बेरीज-वजाबाकी आणि फेसबुक...
ष एक भारी फोटोग्राफर , 32 वयाचा पण दिसायला कोवळा..आमच्या मित्र मंडळी मधे मस्तानी म्हणून फेमस..आम्ही मित्र सुद्धा कधी कधी चेष्टेने म्हणायचो..पुरुषांवर बलात्काराचे गुन्हे तुझ्यापसुन नोंद व्हायला चालू होणार..हसायचा फक्त आणि म्हणायचा दिसायला कोवळा असलो म्हणजे कोवळा असेन अस नाही..शाळेमधे बिनधास्त किंवा अगदी सहज 5000 ,10000 मीटर्स पळायचा खुप वेळा नंबर सुद्धा काढायचा , तितकाच् लालेलाल व्हायचा. स्वतःच रांगडेपन फक्त दाखवण्यासाठी पठ्या आर्मी सिलेक्शन पास होवून आला..नंतर कधी तरी त्याला फोटोग्राफी चा छंद जडला आणि त्याने त्याचा व्यवसाय सुरु केला..पोर्टफ़ोलीओ बनवणे , वाइल्ड फोटोग्रोफी असे बरेच काय काय करायचा..
समोरून एखादी सुंदर मुलगी गेली की आमची मित्रांची लगेच चुळबुळ चालू व्हायची..सर्वसामान्य नजर आमची , ठराविक अवयवांवर जाऊन स्थिर होत असे आणि मग ठराविक माप दडांंमधे बसनारी मुलगी सुंदर हा आमचा निकष पण ष चे सौंदर्य निरखायचे मापदंड सुद्धा खुप वेगळे..त्याला डोळे आवडायचे ..म्हणायचा शांत आणि गहिरे डोळे खऱ्या सौंदर्याचे प्रतिक आहेत..गहिरे डोळे समोरच्याला समजून घेतात..समोरच्याच् ऐकतात..
Christian मूलीशी लव marriage झाल संसार सुद्धा व्यवस्थित होता अस ऐकिवात होत..पण नेमक उलट घडत होत..ष ची बायको पूर्ण डॉमिनेटिंग फक्त बोलायची ऐकून घ्यायची अजिबात सवय नाही...गहिरया डोळ्यांचा 2 वर्षातच पूर्ण फसलेला अंदाज...
म एक 44-45 वयाची मध्यमवर्गीय सरकारी अधिकारी .. एक छोट चौकोनी कुटुंब ..जितका मान मरातब ऑफिस मधे तितकिच उलट घरी वागणूक..सोन्यासारखी दोन मूल आईसोबत सगळ काही शेयर करणारी पण नवरा मात्र उलट. फक्त हुकुम सोडणारा एवढी क्लास वन अधिकारी पण पैशाचे व्यवहार नवरयाकडे..तितकाच् संशयी..माकडाच्या हाती मोती लागला की कशी insecurity आणि over protection चालू होत तो नमूना..जिथे जाईल तिथे सोबत..खुप लांबुन लोक म चा सल्ला विचारण्यासाठी यायचे एक उत्कृष्ट साइकोलॉजिकल anlyst, conflict मैनेजर पण कुठेतरी स्वतःच अस्तित्व , स्वतःची स्पेस हरवून बसलेली...
फेसबुक च पेव सुटल , मीच ष ला पेज ओपन करुन दिलेल..मस्त मस्त फोटो टाकायचा..लाइक कमेंट चा बेसुमार मारा चालू होता..जास्त करुन बायका आणि पोरींच्या उड्या त्याच्या पेज पर पडत होत्या...
ष आणि म ची ओळख तिथेच झाली..कुठेतरी धागे जुळले एकमेकांच्या आयुष्यातील बेरीज वजाबाकी चा हिशोब झाला ..फ़ोन वर बोलता बोलता प्रत्यक्षात भेटु लागले मग एकदा म च्या घरी कोणी नसताना भेटले आणि नविन अध्याय सुरु झाला..
6 महीने सगळ सुरळीत होत जसा चान्स मिळेल तस् कधी ष च्या घरी कधी म च्या घरी तर कधी कुठे पण शेवटी एक लक्षात आल की हे नात सुद्धा कुठेतरी फक्त शरीर सुखा कड़े वळतय ज्या गरजांमुळे हे नात फूलल त्या गरजा मागे पडून फक्त शरीरसुखा साठी धावताहेत..जागा शोधताहेत...
म ला ह्याची जाणीव लवकर झाली कारण मुळात तिला शरीर सुखाकडे जास्त ओढ़ा कधीच नव्हता पण ष च्या इच्छेला मान म्हणून ती तयार असायची , तिने ष ला बजावल की आता आपण रेगुलर भेटुया नको..ह्या नात्यात सुद्धा तोच तोच कंटाळा येतोय..सुरुवातीला ष ला काही जानवले नाही , पण नंतर लक्षात आले कुठेतरी तो मनाने सुद्धा गुंतला होता , म ची सुद्धा अवस्था काही वेगळी नव्हती..दोघांच्या आयुष्यात पुन्हा एक नवीन पोकळी निर्माण झाली होती..
मध्यंतरी दोघेही फेसबुक पासून थोड़े लांब पडलेले पुन्हा आता सक्रीय झाले ...एकदा एखादी गोष्ट घडून गेली की माणूस दुसऱ्यानदा पूर्णपणे सरसावलेला असतो .. आता दोघांनाही ष आणि म शोधायला जास्त दिवस नाही लागत ,पहिलपनाच् अवघडलेपन निघुन गेलय... बेरीज वजाबाकी ची नवी नवी समिकरणे चालू होतात...
म आणि ष अधे मधे कधीकधी भेटतात ..आयुष्यामधे येवून गेले्ल्या ष आणि म चा हिशोब मांडत...
No comments:
Post a Comment