंतर्गत गटबाजीमधुन वेगवेगळे गट तयार करणे ह्यामधे होत काय लोकांना खुप option दिसायला लागतात मग त्यातल्या त्यात बरा म्हणुन पुन्हा जुन्या मंडळींना पसंती मिळते . 

पण गेल्या २-३ वर्षातले राजकारण पाहता राजकारणाचे नविन परिपाठ घालुन देताना दिसतात . एक एस टी आंदोलन सोडतां सर्व आंदोलने ह्या सरकारच्या काळात यशस्वी होताना दिसतात . आता एसटी महामंडळ सेने कडे असेल म्हणुन व्यवस्थित हाताळतां आले नाही असे सुद्धा म्हणता येईल . 

सुरुवात करायची झाली तर शनि देवाच आंदोलन , मराठा मोर्चा , प्रतिमोर्चा , शिक्षकांचे आंदोलन , शेतकरी संप किंवा आताचा किसान सभेचा मोर्चा . आता बघा ह्या सर्वांमध्ये किती नवनविन नेतृत्व उदयास आली तृप्ती देसाई , प्रकाश आंबेडकर ( जुने असले तरी पुन्हा चर्चेत) , डाॅ अजित नवले पुन्हा मराठा सकल मोर्चा ची लोक . आता झालय काय हे सगळे नेते उदयास आले पण चार पाच चर्चेत राहुन पुन्हा गायब झाले म्हणजे वर्षातून एखादा कार्यक्रम घेतला की झाले असे होते . 

ही सगळी आंदोलन त्या त्या टप्प्यावर यशस्वी होताना दिसली पण खरंच लोकांना काय मिळालय? घंटा.....

लोकांना फक्त नविन नविन चेहरे मिळाले ते सुद्धा विखुरलेल्या विरोधकांच्या रुपात बरं ह्या सर्व आंदोलनांमधे प्रस्थापित विरोधक म्हणजे काॅंग्रेस , राष्ट्रवादी किंवा मनसे मधुन नविन चेहरे यायला पाहीजे होते ते सुद्धा नाहीत अपवाद फक्त जयंतराव साहेबांचा आणि धनंजय मुंडेंचा ज्यांचसुद्धा विधानसभेतल किंवा विधानपरिषदेतल भाषण गाजलय . कोणतीही सत्तास्थान भाजपकडुन पुन्हा खेचून घेताना किंवा स्वत:कडे ठेवताना दिसत नाहीत . 

ह्या सर्व विरोधकांवर आता खरतर पुढची दोन वर्षे खुप आशा असणार आहे खासकरुन राष्ट्रवादी आणि काँग्रेस वर कारण कोणाला कस बरोबर घेतात त्यावर २०१९ चा खेळ अवलंबुन असेल.

लोकशाही टिकायची असेल तर सत्तास्थान फक्त बळकट होवुन चालणार नाहीत विरोधक सुद्धा तितकेच ताकदीचे आणि एकवटलेले पाहीजेत तरच तव्यावर भाकरी परतेल .

पतंगराव कदम

पतंगरावांच राजकारण जबरदस्त होत , एका मित्राच्या मामाने त्यांच्या मतदारसंघात सेनेची शाखा काढली , दुसर्या दिवशी घरी पतंगरावांचा माणुस . मिटींग बसली की का काढली शाखा का नाराज आहे ? गल्लीतल्या पोरांना नोकर्या नाहीत , काही प्रकरण पेंडीग होती . तिथ त्या व्यक्तीने शब्द दिला सगळ्यांना लावुया वेळ द्या . वर्षा दोन वर्षात सगळी पोर भारती विद्दापीठात चिकटलेली.

मतदारसंघातून जवळपास ३०-३२ हजार लोक भारती विद्यापीठांमध्ये कामाला कशाला काय सीट जात्या . मग त्यांना वेळ मिळायचा महाराष्ट्रामध्ये आणखी १०-१२ आमदार निवडुन आणायला . 

मुख्यमंत्री पदासाठी दर वेळी नाव असायच पण मिळाल नाही म्हणुन कधी काॅंग्रेस सोडणार म्हणाले नाहीत . 

