रात्री दीड ला बायकोचा फ़ोन आला , अहो मला admit केलय , ठोकाच् चुकला . due डेट तर 1 मे दिलेली एवढ्या लवकर admit केल ?
ठाण्यातून निघता निघता 2 वाजले . पाहिला फ़ोन दिदी ला केला , जिजाजी डॉक्टर आहेत. ते असले की टेंशन नसत.तिला सांगितले , आमच्या आधी पोच . राहुल्या ला कॉल केला , राहुल्या म्हणजे हक्काचा 24 तास available डॉक्टर , तो म्हणाला 7 वा पूर्ण झालाय ना रे , झाली तर होवू दे डिलीवरी. टेंशन नको घेवू , फ़ोन कर लगेच काही लागल तर . आईने माहीत नाही पण किमान एक 100 देवांचा जप चालू केला असेल .पप्पांची नजर रस्त्यावर कारण मी स्टेबल नव्हतो . निघताना आई म्हणाली होती ड्राईवर घेतोस का बघ , म्हणालो नको मी चालवतो . मी चालवत असेन तर माझ्या गाड्या दगा देत नाहीत. दादास्कोर्पिओ ला सुद्धा कदाचित जाणीव झालेली आज आपण नखरे करून चालणार नाही , न काही प्रयत्न करता ऑटोमॅटिक धावत होता , 100 च्या आत स्पीड आला च नव्हता , 4:30 ला खेडशिवापुर चा टोल नाका ओलांडला सुद्धा आणि तेवढ्यात फोन वाजला पप्पा ( सासरे) होते फ़ोन वर , अभिनंदन वैगेरे काही नाही म्हणाले मुलगा झाला पण सिरियस आहे वजन फक्त 1400 ग्राम , डॉक्टर जबाबदारी घेईना झालेत ,डॉक्टरांकडे फ़ोन दिला . डॉक्टर ना म्हणालो ट्रीटमेंट चालू करा मी 2 तासात पोचतो.पप्पाना विचारले दिपीका कशी आहे , पप्पा म्हणाले ती व्यवस्थित आहे तिची काय काळजी नाही.
पुन्हा दिदीला फ़ोन , जिजाजी म्हणाले मी पोचतो तिथे आणि परिस्थिति बघतो पाहिजे तर सांगली ला हलवुया मी डॉक्टरांची चौकशी करुन ठेवतो . पुन्हा राहुल्या ला फ़ोन , राहुल्या म्हणाला सध्या कुठे ठेवलय त्या डॉक्टर च नाव सांग मी माहिती काढतो. तू आरामात ये . एकदा डॉक्टर ट्रीटमेंट चालू झाली की होईल नॉर्मल ( एक तरी डॉक्टर मित्र पाहिजेच् , पाहिजे त्या शंका विचारता येतात , धीर येतो )
त्या पूर्ण 2 तासात तिघांपैकी कुणी कुणाशी बोलत नव्हतं , स्वतःच स्वताः शी संवाद चालू होता . आई 100% सगळ्या देवांना नवस बोलत असणार , पप्पा जास्तीत जास्त पॉजिटिव विचार आणि एक वेगळ्या चिंतेत असणार , मला मात्र मी आठवत होतो , मी माझ्या पप्पाना किती प्रसंग दिले असतील हसण्याचे आणि किती चिंतेचे ( हे सगळ आठवलेल पुन्हा कधीतरी सांगेन )....
6 वाजत आलेले म्हणून आईने छोटी ताई ला कॉल करुन सांगितले . राहुल्या चा फ़ोन आला डॉक्टर कुरडे चांगले आहेत , सर्व फैसिलिटी आहेत टेंशन नको घेवू.पाहिला फ़ोन दिपीका आणि पप्पाना ( सासरे) ह्यांना केला आणि टेंशन फ्री केल की डॉक्टर चांगले आहेत काळजी करू नका मी अर्ध्या तासात येतोय..
खरा धीर आला छोटिताई चा फ़ोन आल्यावर , दीदी तिथे पोचुन तिने छोटिताई ला फोटो सुद्धा पाठवलेला( हया बहिणींच् नेटवर्क जाम सॉलिड असत ) आणि आनंदात तिने लगेच कॉल केलेला. एक एक लीला सांगत होती बाळाच्या , काय बोलू आणि काय नको झालेल...
एक स्टॉप घेवून डायरेक्ट गाडी जयसिंगपुर ला , ठाण्याहून dot 5 तासात जयसिंगपुर . आधी दिपीका ला भेटलों मस्त हसत होती निम्म्या क्षीण तिथेच गायब , मग बाळाकड़े . उरलेला क्षीण तिथे गायब.. एवढंस पिल्लू ते नाका , तोंडात पायपा घालून पडून होत . जिवात जिव आला जेव्हा श्वासोश्वास चालु आहे पहिल्यावर .डॉक्टर म्हणाले टेंशन नका घेवू pre mature असला तरी developed आहे , होईल थोड्या दिवसात recover...
दुसऱ्या दिवशी सगळ्या नळया काढून दोन मिनिट साठी हातात दिल्यावर समोर आपला जीव बघुन क्षणभर दोन थेंब डोळ्यातून ओघळले खरे पण
आपले अश्रु त्याच्यावर पडून काही इंफेक्शन होवू नये म्हणून झटकन मान आपोआप वळली....
जवळपास 15 दिवस सूर्य कधी उगवला आणि मावळला , कळले सुद्धा नाही , एवढं लक्ष एकाच गोष्टीकडे लागल होत....
हीच काळजीची जाणीव एक बाप जन्माला घालते, आणि ती खुप भारी सुद्धा असते.....
सांगायचा मुद्दा एवढाच
आम्हाला मुलगा झाला .....
बाळ , बाळाची आई दोघेही व्यवस्थित आहेत..
We blessed with Baby boy ..Mom and Baby both doing fine....
No comments:
Post a Comment