आम्ही तेव्हा सांगलीत विश्राम बाग़ ला राहायचो , मला सुट्या होत्या म्हणून काहीतरी वाचत बसलेलो , दादा कुठून तरी बाहेरून आला आणि म्हणाला पुलिस ग्राउंड वर मैचेस चालु आहेत येणार काय ? म्हटले चला जावुया , एक बास्केट बॉल ची मैच चालु होती बहुतेक कोल्हापुर की सोलापूर विरुद्ध सांगली जिल्हा पोलिस दल अशी मैच होती , सांगली ची टीम सणकुन मार खात होती , मूळ भूमि जरी कोल्हापुर असली तरीसुद्धा अर्ध आजोळ म्हणजे मामा मावशी सगळे सांगली ला म्हणून सांगली विषयी एक वेगळी आत्मियता , दादा ला म्हणालो गेली की रे मैच आपल्या हातून , तो बोलला थोड़ थांब कामटे साहेब अजुन यायचे आहेत , 10 मिनिटांनी साहेब आले असतील , ते आले , ते खेळले आणि त्यांनी एक हाती गेम जिंकला
एवढा मोठा अधिक्षक माणूस पण मैदानावर खुप सहज वावर , एक कोल्हापुर च पोरग लइच रफ खेळत होत , मी मनातल्या मनात म्हणतोय साहेब हयाचा बदला आज न उदया काढणार , खेळ झाल्यावर त्याला भेटलो आणि विचारल म्हटल भीती नाही वाटत , S.P विरुद्ध खेळत होता आणि तुम्ही रफ होता पूर्ण गेम मधे ... तो म्हणाला कामटे सरांसोबत खुप कमी वेळा खेळायला मिळतं , जे काही पैतरे आहेत ते सगळे ट्राय करायचे , खुप शिकायला मिळतं आणि सर एकदम जिंदादिल आहेत ग्राउंड वर...
हे मी कामटे साहेबांना तिथे पहिल्यांदा पाहिल...
नंतर ते रोज सकाळी पोलिस ग्राउंड वर जॉगिंग ला येतात म्हणून खास त्यांना बघायला जमल तर बोलायला म्हणून मी जॉगिंग ला जायचो , आमचं जॉगिंग म्हणजे काय एक किंवा अर्धा राउंड पळायच जास्तीत जास्त आणि मग तिथे पोलिसांच्या प्रैक्टिस किंवा कवायती बघायच्या आणि घरी यायच
एक दिवशी शेवटी टाइमिंग जमल , कामटे साहेब आले सलग 5-6 राउंड मारले , एक मुलगा चुकीच्या पुश अप्स मारत होता त्याला 2 -3 पुश अप्स मारुन दाखवल्या आणि गेले ... किती सहज वावर .
आपण एखाद्या मोठ्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटलो की अजानतेपणे आपण त्यांना फॉलो करू लागतो नंतर त्यांच्या येणाऱ्या प्रत्येक बातमी कड़े आपले काटेकोर पणे जसे आपल्या मित्र परिवार किंवा कुटुंबाच्या बातम्यां कड़े जसे लक्ष असते तसे काहीसे
कामटे साहेबांची मग सोलापुरच्या रवी पाटलाला उचललेली , चेंबूर मधे दंगल नियंत्रणाची बातमी असो ..3 - 4 वेळा नक्की पारायण ठरलेले..
अरुण गवळी , साळसकर साहेबांमुळे मतदानाला न जावु शकलेल्या हतबदलतेच्या बातमीमुळे (पूर्ण पणे ऐकिव ) साळसकर साहेब असेच लक्षात राहिलेले
मालेगांव च्या बोम्ब स्फोटाचा शोध लावून अटक करविणारे करकरे साहेब अशी करकरे साहेबांची ओळख लक्षात
26 /11 चा हल्ला झाला , पूर्ण संध्याकाळ मी आणि दादा टीवी समोरून हललो नव्हतो
बरोबर 11-50 ला स्क्रोल आला साळसकर ,करकरे आणि कामटे साहेब हल्ल्यात जखमी , वाटल एखादी गोळी लागून गेली असेल ,तसेच झोपायला गेलो सकाळी उठुन टीवी लावला तर निधनाची बातमी
डोक सुन्न , समोर फक्त ते बास्केटबॉल खेळतानाचे कामटे साहेब , हेल्मेट घालून हल्ल्याच्या विरोधासाठी चे करकरे साहेब आणि हसरया चेहऱ्या चे साळसकर साहेब हेच 3 चेहरे शपथ सांगतो 3 दिवस डोळ्यांसमोरुन जात नव्हते , भयानक अस्वस्थता..
3 दिवसांनंतर सगळ सुरळीत झाल , मुंबई स्पिरिट च्या नावाखाली सगळ खपवून घेतल गेल , आईपीएस व्ह्ययच् म्हणून सकाळी उठून व्यायाम वैगेरे चालु केलेला ( ह्या स्वप्नाची गोष्ट पुन्हा कधीतरी )
पहिली 2-3 वर्ष 26/11 आल की खुप अस्वस्थ व्हायचो
पण हल्ली हल्ली सवय झालीये , 26/11 काय किंवा 11/7 काय किंवा 22 मार्च काय त्या त्या दिवशी 2 -4 सेकंद अस्वस्थ होणार मन !!!!!
इतकीच् काय ती संवेदनशीलता उरलीये..
माझीच मला फक्त इतकी भीती वाटतीये की ही सध्याची 2-4 सेकंद ची संवेदनशीलता तरी येणाऱ्या काळात टिकून राहील की नाही ह्याची...
No comments:
Post a Comment