आम्ही बहुतेक 7 किंवा 8 वी ला होतो , कधी नव्हे ते असेंब्लि ( रोल कॉल , प्राथर्ना , प्रतिज्ञा, राष्ट्रगीत ह्या सगळ्यासाठी एक नाव) च्या जवळपास 10 mins आधी तयार झालेलो ( नॉर्मली आम्ही असेंब्लि ची घंटा झाल्यावर मग शूज वैगेरे घालायला चालु करायचो )
तेवढ्यात एकाला तिथे कुकुड कोंबडा /कुंभार कावळा / पाण कोंबडा / भारद्वाज दिसला आणि मग तो पक्षी दिसला की दिवस शुभ जातो अशी आख्यायिका असल्यामुळे आम्ही सगळे लगेच त्या पक्षाच्या पाया वैगेरे पडायला लागलो.पक्षी पण डामरट होता आमचा एवढा दंगा चालु होता पण जागचा हालला नाही , आमचा तो दंगा ऐकून जगताप सर (Maths Teacher ) तिथे आले आणि म्हणाले काय रे काय चालू आहे ? कुणीतरी म्हणाल सर बघा तो कोंबडा , तो दिसला की दिवस चांगला जातो . सर म्हणाले हो काय ? मग आज तुम्हाला नुकत्याच झालेल्या यूनिट टेस्ट चे मार्क देतो आम्ही पण खुश ..
आज काय मार बसत नाही , आम्ही तसे मार भरपूर गोष्टींसाठी खायचो , पण मैथ्स च्या मार्क्स साठी मार खायचा सर्वसाधारण फॉर्मूला 25 पैकी 25 पडले तर मुलांना पाठीच्या खाली , मुलींना हातावर 1 ( पुढच्या वेळी सुद्धा पैकी च्या पैकी मिळावेत ) 24 ला 2 ( एक मार्क कुठे गेला त्यासाठी आणि पुढच्या वेळी सुद्धा साठी 1 ) 23 ला 3 छड्या ,अश्या मार्कांच्या उतरत्या क्रमा प्रमाणे चढत्या क्रमा ने छड्यां मिळायच्या. बर कोंबडा दिसल्यामुळे आम्ही काय मार खान्याची पूर्व तयारी सुद्धा केली नाही ( ह्या पूर्व तयारी वर एक पान लिहून होईल पण थोडक्यात म्हणजे डबल कधी कधी ट्रीपल शर्ट किंवा शर्ट च्या आत स्वेटर , डबल अंडरपैंट , डबल चड्डी घालणे).
क्लास चालु झाला , मार्क मिळाले , नेमका कोंबड्याने दगा दिलेला ,सगळ्यांना नेहमी पेक्षा 3-4 मार्क कमीच पडलेले मग काय खाल्ला दाबून मार , वरुन कोंबडा बघुन नको तो समज करुन घेतला म्हणून एक एक फटका एक्स्ट्रा मिळाला.
तेव्हा ते अंधश्रद्धा वैगेरे काय तेवढ कळायच नाही पण एक गोष्ट लक्षात आलेली , आपला दिवस चांगला की वाईट होईल हे कुठल्या पक्षी किंवा देवाच्या हातात नाही तर आपल्या पूर्वी केलेल्या उपद्व्यापांवर आणि मेन म्हणजे शिक्षकांच्या हातात आहे..
असा आमच्या जगताप सरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचा दिलेला पाहिला धड़ा....
आजसुद्धा कुणी मला राशिभविष्य वाचून दाखवल किंवा तो कुकुड कोंबडा दाखवला की मला जगताप सर आठवतात आणि मग नकळत सरांसाठी हात जोडले जातात..
#Navodaya_Kolhapur
No comments:
Post a Comment