इतकी वर्षे सत्तेपासुन लांब राहील्यामुळे असेल पण मला फडणवीसांचे राजकारण सुरुवातीला अपरिपक्व वाटायचे त्याला कारण युतीची ९५ ची सत्ता पण होते कारण तेव्हा आलेला चांगला चान्स त्यांनी सोडला आणि सत्ता पुन्हा १० वर्षे आघाडी कडे गेली पण आजकाल वेगळ चित्र दिसतय
सत्ताकारणामधे अनेक प्रकारे सत्ता टिकवुन ठेवतां येते त्यापैकी एक म्हणजे हक्काचा विरोधक , हा हक्काचा विरोधक तुमचा जवळचा मित्र देखील असतो म्हणजे कधी गरज लागेल तेव्हा चावी दिली की पाहीजे त्या बाजुने दंगा करायला मोकळा . सध्याच्या स्थितीमधे हे काम सेना खुप चांगल्या प्रकारे करतीये . सत्तेत राहुन सर्वात जास्त टिका सेना करते वरुन जेव्हा गरज पडते तेव्हा सपोर्ट पण करते . २०१९ ला सुद्धा युती न होता वेगवेगळे लढतील पण सत्ता स्थापन करताना पुन्हा एकत्र येतील .
दुसरा प्रकार असतो एका कोणाला विरोधक न करता खुप सारे विरोधक तयार करणे किंवा विरोधकांमधल्या अंतर्गत गटबाजीमधुन वेगवेगळे गट तयार करणे ह्यामधे होत काय लोकांना खुप option दिसायला लागतात मग त्यातल्या त्यात बरा म्हणुन पुन्हा जुन्या मंडळींना पसंती मिळते .
पण गेल्या २-३ वर्षातले राजकारण पाहता राजकारणाचे नविन परिपाठ घालुन देताना दिसतात . एक एस टी आंदोलन सोडतां सर्व आंदोलने ह्या सरकारच्या काळात यशस्वी होताना दिसतात . आता एसटी महामंडळ सेने कडे असेल म्हणुन व्यवस्थित हाताळतां आले नाही असे सुद्धा म्हणता येईल .
सुरुवात करायची झाली तर शनि देवाच आंदोलन , मराठा मोर्चा , प्रतिमोर्चा , शिक्षकांचे आंदोलन , शेतकरी संप किंवा आताचा किसान सभेचा मोर्चा . आता बघा ह्या सर्वांमध्ये किती नवनविन नेतृत्व उदयास आली तृप्ती देसाई , प्रकाश आंबेडकर ( जुने असले तरी पुन्हा चर्चेत) , डाॅ अजित नवले पुन्हा मराठा सकल मोर्चा ची लोक . आता झालय काय हे सगळे नेते उदयास आले पण चार पाच चर्चेत राहुन पुन्हा गायब झाले म्हणजे वर्षातून एखादा कार्यक्रम घेतला की झाले असे होते .
ही सगळी आंदोलन त्या त्या टप्प्यावर यशस्वी होताना दिसली पण खरंच लोकांना काय मिळालय? घंटा.....
लोकांना फक्त नविन नविन चेहरे मिळाले ते सुद्धा विखुरलेल्या विरोधकांच्या रुपात बरं ह्या सर्व आंदोलनांमधे प्रस्थापित विरोधक म्हणजे काॅंग्रेस , राष्ट्रवादी किंवा मनसे मधुन नविन चेहरे यायला पाहीजे होते ते सुद्धा नाहीत अपवाद फक्त जयंतराव साहेबांचा आणि धनंजय मुंडेंचा ज्यांचसुद्धा विधानसभेतल किंवा विधानपरिषदेतल भाषण गाजलय . कोणतीही सत्तास्थान भाजपकडुन पुन्हा खेचून घेताना किंवा स्वत:कडे ठेवताना दिसत नाहीत .
ह्या सर्व विरोधकांवर आता खरतर पुढची दोन वर्षे खुप आशा असणार आहे खासकरुन राष्ट्रवादी आणि काँग्रेस वर कारण कोणाला कस बरोबर घेतात त्यावर २०१९ चा खेळ अवलंबुन असेल.
लोकशाही टिकायची असेल तर सत्तास्थान फक्त बळकट होवुन चालणार नाहीत विरोधक सुद्धा तितकेच ताकदीचे आणि एकवटलेले पाहीजेत तरच तव्यावर भाकरी परतेल .
No comments:
Post a Comment