पवार साहेबांना सांगली मधे खरी टक्कर दिली कदम साहेबांनीच . सांगली मधे काॅंग्रेस च अस्तित्व फक्त कदम साहेबांमुळच आणि थोड फार मदन दादांमुळे सध्याच्या स्थितीत टिकुन आहे हे मान्य करायला पाहीजे . 

एका निवडणुकीला त्यांच्या मतदारसंघात जायचा योग आलेला . ते आले स्टॅंडवर लोक तिथे जमले बोलले आणि गेले झाला प्रचार . नंतर विश्वजित आले घरोघरी फिरले म्हणाले मताधिक्य द्या . एवढा त्यांना त्यांच्या निवडुन येण्याविषयी विश्वास असायचा . 

ह्या जुन्या पिढीतल्या राजकारण्यांच एक होत सर्वसामन्य माणसाला त्यांच्यापर्यत पोचतां यायच , बोलता यायच अडचणी सांगता यायच्या . 

पतंगरावांच्या रुपाने गावची जाण असलेला नेता हरवला ...भावपुर्ण श्रद्धांजली..

पार्थचा वाढदिवस

आज पार्थचा वाढदिवस , मी दोन वर्षाचा बाप होताना मला माझ्या पप्पांचा रोल जास्त आठवतोय . 

वडिलांना बाप म्हणुन हाक मारायची अजुन तरी हिंमत नाही ती कधी येणार पण नाही . दहशत म्हणा किंवा आमची कर्तृत्व म्हणा . पण अजुनही त्यांच्याकडुन काही घ्यायच असेल किंवा काही परवानगी पाहीजे असेल तर आईला मध्यस्थी कराव लागत .      

लक्ष्य मुव्ही मधे तो एक सीन आहे , आयुष्याच्या कठीणातल्या कठीण लढाईवर जाताना हृतिक ला त्याच्या वडिलांशी बोलावस वाटत , सांगाव वाटतय की तो त्यांच्या अपेक्षा पुर्ण करु शकला नाही अगदी तसपण नाही पण मी पण काही वेगळ केलेल नाही . बोटांवर मोजता येतील इतकेच त्यांच्या आनंदाचे क्षण दिलेत आणि महत्वाचे म्हणजे त्यापैकी फक्त दोनच आठवताहेत.एक जेव्हा नवोदय ला सिलेक्ट झालो आणि दुसरा म्हणजे सिंगापुर ला एकत्र आलो तो क्षण. पोटापुरते मार्क नेहमीच मिळायचे तेवढच माझ ध्येय होत पण त्यांना कुठेतरी जास्त अपेक्षा होती आणि ती खरी पण होती कारण मी कधीच अभ्यासात सिंसियर नव्हतो त्याउलट माझी ताई एकदम हार्ड वर्किंग , बेस्ट स्टुंडंट कॅटेगरीवाली आणि माझ्याबाबतीत पॅरेंट्स डे ला किंवा काॅलेज मधे शिक्षकांना भेटायला गेल्यावर आज काय ऐकायला लागतय ह्याची धाकधुक असणार हे नक्की.

आम्हा दोघांमधे विसंवादाचे खुप विषय आहेत त्यापैकी एक म्हणजे उंगली टेढी करके अगर घी निकालना हो तर पप्पा त्या घी चा नाद सोडतील आणि मी भांड उलट करायला लागल तर चालेल असा . ते घी च उदाहरण दिल तसे प्रसंग खुपदा आलेत , पोलिसांनी थांबवल पप्पा म्हणनार जे काय असेल ते दे आणि मिटवुया आणि मी कायद्यांवर बोट ठेवत वाद घालत बसणार . पप्पा ना मी नेहमी व्यवहारी म्हणत आलोय कारण त्यांचा नेहमी पहिला प्रश्न मार्क किती पडले किंवा आता सुद्धा आॅफिस कस चालु आहे असा असतो म्हणजे भविष्याविषयी चिंता किंवा काळजी जास्त पण आता पार्थ कडे पाहतांना त्यांचे रोल पटत चाललेत . वडिलांनी व्यवहारीच असाव हे पटतय 

