पूर्वी ऐकायचो 33 कोटी देव आहेत स्वातंत्र्योत्तर काळात त्यामधे बरीच वाढ होत गेली , म्हसोबा ,भैरोबा , ताईबाई बद्दल नाही बोलत , मी बोलतोय साईबाबा , गजानन महाराज , स्वामी समर्थ ह्यां मानवांच्या देवत्वाविषयी . त्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातला असेल पण त्यांच्या देवत्वाचा शोध किंवा त्यामधे वाढ ही नक्कीच स्वातंत्र्योत्तर काळात झाली.
शिवशक्ति संगम च्या रूपाने आता त्यामधे शिवाजी महाराजांची भर पडलीये , अजुन थोड्या दिवसांनी बाबासाहेबांना हया यादीत घुसवल नाही म्हणजे मिळवल.
मुळात ही देवत्व का लादली जाताहेत ? Insecurity म्हणावी तर तस् सुद्धा नाही .हे प्रकार अल्पसंख्याक समाजापेक्षा बहुसंख्यांक समाजाकडून जास्त होताहेत. बर त्यामधे सुद्धा फक्त अभिजनांकडून होतय का ? तर तस् सुद्धा नाही ह्यामधे बहुजन समाज सुद्धा तितकाच सामील आहे.
आरएसएस मधे फक्त ब्राह्मण आहेत का ? किंवा समीर गायकवाड़ हा कोण होता ? साधी सोपी उत्तरे असलेले हे प्रश्न आहेत.
हा सगळा भावनेचा बाजार आहे , जातीय ,धार्मिक कट्टरतेकडे झूकणारा झांगड़गुत्ता आहे ज्यातून ध्रुवीकरणाची विषारी पैदावार होईल.
बर हे फक्त RSS , सनातन करतय का ? नाही ह्यामधे समाजातील सर्व घटक म्हणजे संभाजी ब्रिगेड , मलिदा मधे निघालेले मोर्चा चे लोक , MIM चे लोक तितकेच सामील.
RSS काहीतरी बोलणार मग बाकीच्याना संधी मिळणार आणि vice versa.
मला वाटतं ही कट्टरतेची एक एक्सप्रेस आहे आणि त्यामधे सामील होण्यासाठी अभिजन , बहुजन ,दलित सर्वजन धावताहेत , सगळ्यांना स्वताः साठी सीट पकडायची आहेच त्यासोबत मग आपल्या सहकरयांना बोलवून बोलवून (फेसबुक भाषेत टॅग्गुन ) घ्यायच. मग एकमेकांचा उद्धार ते सुद्धा इतिहासाचे सोईस्कर दाखले देवून.
हया अश्या वातावरणात भारत 2020 साली महासत्ता म्हणून उदयास येईल का ? लोकांनी लोकांसाठी निर्मिलेली लोकशाही तग धरेल का ?माणसाला माणूस म्हणून वागवल जाण्यापेक्षा आपण पशूंच्या कळप संस्कृतिकड़े का झेप घेतोय ?
हे प्रश्न सारासार बुद्धी असलेल्या सर्वसामान्य मध्यम वर्गीय मनाला रोज पड़त असतील पण ह्यांची उत्तर शोधताना डोक्याला शॉट लावून घेण्यापेक्षा गर्दीचा चेहरा होवून अलिप्त जगण सोप जात.
आता कुठेतरी हे सोईस्कर गर्दीचा चेहरा बनण थांबवल पाहिजे , हे फक्त राजकारणासाठी किंवा मतांसाठी नाहीये . प्रगती पथावर असलेल्या समाजाला मागे खेचन्याचा मोठा विषारी डाव आहे .
स्वातंत्र्योत्तर काळात सर्व समाज एक संध ठेवू शकणारी खूप कर्तुत्वे उदयास आली पण मग आपणच त्यांना राजकिय , जातीय , धार्मिक कट्टर भिंती मधे बंदिस्त केले.
तरिसुद्धा आता वेळ गेलेली नाही हे कट्टरतेच् ध्रुवीकरण थांबवल पाहिजे , समोरचा शेन खातोय म्हणून आपण इतिहासाचे दाखले देत नव्याने शेनात जायच नाहीये , समाजमन बदलत आहे , बदलत्या समाजमनाचा आदर केला पाहिजे
आपल आपणच ठरवायच आहे आपल्याला अभिजन , बहुजन ,दलित म्हणून येणाऱ्या पिढ्या घडवायच्या आहेत ?
की राज्यघटना पाळणाऱ्या , एकमेकांच्या विचारांचा , एकमेकांच्या जगण्याचा सन्मान करत चांगला माणूस म्हणून घडवायच्या आहेत......
No comments:
Post a Comment