फेसबुक लाइफ आणि रियल लाइफ...
किस्सा क्र 1..
तिशीतला एक तरुण फेसबुक वर सड़ेतोड़ व्यक्त होणारा , खुप लोक जिथे चुकीच् दिसेल तिथे बोलवायचे मग हा तिथे वेडा वाकडा सुटायचा , वाचन अफाट म्हणून मुद्देसुद सुद्धा भांडायचा ,मोदी साहेबांवर खास प्रेम मग काय सध्याच्या स्थितीत त्याच्या इतका सेक्युलर दूसरा कुणी आहे की नाही हा प्रश्न पडायचा.. फेसबुक वर मोठा फैन क्लब तयार झालेला , लोक कौतुक करायचे , मधे काही कारणाने नविन नोकरी शोधायची वेळ आली , मुलाखती देवु लागला .अश्याच एका ठिकाणी interview चे 3 राउंड्स क्लियर झाला आणि शेवटचा मुख्य राउंड एका मोठ्या manager समोर fix झाला , यथावकाश मैनेजर आले , पाहतो तर त्याच्या फैन क्लब मधले मेंबर ( आपण त्यांना साहेब म्हणुया ) खुप कौतुक करायचे बरेच स्टेटस शेयर सुद्धा करायचे, एका क्षणी खुश झाला पण ओळखीवर जॉब मिळवायचा नाही म्हणून मन लावून सांभाळून interview दिला.. 3-4 दिवसांनी रिजल्ट आला नाही म्हणून कंपनी मधे फ़ोन केला तर कळाले , रिजेक्ट झालाय ..न राहवुन त्याने साहेबाना फ़ोन केला ,ते म्हणाले तू खुप स्पष्ट बोलतोस आम्हाला इतके स्पष्ट बोलनारा नको वरुन तू फेसबुक addict आहेस आम्हाला नको आहे असा candidate..
किस्सा क्र 2
25 च्या दरम्यानची एक कवियत्री ( क म्हणुया), चळवळी तरुणी स्त्रियांवरच्या अत्याचारांवर भरभरुन , त्वेषाने ( खून ख़ौल उठा types) लिहायची , तूफ़ान फेमस , एक फेसबुक सेलिब्रिटी ..बायकांना तीच विशेष कौतुक ..माझी लेक ग , माझी मुलगी असतीस तर काय नशीबवान असते मी अश्या 10-12 कमेंट्स तिच्या प्रत्येक पोस्ट वर , तिच्याच् लिस्ट मधे असणाऱ्या आणि क ला मुलगी मानणाऱ्या एका काकुना त्यांच्या मुलासाठी क च स्थळ सांगून आल , त्यानी क्षणाचाही विलंब न लावता नाही म्हणून सांगितल , मध्यस्थ सुद्धा गार... का नाही म्हणताय म्हणून मागे लागला मग सांगितले मी खुप चांगली ओळखते , मुलगी दिसायला चांगली आहे स्वभावाने गोड आहे पण स्वतंत्र विचारांची आहे माझ्या मुलाला वरचढ़ होईल..
आपण आपली भूमिका सड़ेतोड़ मांडतो आपल्याला भरपूर लाइक मिळताहेत कमेंट्स येताहेत म्हणून रियल लाइफ मधे सुद्धा आपल्याला तितकेच followers असतील ह्या गैरसमजात तर अजिबात पडायला नको..
फेसबुक पाहायला गेल तर एक मुखवटयाच् पुस्तक आहे , उदाहरण दयायच झाल तर सोशल मीडिया वर happytobleed ला पाठिंबा देणाऱ्या अनेक स्त्रिया मासिक पाळी वेळी स्वताःच्या घरचे देव पूजत नसतील...किंवा
दलित अन्यायाविरुद्ध फेसबुक वर पेटुन उठनाऱ्या कार्यकर्त्याला गावातल्या दलित वस्तीकड़चा रस्ता सुद्धा कधी माहीत नसेल..
एखादा असा सुद्धा भेटेल की तुम्हाला नेहमी विरोध करणारा पण प्रत्यक्षात मात्र एकदम जिगरी..
फेसबुक मला कधी कधी एका movie सारख वाटत ,दिवस संपला की शो ख़तम ..
दुसऱ्या दिवसापासून नविन घटना , मग नविन चर्चा
सांगायचा मुद्दा एवढाच की आजुबाजुला घडणाऱ्या प्रत्येक घटनेच्या फेसबुक ट्रायल ला मनावर् घेतल नाही पाहिजे आपण फक्त आपल्या भूमिकेशी प्रमाणिक राहायला पाहिजे..
No comments:
Post a Comment