मधे एकदा पार्थने उडी मारली , चांगलाच आपटला डोळा सुजला , एक्स रे मधे स्कल ला फ्रॅक्चर दाखवल , बायकोच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हत आणि मी एक दोन फोन करण्यात गुंतलेला , बायको म्हणते एवढ्यात कसले फोन करताय माझ्या डोक्यात चाललेल की हे फ्रॅक्चरआपोआप  ठीक होईल का ? की सर्जरी करावी लागेल मग तेवढे पैसे आहेत का किंवा मेडीकल इन्श्युरन्स मधे कव्हर होईल का . संसाराची गाडी हाकताना किंवा मुलांना वाढवताना भावनिक आणि व्यवहारी दोघांचा मेळ असावा लागतो आणि तो पप्पांच्या व्यवहारी पणामुळे व्यवस्थित टिकला अस वाटतय नाहीतर मी तरी काय शिकलो नसतो. 

आताच्या वातावरणामधे वडीलांचा तसा धाक नसतो आणि एक सो काॅल्ड मित्रत्वाच नात असत म्हणतात . माझ्यामधे आणि पप्पांमधे तस मित्रत्वाच नात नाहीये किंवा आम्ही रोजच्या रोज फोनवर बोलतोच अस नाही , आईसोबत बोललो की सगळे अपडेट मिळतात आणि फोन ठेवला जातो पण जेव्हा जेव्हा कोणतेही निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा किंवा निर्णय घेवुन झाल्यावर घेतलेला निर्णय बरोबर की चुक बघायला हमखास पप्पा आठवतात . 

कस झालय पप्पानी शून्यातून सुरुवात केली आणि १० पर्यंत आणल त्यामुळं परिस्थितीसोबत हातमिळवणी करत पुन्हा शुन्याकडे यायला नको म्हणुन जपुन पावलं टाकली . मला मिळालय १० आता मला ते १० टिकवायचय आणि ते पुढ वाढवायचय . 

आज आम्ही लाख म्हणतो की मी स्वतंत्र आहे , माझे निर्णय मी घेतो पण ते घेताना एक फिक्स माहीत असत की पडलो तरी टेंशन नाही आपल १० फिक्स आहे . तो एक वेगळा आत्मविश्वास असतो , कोणत्याही परिस्थिती ला सामोर जाताना मनामधे कुठेतरी एक विश्वास सतत असतो की पप्पा आहेत आणि it really matters .. 

आज पार्थ चा दुसरा वाढदिवस साजरा करताना किंवा दोन वर्षाच बापपण सेलेब्रेट करताना बाकी काही नाही पण ज्याप्रकारे पप्पा माझ्या आत्मविंश्वासाच कारण आतापर्यंत बनत आलेले आहेत तसच उद्या मला पार्थ साठी बनतां आल पाहीजे एवढच वाटत.

आपण आणि पब्ज

एकदा कबड्डी साठी काॅलेज कडुन बेंगलोर ला मॅचेस साठी गेलेलो , आम्हाला थोड्या जास्त अपेक्षा होत्या पण पहिलीच मॅच हरली म्हणुन गम हलका करायला पहिल्यांदा पब मधे गेलेलो . तिथे आम्ही नेमक काय आणि कसे नाचलो ( मला तर गणपती डान्स पण येत नाही ) त्यामुळे मी काय नाचलो असेन का डाउटच आहे . 
मुंबईमध्ये इतक्या वेळा कोण ना कोण बोलवायच पण डान्स येत नाही म्हणुन जायचो नाही .  कामानिमित्त हैद्रबाद ला गेलो आणि तिथल्या टीममेट ने एका पब ला नेलं . मी आपला एक काॅर्नर च्या टेबल वर माझा माझा कार्यक्रम करत बसलो . तिथे आलेल्या मुला मुलींमध्ये पहिल्यांदा पब कल्चर पाहायला मिळाले . कोणत्यातरी कंपनी ची पार्टी असावी पण बिनधास्त नाचत होते , बेफाम झालेले सर्व. त्यातला एक मॅनेजर ओळखीचा निघाला त्याची टीम आणि तो इतके मिक्स झालेले कि विचारायला नको . मी नको म्हणत असताना ओढुन नेले , आजुबाजुच्या टेबल वर पण माझ्यासारखे एक दोन चार फक्त बसलेले त्यांना पण नेले . एक वेगळ्या प्रकारचा स्ट्रेस बस्टर पाहायला मिळाला. कामाच्या , बाकीच्या सगळ्या ताणतणावातुन बेफाम नाचणारे पाहीले. 

काही दिवसांपूर्वी शाळेचा मित्र आला सिंगापुरमध्ये , दोघेही काही काळापुरते बॅचलर आणि महत्वाचे म्हणजे आयुष्यात खुप कमी लोक असतात ज्यांच्यासोबत आपण मोकळे असतो त्यात आमच्या शाळेच्या मित्रांचा एक नंबर लागतो म्हणजे एकमेकांच्या मनात काय चाललंय ह्याचा अंदाज बांधायला आम्हाला जास्त वेळ लागत नाही किंवा विचार करायला लागत नाही . मग काय गेलो दोघे पब ला . वाटलेल आपण तिथे थोराड दिसु सगळे काॅलेजवाले वैगेरे असतील . पण तस काय नव्हतच सगळे वेगवेगळ्या वयाचे आणि बेधुंद होवुन नाचणारे. कपल्स होते फॅमिलीज होत्या . काही आगाऊ कार्टी होती पण सेक्युरिटी एवढी कडक होती की एका क्षणाला वाटलेल जमलेल्या लोकांपेक्षा ते युनिफाॅर्म वाले जास्त आहेत . 

मी जिथे गेलो तिथे आक्षेपार्ह काही घडल नाही किंवा पाहायला मिळाल नाही . कोणी काड्या करताना दिसल की सेक्युरिटी बाहेर काढत होते . हा झाला पब चा स्कोर . खरी गोम तिथेच आहे . पब मधे नाचल्यानंतर एवढी एनर्जी लेवल वरच्या पट्टीत पोचलेली असते की त्यांनतर त्या क्राउड ला सांभाळण किंवा त्या लोकांनी त्यांचे मन कंट्रोल करणे अवघड होत असावे आणि मग आफ्टर इफेकट्स वेगळे असावेत किंवा काही लोक काहीतरी ठरवुन जात असावेत आणि त्याचा गैरफायदा घेत असावेत . पण हे झाल ठरवुन केलेले उद्योग . 

पब नावाची गोष्ट किंवा वातावरण इतक बदनाम करुन ठेवलय की त्यामुळे तिथे गेलेल्या प्रत्येकाकडे एका वेगळ्या नजरेन पाहील जात स्पष्ट बोलायच झाल तर सगळे चरित्र हीन तिथे जातात व तिथे जाणार्या सगळ्यांची लफडी असतात असा गैरसमज आहे . 

पब सोडा पण आॅफिस च्या पण पार्टी मधे , लग्नाच्या वरातीमधे पण बेधुंद नाचतातच की सगळेजण मग त्याबद्दल कोणी काही म्हणते का ? कि पब मधे दारु सुद्धा असते आणि ज्या ठिकाणी दारु तो भाग वाईट असे आहे ? कोणतेही व्यसन वाईटच असते त्याबद्दल दुमत नाही पण म्हणुन असे कोणत्या एका ठिकाणाला वाईट म्हणावे असे नसते किंवा त्या ठिकाणी जाणार्या लोकांना वाईट म्हणावे असे सुद्धा नसते . रोज पुजा प्रार्थना करुन आसाराम वाईट आहेच की मग मंदिरात जाणारे सगळे तसे ठरतात का तर नाही . 

बदलत्या nuclear फॅमिलीज मुळे म्हणा किंवा कट्टा संस्कृती लोप पावत असल्यामुळे लोकांना आपला ताणतणाव दुर करण्याच्या खुप कमी जागा शिल्लक राहीलेल्या आहेत त्यामुळे मग पब वैगेरे सारख्या ठिकाणी जावुन थोडा ताण हलका करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे कोणत्या एका ठिकाणावर आक्षेप घेण्यापेक्षा व्यक्ती तितक्या प्रवृत्ती हेच एक खरं मानाव.